तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 29 November 2018

संस्कार प्राथमिक शाळेत महात्मा फुले यांची पुण्यतिथी साजरी

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
                आज दि. २८ नोव्हेंबर रोजी संस्कार प्राथमिक शाळा पद्मावती व विद्यानगर या दोन्ही विभागात महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पद्मावती शिक्षण संस्थेचे सचिव श्री दिपकजी तांदळे सर तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती गित्ते पी.आर. मॅडम यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

            यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी भाषणे केली. यानंतर पद्मावती शिक्षण संस्थेचे सचिव श्री दिपकजी तांदळे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले कि," महात्मा फुले यांनी  शिक्षणाचे महत्त्व पटवून देणाऱ्या खालील ओळी प्रसिद्ध आहेत - विद्येविना मती गेली ।मतीविना नीती गेली ।नीतीविना गती गेली ।गतीविना वित्त गेले ।वित्ताविना शूद्र खचले।इतके अनर्थ एका अविद्येने केले ।। बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्रय आणि समाजातील जातिभेद पाहून त्यांनी ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निश्चय केला. त्यांनी इ.स. १८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाडयात पहिली मुलींची शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाची ही मुहूर्तमेढ ठरली. तसेच अस्पृश्य मुलांसाठी त्यांनी पुण्यात  इ.स.१८५२ मध्ये शाळा स्थापन केली. त्यांच्या या कार्याला सनातन्यांकडून सतत विरोध होत असे. पण जोतीराव आपल्या भूमिकेवर ठाम असत. जोतीरावांनी पत्‍नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई. त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले हे पहिले भारतीय होते. त्यांच्या या कार्यातून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी आपली प्रगती साधावी असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले" या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक श्री उरगुंडे सर यांनी तर आभार प्रदर्शन श्री केंद्रे सर यांनी मानले.

No comments:

Post a Comment