तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 28 November 2018

अयोध्येला जाऊन आलेल्या बहाद्दर शिवसैनिक संजय कुकडे यांचा शिवशैनिकांच्या वतीने सत्कार

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-

शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे साहेब चलो अयोध्या यांच्या आदेशाला धावून जाणारे निष्ठावंत शिवसेनेचे संजय कुकडे शिवसैनिकांना घेऊन आयोध्येला जाऊन पहिले मंदिर फिर सरकार हर हिंदु यही पुकार नारा देत श्री प्रभुरामाचे दर्शन घेवून परळीला शिवसैनिकां सोबत आल्यास त्याचा जाहिर सत्कार शिवसेना माजी शहर प्रमुख भोजराज पालीवाल यांच्या संपर्क कार्यालयात घेण्यात आला.
यावेळी संजय कुकडे यांना शिवसेनेचे जेष्ठ नेते नारायणराव सातपुते भाऊराव भोयटे, रविंद्र परदेशी,जगन्नाथ साळुंके, भारतीय विद्यार्थी सेना तालुका प्रमुख महेश केंद्रे शिवसेना शहर सचिव प्रकाश साळुंके, बाळु देशमुख, सचिन स्वामी, संजय गावडे, रवि गौड, शाखा प्रमुख विजय जाधव, हरिष पालीवाल, बाबुलाल पिंपळे, कैलास चौधरी यांनी शाल, फेटा, पुष्पहार घालून जाहिर सत्कार केला.

No comments:

Post a comment