तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 28 November 2018

संगणक परिचालकांच्या मागण्यांना त्वरित न्याय द्या ; अन्यथा तेच तुम्हाला सत्तेतुन खाली खेचतील- धनंजय मुंडे

आझाद मैदानावर धनंजय मुंडेंची विविध आंदोलनकर्त्यांना भेट

मुंबई दि.27........मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्या आंदोलनाला आज राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भेट दिली. गेल्या चार वर्षांपासून 23 हजार संगणक परिचालकांना महाराष्ट्र आय.टी. महामंडळाकडून नियुक्ती मिळावी यासाठी संगणक परिचालक निकराचा लढा देत आहेत. मात्र सरकार त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे. डिजिटल इंडियाचा नारा जपणाऱ्या या सरकारच्या कारभारात संगणक परिचालकांचे मोलाचे योगदान आहे. जे संगणक परिचालक सत्तेवर बसवु शकतात तेच तुम्हाला सत्तेतुन खाली खेचु शकतात, असा कडक इशारा मुंडे यांनी दिला. यावेळी त्यांच्या समवेत आमदार प्रकाश गजभिये, आमदार अनिकेत तटकरे उपस्थित होते.

    या नंतर आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या मराठा क्रांती ठोक मोर्चा, महाराष्ट्र राज्य बेलदार समाज संघटना, अखिल नंदीवाले समाज संघ, राजापूर रिफायनरी बाबत आंदोलन करणारे भारतीय पर्यावरण चळवळ, महाराष्ट्र माथाडी संघटना कृती समिती, नैसर्गिक विना अनुदानित वाढीव वर्ग / तुकडी शिक्षक कृती समिती, महाराष्ट्र राज्य अघोषित शिक्षक समिती, ए.आय.टी.यु.सी. (लालबावटा), विविध ग्रामपंयातीच्या मागण्या करणारे प्रतिनिधी, महाराष्ट्र राज्य आय.टी.आय. निर्देशक संघटना, महाराष्ट्र राज्‍य (कायम) विना अनुदानित शाळा कृती समिती, बिगर आदिवासी हक्क बचाव समिती आदी विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या संस्थांच्या / संघटनांच्या प्रतिनिधींना धनंजय मुंडेंनी भेट दिली.

    दरम्यान पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्याने पालघर जिल्हा पत्रकार संघातर्फे आयोजित केलेल्या धरणे आंदोलनाला धनंजय मुंडे यांनी भेट दिली, तसेच याबाबत सरकारने त्वरित लक्ष घालावे यासाठी आपण प्रयत्न करू याची ग्वाही उपस्थित पत्रकारांना दिली.

No comments:

Post a comment