तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 4 November 2018

औषधी वनस्पती कडू लिंबावर आळ्यांचा हल्ला

प्रतिनिधी
पाथरी:-आयुर्वेदात औषधी वनस्पती म्हणून ज्या झाडाला अनन्य साधारण महत्व आहे त्याच झाडां वर हिरव्या अळीने हल्ला चढवला असून संशोधकां पुढे मोठे आव्हान उभे केले आहे.
कडू लिंबाला औषधी वनस्पती म्हणून ओळखले जाते.अनेक रोगां वर उपाय म्हणून लिंबांच्या पानांच्या रसाचा उपयोग होत असतो. शेतात उभ्या पिकांवर फवारणी करण्या साठी निम अर्क,लिंबोळी अर्क तयार करून रोगांचा नायनाट केला जातो.लिंबांचे झाड ,त्याची पाने,साल,लिंबोळी हे सर्वच चवीला कडू असते मात्र याच लिंबाच्या पानां वर काड्यां वर आता हिरव्या आळ्यांनी हल्ला चढवला असून या पुर्वी 2016 मध्येही अशाच प्रकारे लिंबाच्या झाडावर अळ्यांनी  हल्ला करून पुर्ण झाडं निश्पर्ण  केले होते. पाथरी शहरातील जायकवाडी परीसरातील स्व नितिन महाविद्यालयाच्या पाठी मागे देवनांद्रा रस्त्या लगत असलेल्या या लिंबाच्या झाडाचा अर्धा अधिक भाग अळ्यांनी खाल्ला असून या सह अनेक लिंबाच्या झाडां वर  हिरव्या अळयांनी हल्ला करून पाने खाने सुरू केले आहे. एवढ्या कडू पणा असलेल्या झाडावर जर किड आक्रमण करत असेल तर आता त्याच्या गुणधर्मा विषयी शंका उपस्थित होत असून संशोधकां साठी हे एक आव्हाण असल्याचे सागितले जात आहे.

No comments:

Post a Comment