तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 2 November 2018

एमईसीबी चे डोके फिरले की काय,जणू काही लाईटीचा दुष्काळ पडला की काय?

बदनापूर प्रतिनिधी अंकुश कदम

बदनापूर तालुक्यातील कंडारी खुर्द तांडा  या गावात जणू लाईट  चा दुष्काळ पडला की काय येथे गेल्या तीन महिन्यांपासून लाईट नाही त्यामुळे सर्व गाव आंधरात जगत आहे .त्यांना जणू काही 1900 च्या काळात जागल्या सारखे भास होत आहे. गावात प्रत्येक घरी वीज कनेक्शन असून 100 % वसुली आहे.तरी सुद्धा या गावाला आंधराच का ? सध्या तर या गावातून 100 हून अधिक गाड्या ऊसतोडणी साठी गेलेल्या आहे . त्यामुळे त्यांनी आपले मुलबाळ शिकण्यासाठी घरी ठेऊन गेले आहे जेणेकरून यांच्यावर तरी अशी वेळ येऊ नये.पण लाईटच नसल्याने कोणत्याच मुलांचे अभ्यास होत नाही.येथील काही मुल मुली शिक्षण घेण्यासाठी अकोला बदनापूर राजूर एवढ्या लांब जाऊन शिक्षण घेत आहे. सध्या प्रथम सत्र परीक्षा चालू असताना लाईट नसल्याने त्यांचे मनोबल कोठेतरी खचत आहे. आम्ही बदनापूर ला जाऊन 5-10-2018   रोजी उपअभियंता चंद्रमोरे साहेब यांना तक्रार अर्ज दिला जालन्याच्या अभियंता साहेबांना फोन करून बोललो तरी काहीच फायदा झाला नाही त्यांच्या कडून नेहमीच उडवा उडविचे उत्तर मिळतात. नेहमी तेल नाही असे उत्तर देतात. दहा दिवसापूर्वी दोन खराब बॉक्स आणून बसवून गेले.ते त्याच दिवशी उडाले विचारले असता म्हणाले की आम्हाला वाटतच होते खराब आहे पण जोडून बघितले असे आमचे लाईनमन गुप्ता साहेब यांनी सांगितले.यांना जर आम्ही पाच दहा हजार रुपये आज दिले तर उद्याच हे dp आणून देतील कारण यांना पहिल्यापासून सवय लावून ठेवलेली आहे.पण सध्याचे वातावरण पाहता यांना पैसे कोण देणार सोमवार पर्यंत यांनी लाईट जोडून नाही दिली तर एकतर त्या dp ला जाऊन चिकटू नाहीतर बदनापूर वीजवितरण केंद येथे जाऊन तीव्र आंदोलन करू ...

✒✒✒✒✒✒✒✒✒✒✒✒✒✒
तेजन्युज हेडलाईन प्रतिनिधी अंकुश पाटील कदम 8390515197
✒✒✒✒✒✒✒✒✒✒✒✒✒✒

No comments:

Post a Comment