तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 2 November 2018

गेवराई येथील अनमोल विद्यालयात कार्यशाळा संपन्न

सुभाष मुळे..
---------------
गेवराई, दि. 2 ( वार्ताहर ) येथील अनमोल प्राथमिक विद्यालयात दीपावली निमित्त विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शुक्रवार, दि. 2 रोजी सकाळी दहा वाजता विद्यार्थी व शिक्षक कार्यशाळा मोठ्या थाटात संपन्न झाली.
       या कार्यशाळेत शाळेच्या अध्यक्षा वैशाली देशमुख, कार्यवाहीका शिल्पा घोटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थी व शिक्षक यांच्या प्रमुख सहभागाने विविध उपक्रम यावेळी राबविण्यात आले. दीपावली सणाच्या सजावटीसाठी लागणार्‍या साहित्याची निर्मिती या कार्यशाळेत करण्यात आली. सजावटी मध्ये आकाश कंदील, पणत्या, तोरणे, फुलांच्या माळा , शुभचिन्ह , गिफ्ट पाॅकेट , रांगोळ्या, मातीचे किल्ले तयार करून माहिती व मार्गदर्शन करण्यात आले.
      दीपावली, वसुबारस, पाडवा ,भाऊबीज दिनाचे महत्त्व यावेळी विद्यार्थ्यांना सांगितले. शाळेच्या शिक्षिका राणी पिंपळे, शोभा काकड़े, सारिका देशपांडे, सविता देशपांडे, विराली मिसाळ, पूर्वा पाठक,अश्विनी परदेशी, दिपाली कुलकर्णी, खांडके सर, रूपनर सर यांनी कार्यशाळेसाठी मार्गदर्शन करून सामूहिक फराळ करण्यात आला.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a Comment