तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 2 November 2018

विवेक पानसरे यांच्या कुटुंबियांना मध्यरात्री धमकी देणार्‍यांवर कारवाई करा.

मराठा सेवा संघाची जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाव्दारे मागणी.

कापडणे,ता.धुळे-(प्रतिनिधी)- धुळ्याचे कर्तव्यदक्ष अतिरिक्त पोलीस अधिक्षक विवेक पानसरे यांच्या कुटूबियांना मध्यरात्री धमकी देणार्‍याचा शोध घेवुन त्याच्यावर कडक कारवाई करा, अशा अाशयाच्या मागणीचे निवेदन मराठा सेवा संघाच्या वतीने धुळे जिल्हाधिकारींना अाज(दि.२)देण्यात अाले.
            जिल्हाधिकार्‍यांना देण्यात अालेल्या निवेदनात पुढे म्हटले अाहे की, जिल्हा पोलिस दलाचे अतिरिक्त पोलिस अधिक्षक म्हणुन यशस्वीपणे धुरा सांभाळणारे विवेक पानसरे यांनी आजवर अनेक गुन्हे उघडकीस आणले आहेत. शिवाय अनेक धाडसी कारवायाही केल्या आहेत. सुमारे दोन ते तीन दिवसापुर्वी अज्ञात व्यक्तीने त्यांच्या कुंटूबियांना मध्यरात्री फोन करुन धमकी दिली. शिवाय धुळयातुन काढता पाय घ्या अशा शब्दात धमकावले. याबाबत पोलिस दप्तरी नोंदही झाली आहे. पोलिस अधिकार्‍याच्या कुटुंबियांना धमकावण्याचा हा प्रकार निंदनीय व घृणास्पद आहे. मराठा सेवा संघाच्या वतीने आम्ही त्याचा निषेध करतो. शिवाय या घटनेमागील अज्ञात समाजकंटक याचा शोध घेवुन त्यांच्यावर त्वरीत कडक कारवाई करावी अशी आमची मागणी आहे. अन्यथा या घटनेमुळे पोलिस व त्यांच्या कुटूंबियांचे मनोबल कमी होवु शकते. शिवाय समाजाचा रक्षक म्हणुन काम पाहणार्‍या पोलिसांमध्ये देखील चुकीचा संदेश जाईल. तसेच कर्तव्याला श्रेष्ठ मानणारे श्री. पानसरे यांच्या प्रमाणे इतर पोलिस अधिकारी व कर्मचारी ही पुढे येणार नाहीत. याबाबत पोलिस अधिक्षक विश्वास पांढरे यांना निर्देशित करुन घटनेचा गांभिर्याने-सखोल तपास करावा. तसेच दोषींवर कडक करावाई करावी अशी आमची मागणी आहे.या निवेदनावर मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर भदाणे, विभागीय अध्यक्ष डाॅ.संजय पाटील, अॅड.वाल्मीक कचवे, किशोर साळुंखे, मिलन पाटील, शाम भदाणे, प्रशांत भदाणे, सदाशिव सुर्यवंशी, शाम निरगुडे, प्रविण पाटील, सचिन सोनवणे, राजेंद्र ढवळे, बाळासाहेब ठोंबरे,प्रशांत खैरनार, मनोज पाटील, रामकृष्ण पाटील यांच्या स्वाक्षर्‍या अाहेत.

No comments:

Post a Comment