तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 2 November 2018

माजलगांव मतदार संघातील आमदारांना बंजारा समाजाला विसरले - रोहिदास पवार

आजी माजी आमदार फक्त बंजारा समाजाचा मताचा वापर केला.

या पुढे दोघांना बंजारा समाज आपली जागा दाखवणार

माजलगांव मतदार संघात बंजारा समाज स्वबळावर लढणार

बीड (प्रतिनिधी): गेल्या अनेक वर्षांपासून माजलगांव मतदार संघात सोंळकेची सत्ता होती . एक हाती सत्ता असल्याचे माजलगांव मतदार संघातील 125हुण अधीक तांडा विकासापासुन कोसो दुर आहे मागील 15 वर्षीत प्रकाश सोंळके यांनी तांडा फक्त मतदान गिळण्यासाठी  वापर केला होता .यामुळे बंजारा समाज सर्वांनी एकत्र येत सत्ता परिवर्तन करण्याचे ठरवून आर.टी देशमुख यांना बहुमतानी निवडून बंजारा समाज सत्ता परिवर्तन केले परंतु फक्त नावापुरते ते सत्ता परिवर्तन केले .बंजारा तांड्याचा विकास माञ कसलाही झाला नाही आ. देशमुख यांना निवडुन अल्याच्या नंतर आतापर्यंत 4 वर्षात आमदारांनी माजलगांव मतदार संघातील एकही तांड्याना आमदार निधीतुन विकासनिधी तर दिलाच नाही परंतु तांड्याची साधी हाल चाल विचार पुस पण केली नाही.
निवडणूकी पुर्वी तांडा तांडा फिरूण अश्वासनावर अश्वासन दिले की रस्ता करू तांड्याचा पाणी प्रश्न सोडवू तांड्याचा विज प्रश्न सोडवू असे अनेक अश्वासनाची खैरात सोडली माञ आतापर्यंत एक ही अश्वासन पुर्ण केली नाही.
आ. देशमुख यांनी माजलगांव मतदार संघातील बंजारा समाजाला विसरले असे आरोप बंजारा समाजाचे नेते रोहिदास पवार यांनी केला आहे.
मतदार संघातील बहुतांश तांड्याची लोकसंख्या व मतदार संख्या जास्तीची असतांनाही तांड्यांना विकासापासुन वंचित राहावे लागत आहे. भारताला स्वातंत्र्याच्या 71 वर्षानंतरही तांड्याचा कसलाही विकास झालेला नाही आणी विकासाचा निधीही तांड्यापर्यंत पोहचला जात नाही . यासाठी 2019 मध्ये ना देशमुख ना सोंळके अता आपलाच झेंडा अन आपलाच दंडा ही ठाम भुमिका घेऊन बंजारा समाज 2019 च्या निवडणुकीत उतरणार असल्याचे ही माहिती पवार यांनी सांगितले. बीड जिल्ह्यातील माजलगांव,गेवराई या मतदार संघात बंजारा समाज दंड ठोकून रिंगणात उतरणार असल्याचे ही रोहिदास पवार यांनी सांगितले .

No comments:

Post a Comment