तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 3 November 2018

पिलीव पोलिसांची हातभट्टी निर्मिती करणार्यावर बेधडक कारवाई...!


---------------------------------------------------------------
पिलीव/सुजीत सातपुते
माळशिरस तालुक्यातील सुळेवाडी गावामध्ये हातभट्टी दारु निर्मिती केली जात असल्याची खबर मिळालेवरुन पोलिस निरीक्षक विश्वंभर गोल्डे व पोलिस उपनिरीक्षक प्रमोद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली अभिजीत मोहळकर व स्वप्निल गायकवाड यांनी खबर मिळालेल्या कळंबाच्या तलावालगत अचानक छापा टाकला असता चिलारीच्या झुडटपात हातभट्टी दारु निर्मिती करत असल्याचे आढळून आल्याने उमाजी सुभाष बोडरे रा.सुळेवाडी यास हातभट्टीची दारु निर्मिती करित असताना त्यास ताब्यात घेवून सदर ठिकाणचे बॕरल व गुळ मिश्रित 2400 लिटर रसायन व ड्रम असा एकूण 36500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून सदर मुद्देमालाचा पंचा समक्ष पंचनामा करुन उमेश सुभाष बोडरे याच्या विरोधात पिलीव औट पोस्टला गुन्हां नोंद करण्यात आला आहे.सदर कामगिरीबद्दल अभिजीत मोहळकर व स्वप्निल गायकवाड यांचे पोलिस निरीक्षक विश्वंभर गोल्डे व पोलिस उपनिरीक्षक प्रमोद सुर्वे यांनी कौतुक करुन अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment