तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 4 November 2018

छ.संभाजी महाराज व्यायाम शाळेचे आज खा.प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन


कार्यक्रमास उपस्थित रहावे-प्रा.गंगाधर शेळके
परळी,(प्रतिनिधी):-संत तुकाराम भाडेकरू मालकी सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या. परळी वैजनाथ प्रणीत छत्रपती संभाजी महाराज व्यायामशाळेचे बीड जिल्ह्याच्या लोकप्रिय खा.डॉ.प्रितमताई गोपीनाथराव मुंडे यांच्या हस्ते दि.5 नोव्हेंबर 2018 सोमवार रोजी दुपारी 4 वा. उद्घाटन सोहळा आयोजीत करण्यात आला असल्याची माहिती संस्थेचे  अध्यक्ष गंगाधर शेळके यांनी दिली.
    या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजलगाव मतदारसंघाचे  आ.आर.टी.देशमुख हे राहणार असुन प्रमुख पाहुणे म्हणून जवाहर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, वैद्यनाथ बँकेचे चेअरमन अशोक जैन,  महाराष्ट्र केसरी शिवाजी केकान, जवाहर एज्युकेशन सोसायटीचे सचिव दत्ताप्पा ईटके, संचालक डॉ.हरिश्‍चंद्र वंगे,  वैद्यनाथ देवल कमेटीचे सचिव राजेश देशमुख,वैद्यनाथ बँकेचे माजी अध्यक्ष विकासराव डुबे,म.रा.सं.पनन महासंघाचे संचालक ऍड.विष्णूपंत सोळंके, कल्याणकारी बहुद्देशीय प्रतिष्ठाणचे अध्यक्ष सुरेश टाक आदी मान्यवरांंची उपस्थिती राहणार आहे.
         या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित
रहावे असे आवाहन संत तुकाराम भाडेकरू मालकी सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष गंगाधर शेळके, सचिव वसंत सुर्यवंशी, उपाध्यक्ष वैजनाथ सोळंके, वैजनाथ भास्कर, कोषाध्यक्ष संजय देशमुख, संचालक सुभाष नानेकर, लक्ष्मण चव्हाण, रणजीत सोळंके, राजेश ठोंबरे, सुनिल देशमुख, दिनेश कापसे, श्रीराम गरड, नागेश गवळी, भगवान कळसे, बालासाहेब जगताप, सौ.ज्योती मराठे, सौ.सविता टाक यांच्यावतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment