तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 4 November 2018

वैद्यनाथ कारखान्याच्या गळीत हंगामाला ना. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते सोमवारी शुभारंभ


खा. डॉ. प्रितमताई मुंडे व प्रज्ञाताई मुंडे यांची राहणार प्रमुख उपस्थिती

परळी वैजनाथ दि. 3 ...
      पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या 19 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ सोमवार दि. 5 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता कारखान्याच्या अध्यक्षा तथा राज्याच्या ग्राम विकास, महिला व बालकल्याण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे. यावेळी खा. डॉ. प्रितमताई मुंडे, पन्नगेश्वर शुगर मिलच्या अध्यक्षा श्रीमती प्रज्ञाताई मुंडे यांची व विविध मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कारखान्याच्या वतीने करण्यात आले आहे.
       वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना गाळपास सज्ज झाला आहे. यावर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने पाण्याची कमतरता निर्माण होणार आहे ही परिस्थिती लक्षात घेऊन कमीत कमी पाणी वापरण्याचे नियोजन कारखान्याने केले आहे. कारखाना पुर्ण क्षमतेने चालवून कार्यक्षेत्रातील सर्व ऊसाचे गाळप वेळेत करण्याची व्यवस्था करण्यात आली असून तशी यंत्रणा उभी करण्यात आली आहे.
      सन 2018-19 या गळीत हंगामाचा शुभारंभ सोमवार दि. 5 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता कारखान्याच्या चेअरमन ना. पंकजाताई मुंडे यांच्या शुभ हस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. डॉ. प्रितमताई मुंडे राहणार आहेत तर पन्नगेश्वर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती प्रज्ञाताई मुंडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच अनेक मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगाम शुभारंभ कार्यक्रमाला ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोड मुकादम, मजुर व नागरिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेवराव अघाव, कार्यकारी संचालक जी.पी.एस.के. दिक्षीतुलू व सर्व संचालक मंडळाने केले आहे.

No comments:

Post a Comment