तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 29 November 2018

कल्याणमध्ये चायनीजच्या दुकानात स्फोट, अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू


___________________________________

कल्याणमध्ये चायनीजच्या दुकानात बुधवारी मध्यरात्री स्फोट झाला असून आग विझवण्यासाठी गेलेल्या अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू झाला आहे. यात आणखी एक जवान गंभीर जखमी झाला आहे.

कल्याण पश्चिमेतील गोल्डन पार्क येथे चायनीजचे दुकान असून या दुकानात रात्री एकच्या सुमारास आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. अग्निशमन दलाचे जवान आग विझवत असतानाच दुकानातील सिलिंडरचा स्फोट झाला आणि या स्फोटात अग्निशमन दलातील जवान जगन आमले यांचा मृत्यू झाला. तर आणखी एक कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. आगीमुळे परिसरातील वीज पुरवठा काही काळासाठी खंडित करण्यात आला होता.

दरम्यान, कल्याण डोंबिवली अग्निशमन दलातील जवानाचा मृत्यू झाल्याची ही महिना भरातील दुसरी घटना आहे. यापूर्वी १ नोव्हेंबर रोजी नेतीवलीतील लोकग्राममध्ये सफाईसाठी विहिरीत उतरलेले तीन जण बुडाल्याची घटना घडली होती. त्या तिघांचा शोध घेण्यासाठी विहिरीत उतरलेल्या अग्निशमन दलाच्या दोन जवानांचाही मृत्यू झाला होता.

No comments:

Post a Comment