तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 4 November 2018

कापडशिंगी येथील निराधारांचा मोर्चा सेनगाव तहसिलला घडकला

(ऐन सनासुदीला अपंग,शेतमजुरांचे निराधार पगारी झाल्या बंद,माजी जि.प.सदस्य व्दारकादास सारडा व चंद्रकांत हराल यांच्या नेतृत्वाखाली 40 पगार धारकांचे सेनगाव तहसिल समोर ठिय्या आदोंलन)

सेनगाव:-तालुक्यातील अतीदुर्गम भागात असलेल्या कापडशिंगी येथील अपंग,शेतमजुर यांच्यासह गावातील 40 नागरीकांचे निराधार योजना,श्रावण बाल योजना आदीसह विविध निराधार योजनेच्या पगारी ऐन सणासुदीच्या वेलीच बंद झाल्याने सेनगाव तहसिलवर दि.05 नोव्हेंबर सोमवार रोजी माजी जि.प.सदस्य व्दारकादास सारडा,चंद्रकांत हराल यांच्या नेतृत्वाखाली 40 महिला व पुरुष मंडलीने नायब तहसिलदार पोले व भोजने यांच्या समोर आपल्या व्यथा मांडल्या ऐन दिवालीच्या तोंडावर आमच्या निराधारांच्या पगारी बंद झाल्याने आमच्यावर उपासमारीची वेल येवुन ठेपल्याचे ही उपस्थित महिला पुरुषांनी सांगितले.बंद झालेल्या निराधार योजनेच्या पगारी मध्ये काही जण अपंग व भुमिहिन शेतमजुर असल्याचे माजी जि.प.सदस्य चंद्रकांत हराल यांनी सांगितले.बंद पडलेल्या निराधार योजनेच्या पगारी त्वरीत सुरु करा अन्यथा माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढे तिव्र आंदोलन छेडु असे माजी जि.प.सदस्य व्दारकादास सारडा यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment