तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 28 November 2018

अट्टल दरोडेखोराच्या पुणे येथे आवळल्या मुसक्या

परळी ग्रामीण पोलिसांची दबंग कामगिरी

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी  तालुक्यातील नंदागौळ येथील अट्टल कुख्यात दरोडेखोर गोट्या गित्ते या आरोपीला पुणे शहरातील सांगवी  येथून दि.26 रोजी पकडून परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात घेऊन येऊन औरंगाबाद येथील हर्सूल कारागृहात रवानगी  करण्यात आले असल्याची माहिती परळी ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस  निरीक्षक सुरेश चाटे यांनी माहिती दिली.

    याबाबत सविस्तर वृत्त असे की, परळी तालुक्यातील नंदागौळ येथील रहिवाशी असलेल्या कुख्यात  समजला जाणारा गुन्हेगार आरोपी ज्ञानोबा उर्फ गोट्या मारोती गित्ते वय (29) याला परळी ग्रामीण पोलिस ठाण्याच्या पोलीस पथकाने अटक केली.  त्याच्यावर परळी तालुक्यासह अनेक जिल्ह्यातील व अनेक ठिकाणी खंडणी,दरोडे, घरफोड्या, लुटमार सह इतर टाकलेल्या अनेक प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. खंडणी,दरोड्याच्या गुन्ह्यातील परळी ग्रामीण पोलिसांना हवा असलेला आरोपी ज्ञानोबा उर्फ गोट्या गित्ते हा पुणे येथील सांगवी परिसरात  असल्याची गोपनीय माहिती पोलीस उपनिरीक्षक विकास आडे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलिस निरीक्षक सुरेश चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली व सुचनाप्रमाणे पथकाने सापळा रचून ज्ञानोबा उर्फ (गोट्या) गित्ते याला ताब्यात घेतले.

      परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात अंतर्गत दोन विशेष पथक नियुक्त  करण्यात आले होते. ह्या पथकातील एका पथकाला  कुणकुण लागतात  पुणे शहरातील सांगवी परिसरात  येथे 26 नोव्हेंबर रोजी रात्री कुख्यात दरोडेखोर ज्ञानोबा उर्फ गोट्या मारोती गित्ते या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या. दरम्यान आरोपीच्या विरोधात अनेक जिल्ह्यातून  हद्दपार व विविध प्रकारच्या गुन्हे दाखल असलेल्या  गुन्हगाराला महाराष्ट्र झोपडपट्टी (दादा) कायदा (एम.पी.डी.ए) च्या अंतर्गत ही दबंग कारवाई करण्यात आले आहे. तसेच पुणे पोलिसांच्या मदतीने परळी ग्रामीण पोलीसानी हि कारवाई केली आहे  ही कारवाई परळी ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुरेश चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विकास आडे, पोलिस कर्मचारी राजाराम राऊत, हरीदास गित्ते, शिवाजी गोपाळघरे यांनी सापळा रचून ही कारवाई केली.या कामगिरी मुळे परळी परिसरातील जनतेत समाधान व्यक्त करुन पोलीसांचे कौतुक केले जात आहे.

No comments:

Post a Comment