तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 28 November 2018

संत सावता मंदिर सभागृहात महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

बदनापूर, दि. 27 (अंकुश कदम): येथील संत सावता मंदिर सभागृहात महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
बदनापूर येथे महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त संत सावता मंदिर सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला नगरसेवक गोरखनाथ खैरे, राजू अहिरे, शिवसेना शहर संघटक कैलास खैरे,युवासेना शहरप्रमुख सुनील बनकर, सावता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब खैरे, गोरख रसाळ, अण्णाभाऊ साठे महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक अनिल म्हस्के, जालना जिल्हा व्यवस्थापक विकास कुंटुरकर, दामोदर खैरे, राजू कानडे, सचिन खैरे,  सचिन नेमाने, अतिष राठोड आदींची उपस्थिती होती. या वेळी झालेल्या कार्यक्रमात गोरखनाथ खैरे यांनी उपस्थिताना मार्गदर्शन करताना सर्वांनी शिक्षित होण्याची गरज व्यक्त करून महिला सबलीकरण होण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. महात्मा फुलेंचे विचार अंगिकारले तर सामाजिक बदल होईल असे प्रतिपादन केले.  या वेळी राजू अहिरे यांनीही महात्मा फुले यांच्या कार्याचा यथोचित गौरव केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील बनकर यांनी तर संचलन व आभार प्रदर्शन माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमृत तारो यांनी मानले. या वेळी मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.
-----------------------------------
-----------------------------------
तेजन्युज हेडलाईन प्रतिनिधी अंकुश कदम पाटील 8390515197
-----------------------------------
-----------------------------------

No comments:

Post a Comment