तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 3 November 2018

गेवराई : शेतकऱ्यांच्या हितासाठी आ. लक्ष्मण पवारांचे दमदार पाऊल

सुभाष मुळे...
----------------
गेवराई, दि. ३ __ मतदारांनी दिलेल्या संधीचा उपयोग फक्त जनतेसाठीच करणारे कार्येसम्राट आ. लक्ष्मणराव पवार यांनी राशन, पाणी, लाईट, रस्ते या मुलभुत सुविधा सुध्दा सोडवताना शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबवून एक दमदार पाऊल टाकले आहे.
            गेवराई विधानसभा मतदार संघातील नागरिकांची अडचण कमी करण्यासाठी आ. लक्ष्मणराव पवार यांनी ठोस उपाययोजना आखल्याने मतदार संघातील शेतकरी विश्वास व्यक्त करत आहेत. गेवराई मतदार संघातील सहकार क्षेत्राच्या माध्यमातून पंडित परिवारांनी नेहमीच शेतकऱ्यांची पिळवणूक व अडवणूक करून वेठीस धरले. आपला राजकिय फायदा करून घेत मतदार संघावर आधिराज्य गाजवून ते सत्ताधिश बनले असल्यानेे गेवराई विधानसभा मतदार संघातील मतदारांनी परिवर्तन घडवून आणले. जयभवानी सहकारी साखर कारखानाच्या माध्यमातून शेतक-यांची अडचण होत आहे. गेवराई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून पिळवणूक व अडवणूक करून वेठीस धरून शेतकऱ्यांना अडचणीत आणले जात असल्याची जाणीव आ. लक्ष्मणराव पवार यांना होती, त्यामुळेच आ.लक्ष्मणराव पवार यांनी गेवराई तालुक्यातील काही प्रतिष्ठीत लोकांना हाताशी धरून अडचण दुर करण्यासाठी गेवराईत खाजगी मार्केट कमिटी सुरू करण्यासाठी सुचित केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत गेवराई तालुक्यातील काही प्रतिष्ठीत लोकांनी एकत्र येत कै. माधवराव पवार खाजगी मार्केट कमिटी सुरू केली परिणामी तालुक्याला याचा फायदाच होणार आहे.
       आमदार लक्ष्मणराव पवार यांनी पालकमंत्री पंकजाताई, सहकारमंत्री सुभाष देशमुख व मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडे पाठपुरावा करून कै. माधवराव पवार खाजगी मार्केट कमिटीस मंजुरी मिळवून दिली. आ. लक्ष्मणराव पवार एवढ्यावरच थांबले नाही तर गेवराई कृषी उत्पन्न बाजार समिती व नाफेडच्या माध्यमातून पिळवणूक होत असे हे कारण पुढे करून कै.माधवराव पवार खाजगी मार्केट कमीटीत खरेदी केंद्र सुरू केले आहे. त्यामुळे गेवराई मतदार संघातील शेतकऱ्यांना आपलेसे वाटणारे खरेदी केंद्र सुरू करून दिल्याबद्दल शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.

╭ ▌╮
╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a Comment