तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 2 November 2018

शासकीय अधिकाऱ्यां विना होणारा पिक कापणी प्रयोग शेतकऱ्यांनी पाडला बंद .


तेजन्यूज हेडलाईन्स प्रतिनिधी
चौकशीची मागणी
सोनपेठ : सोनपेठ तालुक्यातील वैतागवाडी येथे ईफ्को टोकीयो या इन्शुरन्स कंपनीच्या वतीने घेण्यात येणारा पिक कापणी प्रयोग शासकीय अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत चालु असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी तो बंद पाडला.
तालुक्यातील वैतागवाडी येथील हनुमान भागवत निळे यांच्या शेतात कापसाच्या दुसऱ्या वेचणीचा पिक कापणी प्रयोगास कुठलाही शासकीय अधिकारी उपस्थित नसल्याचे रासपा चे तालुका अध्यक्ष राम मरगळ यांनी आक्षेप घेतला व पिक कापणी प्रयोग बंद करून या बाबत तक्रार केली .व पिक कापणी साठी आलेल्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना बसवुन ठेवले त्यानंतर मंडळ अधिकारी कराड व इतर शासकीय कर्मचारी हजर झाले.पण या पिक कापणी प्रयोगाचा पंचनामा झाल्याशिवाय कुठल्याही कर्मचाऱ्यांना जाऊ न देण्याची भुमिका शेतकऱ्यांनी घेतली त्यामुळे तहसीलदार जिवराज डापकर यांनी संबधित शेतावर जाऊन सदरील पिक कापणी प्रयोगाचा पंचनामा केला व या प्रकरणाची चौकशी करून दोषी कर्मचारी यांच्यावर कारवाई.करणार असल्याचे सांगितले. पिक कापणी प्रयोग करतांना गाव पातळीवर असलेल्या समितीच्या सर्व सदस्यांनी हजर राहाणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. या बाबत कंपनीला स्पष्ट सुचना देण्यात येतील असे सांगितले .या वेळी शेतकरी संघटनेचे सुधीर बिंदू ,अमोल बचाटे,आण्णा जोगदंड यांच्या सह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment