तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 4 November 2018

सेलू-जिंतूर मतदार संघात सीएम चषक स्पर्धेचे आयोजन-- माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर

राज्यात२८८विधानसभा मतदारसंघात स्पर्धा.

सेलू  : प्रतिनिधी

संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामीण भागात तरुणांना मैदानी खेळांचे आकर्षण निर्माण व्हावे, यासाठी २८८विधानसभा मतदारसंघात सीएम चषक स्पर्धांचे आयोजन करण्यात  असल्याची माहिती माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी दिली.  भारतीय जनता पक्षाच्या बसस्थानक परिसरात असलेल्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत शुक्रवार २ नोव्हेंबर रोजी बोलत होते. यावेळी बाजार समिती चे सभापती रवींद्र डासाळकर, डॉ. ऋतूराज साडेगावर,अशोक खताळ,जनार्दन सोळंके अदि उपस्थित होते. पुढे बोलताना ते म्हणाले की सेलू -जिंतूर विधानसभा मतदार संघात आयोजित, सीएम चषक स्पर्धेसाठी८  नोव्हेंबर पर्यंत ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणी करण्यात येणार आहे. एक नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या नोंदणी मध्ये क्रिकेटचे ७० संघ, कबड्डीचे १२ संघ, तर वैयक्तिक८०० खेळाडूंनी नोंदणी केली आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक खेळाडूंच्या आवडी प्रमाणे खेळात सहभाग नोंदवता  यावा, यासाठी स्पर्धेचा प्रसार आणि प्रचार ग्रामीण भागापर्यंत करण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंची संख्या लक्षात घेऊन सेलू- जिंतूर तालुक्यामध्ये सुसज्ज क्रीडांगणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. सेलू -जिंतूर तालुक्यात १२ नोव्हेंबर  पासून प्रत्यक्ष स्पर्धांना सुरुवात होणार असल्याची माहिती यावेळी माजी आमदार बोर्डीकर यांनी दिली आहे.

महिलांचा लक्षणीय सहभाग

सेलू-. जिंतूर तालुक्यात स्पर्धांचे नियोजन मेघना बोर्डीकर यांच्याकडे असल्याकारणाने रांगोळी स्पर्धा मध्ये लक्षणीय असा २५ हजार महिलांना सहभागाची  संधी उपलब्ध होणार आहे. प्रत्येक पंचायत समिती गणात याची नोंदणी करण्यात येईल, तसेच महाविद्यालयीन विद्यार्थिनी सोबत ग्रामीण भागातील महिलांना स्पर्धेत  सहभाग नोंदवता येईल असेही ते म्हणाले.

शासनाच्या योजना बरोबर  स्पर्धाहि  यशस्वी होणार.

संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष सरकारची चार वर्षे पूर्ण  झाल्याने एकाच वेळी आयोजित स्पर्धांना विविध यशस्वी योजनांची नाव देण्यात आले आहे. त्यामुळे योजना यशस्वी झाल्या म्हणून सेलू -जिंतूर तालुक्यात स्पर्धा देखील यशस्वी होतील, असेही माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर म्हणाले. सीएम चषक म्हणून ८क्रीडा स्पर्धा व ४ सांस्कृतिक स्पर्धा खेळल्या  जाणार आहेत. यात आयुष्यमान भारत क्रिकेट स्पर्धा, जलयुक्त शिवार हॉलीबॉल स्पर्धा, शेतकरी सन्मान कबड्डी स्पर्धा, सौभाग्य खो-खो स्पर्धा, उडाणे१००  मीटर धावणे, मुद्रा योजना४००  मीटर धावणे, स्वच्छ भारत कुस्ती, कौशल्य भारत कॅरम, उज्वल नृत्य स्पर्धा, उजाला गायन स्पर्धा, इंद्रधनुष्य चित्रकला स्पर्धा, मेक इन इंडिया रांगोळी स्पर्धा, आदी एकूण बारा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. म्हणून दोन्ही तालुक्यातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी ८ नोव्हेंबर पर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी केले आहे.

सहभागींंना मिळणार प्रमाणपत्र व्हा.

सीएम चषक स्पर्धेत सहभाग नोंदवण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. तसेच सहभाग नोंदवणाऱ्या प्रत्येक खेळाडूंना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्वाक्षरी असलेले चषक देण्यात येणार असल्याची माहिती, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी यावेळी दिली.

No comments:

Post a Comment