तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 5 November 2018

सेनगाव येथे सिएम क्रिकेट चषकाचे उदघाटन उत्साहात संपन्न

(या स्पर्धेला चांगला प्रतिसाद हिंगोली विधानसभा अंतर्गत एकुण 60 संघानी घेतला प्रवेश)

सेनगाव:-येथील तोष्णीवाल काँलेजच्या मैदानावर देशातील सर्वात मोठा कला व क्रिडा महोत्सवा निमित्त सिएम चषक स्पर्धेतील हिंगोली विधानसभा अंतर्गत आ.तानाजीराव मुटकुळे व हिंगोली नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांनी आयोजीत केलेल्या क्रिकेटच्या खुल्या सामन्याचे उदघाटन भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष दिनकरराव देशमुख यांच्या हस्ते व इंजि.अभिजीत देशमुख यांच्या अध्यक्षेतेखाली दि.05 नोव्हेंबर सोमवार रोजी सकाळी 11 वाजता संपन्न झाले.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणुन हिंगोली भाजपा शहराध्यक्ष विरकुँवर अन्ना,प्रा.दुर्गादास साकळे,गणेश बांगर,क्रिडा अधिकारी पाठक साहेब,गंगावणे,तोष्णीवाल काँलेजचे शिंदे सर,युवानेते तथा कार्यक्रमाचे संयोजक शिवाजीराव मुटकुळे,जि.प.सदस्य घोगरे,के.के.शिंदे,भाजपा किसान मोर्चा सेनगाव तालुकाध्यक्ष पंडीत तिडके,पुरुषोत्तम गडदे,शंकर बोरुडे,कांतराव कोटकर,भाजपा महिला आघाडीच्या सौ.मरडे ताई,शंकरराव देशमुख, शहराध्यक्ष कैलास खाडे,नगरसेवक डाँ.साहेबराव तिडके,दिपक फटागंळे,बबन सुतार,अमोल तिडके,बाळु,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विजय डोखळे,गजानन उगिरे,महादेव धोतरे,गंगाधर गांजरे,गजानन नायक,मनोज तिवारी,मारोतराव कालबांडे,माणिक लोडे,विजय धाकतोडे,संतोष नेता आदीसह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.या क्रिकेटच्या खुल्या सामन्याला भरघोष प्रतिसाद मिळाला असुन हिंगोली विधानसभा अंतर्गत 60 संघानी प्रवेश घेतल्याची माहीती भाजपा किसान मोर्चोचे सेनगाव तालुकाध्यक्ष पंडीत तिडके यांनी दिली.

No comments:

Post a Comment