तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 2 November 2018

शेतकऱ्यांची पाणी विषयी चिंता मिटणार,नांदूर मधमेश्वर कालव्याला पाणी सुटणार- डॉ. राजीव डोंगरे

गोरख पवार वैजापूर औरंगाबाद

           शेतकरीमित्र प्रतिष्ठानच्या  पुढाकारातून नाधूर मधमेश्वर  कालवा लाभ क्षेत्रात गेल्या  महिन्याभरापासून  मोठ्या प्रमाणात शेतकर्यामध्ये जनजागृती  करण्यात आली. शेतकऱ्यांमध्ये जनजागृती व आपल्या हक्काची जाणीव झाल्यामुळे नांदूर  मधमेश्वर  कालव्याच्या इतिहासात प्रथमच ४३८६०  हेक्टर क्षेत्र म्हणजेच संपूर्ण  क्षेत्राची मागणी नोंदवण्यात आली. डॉ. राजीव डोंगरे. व पंडित  शिंदे याच्या नेतृत्वाखाली  शेकडो  शेतकऱ्यांनी २९ ऑक्टोबर रोजी ना. म. कालवा अधिकाऱ्यांची भेट घेऊन सर्व तात्रिक व कायदेशीर  बाजू पूर्ण  केल्या  त्यामुळे रब्बीचे आवर्तन सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

               दरम्यान शेतकरी मित्र प्रतिष्ठानच्या  पदाधिकाऱ्यानी  मुंबई येथे जलसंपदा  सचिवांची भेट घेऊन प्रकल्पाच्या उर्वरित कामांना गती दयावी जेणेकरून १५ वर्षापासून वंचित असलेल्या शेतकर्यांना पाण्याचा लाभ मिळेल. संबंधित सचिवानी ह्या प्रकल्पाला गती देऊन वंचीताना साथ देवू असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.तसेच औरंगाबाद येथील लाभ क्षेत्र विकास प्राधिकरणाचे मुख्य अभियंता व इतर संबधित वरिष्ठ अधिकाऱ्याची शिष्टमंडळाने भेट घेतली व आवर्तन संबधात चर्चा केली. तसेच उर्वरित प्रकल्पाची कामे लवकरात लवकर मार्गी लाऊन गेल्या १५ वर्ष पासून वंचित असलेल्या लाभार्थी धारक शेतांना त्याचे हक्काचे पाणी मिळून द्यावे अशी मागणी केली.संबधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणी सकारत्मक प्रतिसाद दिला.

*शेतकऱ्यांनी भयभीत होऊ नये*

सध्या गोदावरी नदीत नाशिक व नगर जिल्हातील धरणामधून जायकवाडी धरणासाठी विसर्ग सुरु आहे. दिवाळी नंतर राज्यस्तरीय नाशिक व औरंगाबाद विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची येत्या आठवड्यात कालवा सल्लागार समितीची बैठक होणार आहे.त्यात रब्बीच्या अवर्तनची तारिख ठरणार आहे. सदर अवर्तनात सर्व लाभधारकांना योग्य प्रमाणात पाणी मिळणार आहे.त्यामुळे लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी  भयभीत न होता रब्बी पिकाचे नियोजन करावे असे आवाहन डॉ.राजीव डोंगरे व पंडित शिंदे यांनी केले आहे.

      सदर पाण्याचा लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी काटेकोरपणे वापर करावा व प्रत्येक लाभधारकांना पाणी मिळेल याची दक्षता घ्यावी असे त्यांनी सांगितले.लाभ क्षेत्रातील सर्व पाणी वापर संस्थाना पदाधिकार्यांनी जागरूक पणे सक्रीय होऊन हक्काच्या या पाण्यापासून कोणीही वंचित राहू नये अशी खबरदारी घ्यावी.

सध्या राज्य दुष्काळाने होरपळत असताना सर्वाच्या प्रत्यानांनी नांदूर मधमेश्वर कालवा  लाभ क्षेत्रात पाणी मिळणार आहे.त्यामुळे संबधित शेतकर्यांनी मिळणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन करावे.जेनेकरून दुष्काळाच्या झळा कमी होतील व शेतकरी ह्या नैसर्गिक अपत्तीतून सावरू शकेल.

No comments:

Post a Comment