तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 28 November 2018

अण्णाभाऊ साठे महामंडळाला निधी उपलब्ध करून देवू - ना. पंकजाताई मुंडे मुंबईत उत्साहात पार पडला मातंग समाजाचा महामेळावा मुंबई, दि.२८ ------ मातंग समाजाच्या उत्थानासाठी अण्णाभाऊ साठे महामंडळाला मोठा निधी उपलब्ध करून देण्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी येथे सांगितले. भारतीय जनता पार्टीचा घटक पक्ष आणि महाराष्ट्र परिवर्तन सेना यांच्या संयुक्त विद्यमाने आज यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात मातंग समाजाचा राज्यव्यापी महामेळावा उत्साहात पार पडला त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार माधुरी मिसाळ, धनराज थोरात यांची यावेळी प्रमुख उपस्थित होती. ना. पंकजाताई मुंडे पुढे बोलतांना म्हणाल्या की, भारतीय जनता पक्षाचे सरकार हे गरीब, पिडीत आणि वंचितसाठी प्राधान्याने काम करीत आहे. मातंग समाजाचा विकास करण्यासाठी सरकार विविध योजना आणत आहे. विकास शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून समाजातील सर्वांना न्याय देण्यासाठी आम्ही काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी मागासलेल्या समाजाला स्वभिमानाने जगण्याची शिकवले आहे. जनतेचे समाधान हेच आपले समाधान ही शिकवण मुंडे साहेबांची आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन काम करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्या म्हणाल्या. मेळाव्यास राज्याच्या विविध भागांतून मातंग समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ••••

अण्णाभाऊ साठे महामंडळाला निधी उपलब्ध करून देवू - ना. पंकजाताई मुंडे

मुंबईत उत्साहात पार पडला मातंग समाजाचा महामेळावा

मुंबई, दि.२८ ------ मातंग समाजाच्या उत्थानासाठी अण्णाभाऊ साठे महामंडळाला मोठा निधी उपलब्ध करून देण्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे  राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी येथे सांगितले.

     भारतीय जनता पार्टीचा घटक पक्ष आणि महाराष्ट्र परिवर्तन सेना यांच्या संयुक्त विद्यमाने आज यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात मातंग समाजाचा राज्यव्यापी  महामेळावा उत्साहात पार पडला त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार माधुरी मिसाळ, धनराज थोरात यांची यावेळी प्रमुख उपस्थित होती.

  ना. पंकजाताई मुंडे पुढे बोलतांना  म्हणाल्या की, भारतीय जनता पक्षाचे सरकार हे गरीब, पिडीत आणि वंचितसाठी प्राधान्याने काम करीत आहे. मातंग समाजाचा विकास करण्यासाठी सरकार विविध योजना आणत आहे. विकास शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून समाजातील सर्वांना न्याय देण्यासाठी आम्ही काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

    लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी  मागासलेल्या समाजाला स्वभिमानाने जगण्याची शिकवले आहे. जनतेचे समाधान हेच आपले समाधान ही शिकवण मुंडे साहेबांची आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन काम करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्या म्हणाल्या. मेळाव्यास राज्याच्या विविध भागांतून मातंग समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
••••

No comments:

Post a Comment