तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 2 November 2018

पुणे येथील संचालक कार्यालया समोर प्राध्यापकांचे बेमुदत अमरण उपोषण


24 नोव्हें 2001 पुर्वीच्या महाविद्यालयाला 100%अनुदान द्या-प्रा.डॉ.बी.डी.मुंडे

पुणे (प्रतिनिधी) :-
24 नोव्हें 2001 पुर्वीच्या महाविद्यालयाला 100% अनुदान तात्काळ देण्यात यावे या मागणीसाठी पुणे येथील संचालक कार्यालयात प्राध्यापकांचे बेमुदत अमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे.
24 नोव्हें 2001 पुर्वीच्या महाविद्यालयाला 100 % अनुदान तात्काळ देण्यात यावे हि मागणी गेल्या अनेक वर्षापासून होत असताना शासनाने याची गंभीर दखल घेतली नसल्याने गुरुवार दि.1नोव्हेबर पासुन पुणे येथील संचालक कार्यालयात प्राध्यापकांचे बेमुदत अमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे.या उपोषणाला राज्यातील 150 महाविद्यालयाचे 100 प्राध्यापक अमरण उपोषणात बसले आहेत.सदर मागणीचे निवेदन शिक्षणमंञी विनोद तावडे यांना देऊन हे उपोषण सुरु करण्यात आले आहे.
कृती समीती अध्यक्ष प्राचार्य डॉ बी डी मुंडे ,यानी मनोगत व्यक्त करताना सागितले कि 2001पासुन हे महाविद्यालये आज तागायत आपली अखंडित आपली सेवा देत असतांना हे शासन आपल्या मागण्या मान्य करत नाही.या प्राध्यापकांच्या कुटुंबाची परिस्थिती आता बिकट होत चालली आहे.जिवन मरण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.ऐन दिवाळीच्या तोंडावर आम्हाला उपोषण करण्याची वेळ आली आहे.शासनांनी याची तात्काळ गंभीर दखल घ्यावी अन्यथा हे अमरण उपोषण सोडणार नसल्याचा इशारा हि यावेळी प्राचार्य मुंडे यांनी शासनाला व प्रशासनाला दिला आहे.
यावेळी कृती समितीच्या उपाध्याक्षा प्राचार्य डॉ भारती पाटील , सचिव प्रा जयेश पाटील व सर्व उपोषण कर्ते प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित आहेत.

No comments:

Post a Comment