तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 4 November 2018

परळी-अंबाजोगाई रस्त्यावर धुळीचेच साम्राज्य अनेकांना जडू लागले श्वसनाचे आजार-दिलीप जोशी


परळी/प्रतिनिधी
परळी-अंबाजोगाई रस्त्याचे काम मागील वर्षभरापासून चालू असून अद्यापपर्यंत एक फुटाचाही रस्ता झालेला नाही. रस्ता दोन्ही बाजूने खोदल्यामुळे वाहनधारक वैतागले असून रस्त्यावर असलेल्या धुळीमुळे आता तर अनेकांना श्वसनाचे आजार जडू लागले आहेत. धुळ असलेल्या रस्त्यावर मागील महिनाभरापासून पाणी टाकणे बंद झाले असून नाका, तोंडात, डोळयात धुळ जात असल्याने नागरिक वैतागल आहेत. दरम्यान दिवाळीपर्यंत रस्त्याचे काम होण्याचे आम्ही वाट पाहु अन्यथा दिवाळीनंतर सरकारचं दिवाळं काढू असा इशारा वंदे मातरम सेनेचे प्रदेशाध्यक्ष दिलीप जोशी यंानी दिलाआहे.
दिलीप जोशी यांनी प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे कि, परळी-पिंपळा या 18 किलो मीटर लांबीच्या रस्त्याचे काम मागील वर्षभरापासून चालू असून वर्षभरात एक फुटाचाही रस्ता पूर्ण झालेला नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजूला खोदकाम झाले असून गिट्टी व धुळ पडल्याने वाहनधारक चांगलेच वैतागले आहेत. मागील वर्षभरात अनेक अपघात होवून अनेकांना अपंगत्व आलेले असतांना आता रस्त्यावरची धुळ नाका, तोंडात जात असल्याने श्वसनाचे आजार होवू लागल्याचे प्रदेशाध्यक्ष दिलीप जोशी म्हणाले.

No comments:

Post a Comment