तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 28 November 2018

बदनापूर येथील आठवडी बाजार स्थलांतरित होऊ देणार नाही -संजय जऱ्हाड


बदनापूर, (अंकुश कदम) :  येथील आठवडी बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीतून हटवण्याचा घाट घातला जात असून तो आहे तेथेच राहू द्यावा अशी मागणी संजय जऱ्हाड यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. जुनी जागा अपुरी असून कृषी उत्पन्न बाजार समितीत बाजार गेल्यापासून या बाजारात चार पट वाढ झालेली आहे. त्यामुळे हा बाजार स्थलातरीत करू नये अशी मागणी या निवेदनात आहे. बदनापूर येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन हा बाजार कृषी उत्पन्न् बाजार समितीतून स्थलांतरीत करण्यात येऊ नये अशी मागणी केल्यामुळे बाजाराचा प्रश्न आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. अखिल भारतीय छावा संघटनेचे संजय जऱ्हाड यांनी या बाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन बाजार स्थलातरीत करू नये अशी मागणी केली आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, कृषी उत्पन्न्‍ बाजार समितीच्या मैदानात अतिशय सुरक्षित व स्वच्छ जागा असून येथेच हा बाजार राहावा. याचिका क्रमांक 7371/2016 मध्ये तत्कालिन मुख्याधिकारी यांनी राजकीय दडपणाखाली येऊन शपथपत्र दाखल केलेले होते. त्यानुसार गट क्रमाक 110 मध्ये हा बाजार स्थलांतरीत करावा, अशी असे म्हटले होते. वास्तविक पाहता गट क्रमांक 110 मधील जागा अडवळणी, अपुरी, व कोणतीही सुविधा नसलेली आहे. रस्ता अत्यंत खरात अवस्थेत आहे. तसेच या जागेचा उपयोग कचरा टाकण्यासाठी होतो तसेच पावसाळयात या ठिकाणी प्रचंड प्रमाणात चिखल व घाण होते. तसेच येथे मुस्लिम कब्रस्थान तसेच हिंदू स्मशानभूमी आहे, त्यामुळे शुक्रवारी एखाद्याचा अत्यंविधी करावयाचा असल्यास बाजारातून जावे लागते अशा वेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तसेच समोर मारोती मंदिर आहे या मंदिरातही विवाहासाठी वरात काढण्यात येते त्यामुळे शुक्रवारी विवाह असेल तर अडचण निर्माण होते. तसेच राजूर-पैठण रस्ताही याच ठिकाणाहून जातो तोच रस्ता समोर रेल्वेस्टेशन कडे जातो. या रस्त्यावर चार ते पाच शाळा असल्यामुळे विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठीसुध्दा अडचण निर्माण होते. अशी परिस्थिती असतानाही तत्कालिन मुख्याधिकारी यांनी राजकीय दबावाला बळी पडत वास्तवाला दिशाभूल करणारे शपथपत्र न्यायालयात दिले. या शपथपत्रात त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती मैदान हे गावापासून अतिशय दूर आहे. तेिो कोठलीही सुविधा नाही असे लिहिलेले आहे. ते अतिशय खोटे असून 4 जुलै 2016 रोजी तहसीलदार यानी अहवाल जिल्हाधिाकरी कार्यालयात सादर केलेला होता त्या अहवालानुसार कृषी उत्पन्न बाजार समिती मैदानात 40 ते 50 फूट रस्ता असून तेथे पावसाळयात चिखल होत नाही, बाजार समितीतर्फे पिण्याच्या पाण्याची सोय आहे, असे सांगितलेले असतनाही मुख्याधिकाऱ्यांनी या उलट शपथपत्र दाखल केल्यामुळे बाजार स्थलांतराचा घाट घातला जात आहे.  त्यामुळे गट क्रमांक 110 मधील अपूर्ण वर्दळीच्या रस्त्यावर बाजार भरवणे उचित नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी स्वत: पाहणी करून सदर बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानातच राहू द्यावा, अशी मागणी करण्यात आलेली आहे. जर हा बाजार हलवण्याचा प्रयत्न झाल्यास तीव्र जन आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. या निवेदनावर प्रदीप राठोड, गजानन नागरे, आर. के. टेलर्स, बाबासाहेब खैरे, शेख बाबा, अमोल जोशी, आदींसह अनेक गावकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
-----------------------------------      -----------------------------------
तेजन्युज तालुका प्रतिनिधी अंकुश पाटील कदम 8390515197
----------------------------------
----------------------------------

No comments:

Post a Comment