तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 3 November 2018

कु. पुजा उगले हिची राष्ट्रीय बेसबाॅल स्पर्धेत सलग दुसर्या वर्षी निवड!


प्रतिनिधी
पाथरी: सिमुरगव्हाण येथील पुजा उगले हिने बीड येथे दिनांक १ ते ३ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय बेसबॉल स्पर्धेत नुतन कन्या प्रशाला, सेलु येथील १७ वर्षा खालील मुलींचा संघास चतुर्थ स्थान मिळाले.
या संघातील कु. पूजा उगले हिची इंदापूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धे साठी महाराष्ट्राच्या संघात सलग दुसऱ्या वर्षी निवड झाली आहे. कठोर मेहनत व परिश्रमाच्या बळावरच हे यश तिने संपादित केल्याचे क्रिडा शिक्षकांनी सांगितले. गेल्यावर्षी सांगली येथे झालेल्या ६३व्या राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करत कु.पुजा उगले हिने सुवर्ण पदक पटकावले होते. यावर्षीही राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत तिची सलग दुसर्या वर्षी निवड झाली आहे. खेळा साठी तिला  ढोके , खराटे , श्रीमती खराबे मॅडम,नावाडे या क्रिडा शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या यशामुळे सर्वत्र तिचे अभिनंदन व कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment