तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 29 November 2018

रोटरी क्लबच्या वतीने पर्यावरणवादी तरूणांचा सत्कार


सोनपेठ : येथील रोटरी क्लबच्या वतीने नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संघटनेच्या परभणी जिल्हयातील संघटनेला गरूड झेप पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला, यावेळी सत्कार मुर्ती संघटनेचे अध्यक्ष महेश जाधव व सहकारी यांच्या सत्कार समारंभ घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरीचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड, प्रमुख पाहूणे कालिदास मस्के, सैफुल्ला सौदागर, शिवाजी कुंभारीकर व यांची उपस्थिती होती.
परभणी जिल्ह्यात पर्यावरणाच्या दृष्टीने अनेक उपक्रम करणारे नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संघटनेचे अध्यक्ष महेश जाधव व सर्व सहकारी यांनी प्लास्टिक कचरा मुक्त परिसर, स्मशानभुमी सुशोभीकरण, मानव निर्मित वन संगोपन,वृक्षसंगोपनाचे कार्य व पर्यावरणासाठी महत्त्वाची भूमिका बजावल्याने त्यांना राळेगण सिद्धी येथे गरूड झेप पुरस्कार दिला, महाराष्ट्रातील सर्व जिह्यापैकी परभणी जिल्ह्याला सर्वोत्कृष्ट सामजिक कार्याबद्दल हा पुरस्कार सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. ही सोनपेठकरांना अभिमानाची गोष्ट असल्याने रोटरी क्लब सोनपेठच्या वतीने सिरसाळा चौकात सत्कार करण्यात आला. यावेळी समारंभाच्या अध्यक्षस्थानी रो. प्रदीप गायकवाड होते.
यावेळी पर्यावरण वादी संघटनेचे महेश जाधव, माऊली आदत, सुशील सोनवणे, धिरज काबरा, उमेश सोळंके, प्रा. पंडित राठोड, रईस कुरेशी, बद्रीनारायण हरकाळ, मच्छींद्र पवार या सर्व पदाधिकाऱ्यांचा रो. चंद्रकांत लोमटे, रो. बालमुकुंदजी सारडा, रो. प्राचार्य डॉ. वसंतराव सातपुते, रो. किरण चौलवार, मुख्याध्यापक दत्ता पवार यांच्या हस्ते पुष्पहार व गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. डॉ. संतोष रणखांब, प्रास्ताविक प्रा. विठ्ठल जायभाये तर आभार लिंबाजी कागदे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजकुमार धबडे, परमेश्वर पैंजणे, दत्ता उंबरे यांच्यासह अनेक नागरिक व रोटरी क्लबच्या सदस्यांनी प्रयत्न केले.

No comments:

Post a comment