तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 4 November 2018

सोनपेठ तालुक्यातील मान्यवरांचा गौरव


तेजन्यूज हेडलाईन्स प्रतिनिधी
सोनपेठ : तालुक्यातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या नऊ ज्येष्ठ मान्यवरांना जिवनगौरव पुरस्कार व विविध क्षेत्रातील 21 यशस्वी मान्यवरांचा सन्मान सोहळा श्री साई स्मारक समिती पाथरी,राष्ट्रभक्ती संस्करण फाऊंडेशन पिंपरी चिंचवड व ओंकार सेवाभावी संस्था पाथरी यांच्या संयुक्त विद्यमाने श्री साईबाबा समाधी शताब्दी महोत्सव समारोप वर्ष व राष्ट्रपिता महात्मा गांधी शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्षाच्या निमित्ताने साईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी येथे दि. 8 नोव्हेंबर 2018 रोजी आयोजीत करण्यात आला असल्याचे डॉ. जगदिश शिंदे व इंजि. नितीन चिलवंत यांनी कळवले आहे.
सोनपेठ तालुक्यात विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या नऊ मान्यवरांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार असुन यामध्ये मा. आ. व्यंकटराव कदम  (राजकीय, सामाजिक क्षेत्र) सतिशराव देशमुख  (पत्रकारिता),  मा. प्राचार्य माणिकराव निलंगे ( शैक्षणिक दर्जा ), ह. भ. प. गोपीनाथराव पवार ( सांप्रदायिक, अध्यात्मिक  ), बालमुकुंदजी सारडा
( सार्वजनिक कार्य), इंजि. चंद्रकांत लोमटे (सामाजिक कार्य),भुजंगराव हुंबे ( ग्रामीण सामाजिक कार्य), मेजर गौतम गायकवाड ( माजी सैनिक, भारतीय सैन्यातील कार्य), मुंजाभाऊ खोसे (कब्बडीपटू क्रिडाक्षेत्र ) यांचा जिवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असुन विविध क्षेत्रातील यशस्वीतेसाठी चंद्रकांत राठोड, बालाप्रसाद मुंदडा, ह. भ. प. सोमनाथ महाराज बदाले, प्रा. डॉ. मारोती कच्छवे, शिवमल्हार वाघे, आशोक खोडवे, डी. के. पवार, राजेश्वर खेडकर, महेश जाधव, महेश कोरडे, बापुराव शिंदे, डॉ. महेश बाहेती, ज्ञानेश्वर भंडारे, श्रीराम राठोड,  डॉ. मोहन देशमुख,  सुधीर बिंदू, डॉ. भगवान कोरडे, डॉ. भगवान देशमुख, राकेश मेहता, शेषेराव राठोड,  सचिन काटे आदींचा सन्मान करण्यात येणार आहे. असे प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. जगदिश शिंदे, इंजि. नितीन चिलवंत यांच्याकडून कळवण्यात आले आहे.
या पुरस्काराबद्दल सोनपेठ येथील रोटरी क्लबच्या वतीने अध्यक्ष रो. प्रदीप गायकवाड, रो. प्राचार्य डॉ. वसंतराव सातपुते, किरण चौलवार, डॉ. सुभाष पवार, परमेश्वरराव कदम,  प्राचार्य मुंजाभाऊ धोंडगे, गिरीश गावरस्कर, जगन्नाथ घोडके, संजय राख, आनंत जाधव,  जयसिंग देशमुख, संजय काबरा, लिंबाजी कागदे, राजाभाऊ कराड,  मिलिंद रूद्रवार, नागनाथ सातभाई, बबन पवार, संजय आडे,सिद्रामअप्पा महाजन, प्रमोद गावरस्कर, सुभाषअप्पा नित्रुडकर,  अनिल शेटे, शाम निरस, सुहास काळे, संजय इंदूरकर, गजानन घोडे, घनशामदास झंवर, प्रा. विठ्ठल जायभाये, प्रा. डॉ. संतोष रणखांब, बालाजी इंगोले व सर्व रोटरीयन  आदींनी अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment