तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 2 November 2018

बदनापूर कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची बाजार समितीस भेट

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि महाविद्यालय बदनापूर येथील ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी जालना कृषी उत्पन्न बाजार समिती येथे भेट देऊन भुसार बाजार, फळे व भाजीपाला बाजार, रेशीम कोष बाजार इत्यादी लिलावाची प्रत्यक्ष माहिती घेतली. तसेच बाजार समिती मधील आंबा निर्यात सुविधा केंद्र, वेअर हौसिंग गोदाम, वजन काटा इत्यादी सुविधांची पाहणी केली, यावेळी शेतमाल खरेदी विक्रीची पण विद्यार्थ्यांनी पाहणी केली. कार्यक्रम अधिकारी डॉ. एन. डी. देशमुख, डॉ. ए. एल. सुरडकर यांच्या समवेत कृषी महाविद्यालयातील 21 विद्यार्थिनींनी या वेळी बाजार समितीला भेट दिली. बाजार समितीचे श्री तनपुरे यांनी यांना सर्वांना माहिती दिली.

तेजन्युज हेडलाईन प्रतिनिधी अंकुश कदम पाटील 8390515197

No comments:

Post a Comment