तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 4 November 2018

अमूल पॅटर्न कार्यशाळा व दुधव्यवसाय आणि दृष्काळसदृष्य परिस्थीतीत चाऱ्याचे व्यवस्थापन मार्गदर्शन विरगाव येथे संपन्न........


गोरख पवार वैजापूर औरंगाबाद

पंचमहल जिल्हा सहकारी दुधउत्पादक संघ गोधरा ( गुजरात ) व श्रीमहालक्ष्मी दुधसंकलन व शितकरण केंद्र विरगाव ता वैजापूर यांच्या संयुक्त विदयमानाने श्री प्रभाकर चौरे (महाप्रबंधक पंचमहल जिल्हा सहकारी दुधउत्पादक संघ महाराष्ट्र ) यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला .
डॉ वाळूजंकर यांनी दुध व्यवसाय व चाऱ्यांचे व्यवस्थापन यावर व्याख्यान दिले.

श्री महालक्ष्मी दुधसंकलन विरगाव, संत नारायणगिरी दुधसंकलन नादी, साईप्रसाद दुधसंकलन कापूसवाडगाव येथे वर्षभर ज्या दुधउत्पादकांनी अंखडीतपणे सर्वात जास्त दुध पुरवठा केला अशा तिन्ही संकलनातील दुधउत्पादकांचा प्रथम द्वितीय व तृतीय क्रंमाक काढून त्यांना शाल, श्रीफळ ,सन्मानपदक व सौभाग्यवतींना पैठणी साडी देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. तसेच दुध प्लान्टला सर्वात जास्त पुरवठा करणारे श्री किर्तीकुमार सुराशे व सौ .पुनम सुराशे यांना एक तोळयाचे सोन्याचे लॉकेट तर गणेश सोमवंशी व अर्चना सोमवंशी यांना पाच ग्रॅमची सोन्याची अंगठी व तिसरे दुध पुरवठा धारक श्री नारायण सवई यांनाही तीन ग्रॅम सोन्याची अंगठी देऊन गौरविण्यात आले.

प्रभाकर चौरे महाप्रबंधक यांनी अमूल दूध पॅटर्न ला स्वच्छ नव्हे तर शुद्ध दूध विश्वासाने पुरवठा करा. कॉन्टेटी नव्हे तर क्वालिटी दूध दया असे आव्हान केले व दूध उत्पादकांना वेळेवर पगार तसेच हित जपासणारे अमूल पॅटर्न आहे असे सांगितले.
प्रा.रमेश बोरनारे जि.प. सदस्य व ज्ञानेश्वर जगताप संचालक मार्केट कमेटी यांनी आपल्या भाषणात ग्रामीण भागात शेती व्यवसायाला पूरक दूध व्यवसाय उभा करून देणाऱ्या श्री संदीप बारसे यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस  शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमासाठी पंकज ठोंबरे जि.प. सदस्य, प्राचार्य विकास जगताप, शिवाजी आधुडे माजी पं.स.सभापती, सुरेश चिडे भवानी दूध खोकरफाटा, पियूष आबा शिंदे विरभद्र दूध टाकळीमियाँ, महेश बनकर साईअमृत दूध खैरी निमगाव, रामेश्वर उंदरे साईनाथ दूध टाकळीभान, केशव काळे केशव प्रोसेसर्स श्रीरामपूर, डॉ.राहूल कातोरे, गणेश कदम, काशीनाथ बारसे, नानासाहेब थोरात, विलास थोरात, दादासाहेब बारसे व पंचक्रोशीतील दूध उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री प्रभाकर बारसे यांनी तर आभार प्रदर्शन आयोजक श्रीमहालक्ष्मी दूध संकलन व शितकरण केंद्र विरगावचे मालक संदीप बारसे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रवी मगर, गोकुळ निकम, विशाल बारसे,बंडू परदेशी, अशोक विघे सर्व कर्मचारी स्टाफ व मित्रमंडळ यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment