तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 2 November 2018

शेतकर्‍यांच्या पिकविम्याचे पैसे तात्काळ द्या; अन्यथा आंदोलन


हाळम, हेळम, दैठणा, धर्मापूरी, गुट्टेवाडी येथील शेतकर्‍यांचे तहसिलदारांना निवेदन

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)
गतवर्षीच्या जाहिर झालेल्या पिकविम्याची रक्कम अद्यापही शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा झाली नाही. दसर्‍यापर्यंत ही रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यावर येईल असे वाटत होते. परंतू आता दिवाळी आली तरी प्रशासन शेतकर्‍यांना अंधारात ठेवते की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांच्या पिकविम्याची रक्कम तात्काळ खात्यावर जमा करावी यासाठी आज हाळम, हेळम, दैठणा, धर्मापूरी, गुट्टेवाडी येथील शेतकर्‍यांनी तहसिलदारांना निवेदन दिले आहे. दिवाळीच्या अगोदर पिकविमा न भेटल्यास तीव्र आंदोलन करू असा ईशारा शेतकर्‍यांनी दिला आहे. या निवेदनाची प्रत शेतकर्‍यांनी बाजार समितीचे सभापती अ‍ॅड.गोविंद फड यांच्या मार्गदर्शनाने राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांना दिली आहे.
खरीप हंगामाच्या सुरूवातीस दमदार पाऊस पडला, परंतू नंतर दडी मारलेला पाऊस अद्यापही परतलेला नसल्याने यंदाची रब्बीही गेली आहे. त्यातच शेतकरी पशुधन कसे जगवावे या चिंतेत सापडला असून आर्थिकदृष्ट्याही पिचलेला आहे. शासनाने जाहिर केलेली पिकविम्याची रक्कम अद्यापही शेतकर्‍यांना न मिळाल्याने ऐन सणासुदीत शेतकरी अडचणीत आले आहेत. हाळम, हेळम, दैठणा, धर्मापूरी, गुट्टेवाडी येथील शेतकर्‍यांच्या विम्याची रक्कम तात्काळ बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि महाराष्ट्र ग्रामिण बँकेच्या धर्मापूरी शाखेला द्यावेत अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. या निवेदनावर ग्रा.पं.सदस्य सुरेश दहिफळे, संतोष गुट्टे, सुबोध दहिफळे, देविदास दहिफळे, संदीपान गित्ते, मंचक गुट्टे, गोविंद गुट्टे, देवनाथ दहिफळे, मधुकर सुखदेव दहिफळे, मारूती नारायण मुंडे, अभय मुंडे, मनोज गित्ते, प्रल्हाद गुट्टे, संभाजी गुट्टे, नंदराज पिंटुळे, अजय गित्ते, केशव गुट्टे, लहुदास गुट्टे, सोमनाथ गित्ते, विनायक श्रीराम गुट्टे, विष्णू मुंडे, दीपक उध्दव गुट्टे, ग्रा.पं.सदस्य गोविंद पाटलोबा गुट्टे, धनराज दहिफळे, अमोल गुट्टे, प्रल्हाद मुंडे, दिपक गुट्टे, सुधाकर गुट्टे, सुधाकर दहिफळे, अंकुश गुट्टे, गणेश दहिफळे, महादेव दहिफळे, कृष्णा दहिफळे यांच्यासह शेकडो शेतकर्‍यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

No comments:

Post a Comment