तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 31 December 2018

मंगरुळपीरच्या तहसीलदारांनी मुख्याध्यापिकेचा बेकायदेशीर प्रस्ताव पाठविल्याची तक्रार


माजी मुख्याध्यापकांची शिक्षणाधिकाऱ्यांकडे धाव

मंगरुळपीर ता ३१/ तालुक्यातील सावरगाव(कान्होबा) येथील कानिफनाथ महाराज विद्यालयाच्या मुख्याध्यापक पदाची मान्यता आदेश  कु छबू पवार यांना मिळणेसाठीचा बेकायदेशीर प्रस्ताव हा या संस्थेचे प्रशासक असलेल्या तहसीलदार,मंगरुळपीर यांनी  शिक्षण अधिकारी,माध्यमिक यांना पाठविल्याची तक्रार तथा आक्षेप या शाळेचे निलंबित मुख्याध्यापक विश्वनाथ गर्दे यांनी ता ३१ डिसेंम्बर रोजी नोंदवला आहे.
                                     सावरगाव (कान्होबा) येथील कानिफनाथ महाराज विद्यालयाचे निलंबित मुख्याध्यापक विश्वनाथ गर्दे यांनी ता ३१ रोजी शिक्षण अधिकारी,माध्यमिक जिल्हा परिषद वाशीम यांना देण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे की,कु छबू पवार यांना कानिफनाथ महाराज विद्यालय,सावरगाव च्या मुख्याध्यापक पदाची मान्यता आदेश मिळणेबाबतचा प्रस्ताव हा संस्था प्रशासक तथा तहसीलदार,मंगरुळपीर यांनी शिक्षणाधिकारी,माध्यमिक यांचेकडे पाठविला असल्याचे या कार्यालयातून मिळालेल्या माहितीच्या आधारे समजले.परंतु शिक्षणाधिकारी व उप शिक्षणाधिकारी यांनी असा प्रस्ताव आला नसल्याचे सांगितले.पवार यांची सन जुलै २०१३ मध्ये महात्मा ज्योतिराव फुले विद्यालय,कोठारी येथून कानिफनाथ महाराज विद्यालय,सावरगाव येथे अवैध कार्यकारी मंडळाने बदली केली होती तसेच आपल्या कार्यालयीन पत्रानुसार तसेच उच्च न्यायालयाच्या १ फेब्रुवारी २०१६ च्या आदेशानुसार सदर बदली रद्द करण्यात आल्याने पवार ह्या कानिफनाथ महाराज विद्यालयाच्या अधिकृत कर्मचारी नाहीत.त्यामुळे प्रशासक तथा तहसीलदार यांनी सादर केलेला याबाबतचा प्रस्ताव हा बेकायदेशीर असून पवार यांना मुख्याध्यापक पदाचा पदभार देता येणार नाही.अन्यथा उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होईल अशी तक्रार गर्दे यांनी दिली आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835

खा. डाॅ. प्रितमताई मुंडे यांच्या प्रयत्नांना यश ; नाथरा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)  :- दि. २२ ------ खासदार डाॅ प्रितमताई मुंडे यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे नाथरा येथे शासनाने प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर केले असून तसा आदेश सार्वजनिक आरोग्य विभागाने आज निर्गमित केला आहे.

    नाथरा ता. परळी येथील ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेवून याठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र तातडीने सुरू करावे अशी  मागणी खासदार डाॅ प्रितमताई मुंडे यांनी आरोग्य मंत्र्यांना पत्र पाठवून केली होती. नाथरा ही लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची जन्मभूमी आहे, त्यांच्यामुळे या गावची महाराष्ट्रात ओळख झाली.  विकासाच्या अनेक योजना याठिकाणी  आल्या असल्या तरी येथील ग्रामस्थांची आरोग्य केंद्राची मागणी अजून पुर्ण झाली नाही. येथे पुरेशा आरोग्य सुविधा उपलब्ध नाहीत, त्यामुळे ग्रामस्थांना उपचारासाठी दूर अंतरावर जावे लागते. आरोग्य केंद्र नसल्याने ग्रामस्थांची मोठी गैरसोय होते.      याठिकाणी सध्या एक हेल्थ युनिट आहे परंतु त्याचा फारसा उपयोग होत नाही त्यामुळे त्याचे श्रेणीवर्धन करून याठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करावे अशी मागणी त्यांनी केली होती. त्या अनुषंगाने आरोग्य विभागाने आज आदेश निर्गमित करून याठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर केले आहे.

ना. पंकजाताई मुंडे यांनी परळीतील अंतर्गत रस्त्यासाठी आणले २० कोटी रूपये

विशेष रस्ता अनुदानाच्या रूपाने नागरिकांना दिली नव वर्षाची भेट

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि. ३१ --------- राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे शहरातील अंतर्गत रस्त्यासाठी नगर विकास विभागाने २० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. विशेष रस्ता अनुदानाच्या रूपाने नागरिकांना त्यांनी नव वर्षाची भेटच दिली असून लवकरच या कामांचा शुभारंभ होणार आहे.

   सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या नगरपालिकेच्या दुर्लक्षित आणि ढिसाळ कारभारामुळे शहरातील अंतर्गत रस्ते व नाल्यांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. नगरपरिषदेत भाजपची सत्ता नसली तरी शहरातील जनता माझी आहे हे ओळखून विकासाचा ध्यास घेतलेल्या     पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी शासनाच्या माध्यमातून अंतर्गत रस्ते व नाली बांधकामासाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे.

पुर्वीचे ५ आणि आता २० कोटी
------------------------------------
ना. पंकजाताई मुंडे यांनी यापूर्वी अंतर्गत रस्ते कामांसाठी ५ कोटी रुपयांचा निधी दिला मंजूर करून घेतला होता, या कामाची सर्व निविदा प्रक्रिया पुर्ण झाली असून येत्या कांही दिवसात ना. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते कामाला सुरवात होणार आहे. शहरातील विविध प्रभागात रस्त्याची २६ कामे यातून होणार आहेत. रस्ता कामाची वाढती गरज लक्षात घेऊन आता आज पुन्हा एकदा त्यांनी २० कोटी रुपयांचा निधी विशेष रस्ता अनुदानातून मंजूर करून घेतला आहे. या कामाच्या मंजूरीचा आदेश नगरविकास विभागाच्या अवर सचिवाच्या स्वाक्षरीने आज निर्गमित झाला आहे. या निधीतून शहराच्या विविध भागातील रस्ते व नाली बांधकामाची १४१ कामे होणार आहेत. याशिवाय आणखी १० कोटी रूपये याच अनुदानापोटी परळीला मिळणार आहेत.

नागरिकांना नव वर्षाची भेट
-------------------------------
पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी सत्तेचा पुरेपूर उपयोग मतदारसंघाच्या विकासासाठी केला आहे. ग्रामविकास विभागाच्या तसेच विविध योजनांच्या माध्यमातून एकीकडे ग्रामीण भागात कोट्यवधी रुपयांचा निधी आणला असतांनाच दुसरीकडे शहराकडेही त्यांनी तितकेच लक्ष दिले आहे, रस्ता अनुदानाची मोठी रक्कम मंजूर करून त्यांनी शहर वासियांना नवीन वर्षाची भेट दिल्याने नागरिकांत आनंदाचे वातावरण आहे.
••••

ठाकरे पितापुञाला बदनाम करन्याचा विरोधकांचा राजकीय डाव

फुलचंद भगत
मंगरूळपीर-माजी मुख्यमंञी वसंतरावजी नाईक यांना भारतरत्न सरकारने पुरस्कार द्यावा या मागणीसाठी राष्टवादी पक्षाकडून स्वाक्षरी मोहिम राबविन्यात येत असुन यासाठी मंगरुळपीर तालुक्यातील माजी राज्यमंञी सुभाष ठाकरे तथा त्यांचे चिरंजीव वाशिम जि.प.चे ऊपाध्यक्ष यांनी प्रमूख पुढाकार घेतला आहे.स्वाक्षरी मोहीमेसाथी रथ बनविन्यात आला असुन लोकांची जनजागृती करत आणी  माजी मुख्यमंञी वसंतराव नाईक यांच्या कार्याची महती सांगत हा रथ वाशिम यवतमाळ विधानसभा क्षेञात फिरत आहे.आतापर्यत बंजारा समाजानेही वसंतराव नाईक यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी कदाचित प्रयत्न केले नसतील पण ठाकरे पितापुञांनी कार्याची जाण ठेवून सरकारला हा पुरस्कार देन्यास भाग पाडन्यासाठी आणी जनतेच्या मनावर माजी मूख्यमंञी वसंतराव नाईक यांचे नाव अजरामर राहावे यासाठी स्वाक्षरी अभियान मोठ्या ऊत्साहाने सूरु करन्यात आले आहे.परंतु या पविञ अशा कार्यात खोडा आला तो रथ ज्या गलिच्छ जागेत काही वेळासाठी पार्क केला या कारणासाठी.हेतुपुरस्सर तो रथ तशा घाणेरड्या जागेत पार्क केला असा आरोप करत बातम्याही झळकल्या तसेच याला ठाकरे पितापुञाला दोषी ठरवत काॅल करून काहींनी आपला रोषही व्यक्त केला आणी सबंधित काॅल संभाषण सोशल मिडीयावर व्हायरल करून राजकीय बदनाम करन्याचा प्रयत्नही सूरू आहे.महापुरूषांचे कार्य हे महान आहे.त्यांनी जनमानसासाठी केलेल्या कार्याची सर कुणाला येणार नाही त्यामुळे तो रथ कुठे ऊभा केला या भानगडीत न पडता माजी मूख्यमंञी वसंतराव नाईक यांनी केलेल्या कार्याच्या दिशेने समाजाने पाऊल टाकावे तसेच बंजारा समाजाने शिक्षणाची कास धरत समाजाला आर्थीक सामाजीक तथा राजकीय क्षेञास अव्वलस्थानी नेन्याकडे लक्ष द्यावे कारण महापूरूषाची अशा किरकोळ गोष्टीमूळे महती कदापीही कमी होत नसते त्यामुळे समाजाने राजकीय व्देषापोटी दिशाभूल न होता सयंमी भुमिका घेणे कधीही चांगले राहील यात शंका नाही.ठाकरे पिता पुञांनी बंजारा समाजाच्या मतावर डोळा ठेवून स्वाक्षरी अभियान सूरू केले याकडे लक्ष न देता वसंतराव नाईक यांना भारतरत्न ही सर्वोच्च पदवी मिळन्यासाठी धडपड करीत आहे ही सकारात्मक बाजुही समाजाने बघणे गरजेचे वाटते.वाशिम जिल्ह्यातिल राजकारणातले चाणक्य म्हणून ओळखल्या जाणार्‍या माजी राज्यमंञी सुभाष ठाकरे यांना राजकीय बदणाम करन्याची ही अयशस्वी खेळी असल्याचे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सूरू असुन यामुळे विरोधकच गारद होतील अशीही चर्चा आहे कारण जे पविञ कार्य ठाकरे पितापूञाने हाती घेतले ते वाखानन्याजोगे आहे त्यामूळे राजकीय चिखलफेक जरी झाली तरी बंजारा  समाजाने महापूरूषांच्या विचारधारेवर चालुन समाज कसा संघटीत होईल व बळकट होईल याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे दिसते.ठाकरे पितापूञ या आरोपाला न जुमानता आपले कार्य सूरू ठेवुन आगामी निवडणूकीत विरोधकांची धोपीपछाड नक्कीच करतील असे अनूमानही राजकीय वर्तुळात लावले जात आहेत.

फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.9763007835

आवड व कौशल्य लक्षात घेऊन करिअर घडवा - प्राचार्य डॉ. वसंत सातपुते


तेजन्यूज हेडलाईन्स प्रतिनिधी
सोनपेठ : विद्यार्थ्यांनी स्वतःची आवड व कौशल्य लक्षात घेऊन करिअर केले पाहीजे, कारण त्यामुळे यशस्वी होण्याची जास्त शक्यता असते असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. वसंत सातपुते यांनी केले.ते करिअर अँड कौन्सिलिंग सेल व विवेक वाहीनीच्या वतीने करिअरच्या संधी या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोप करताना बोलत होते. इंजि. सचिन जायभाये यांच्या मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहूणे प्रा. डॉ. मुकुंदराज पाटील, प्रा. डॉ. सुनिता टेंगसे, प्रा. डॉ. मुक्ता सोमवंशी होते.
कै. रमेश वरपुडकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेच्या मार्गदर्शनासाठी व व्यावसायिकतेसाठी करिअर अँड कौन्सिलिंग व  विवेक वाहिनीच्या वतीने करिअर संधी या विषयावर नुकतेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत एईओ म्हणून निवड झालेले इंजि. सचिन जायभाये यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन करताना त्यांनी  ध्येय निश्चित करून अभ्यास केल्यास यश मिळते, तसेच स्वतःचे मुल्यमापन विद्यार्थ्याने केले पाहीजे, सर्व शक्तीनिशी अभ्यास करावा लागतो असे मत व्यक्त केले.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. वसंत सातपुते यांनी विद्यार्थ्यांनी केवळ सहज म्हणून स्पर्धा परिक्षेकडे किंवा कोणत्याही व्यवसायाकडे न पहाता, स्वतःची आवड व कौशल्य लक्षात घेऊन करिअर करावे, त्यामध्ये यश मिळण्याची जास्त शक्यता असते असे मत व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. डॉ. संतोष रणखांब, प्रास्ताविक प्रा. डॉ. शिवाजी वडचकर, पाहुण्यांचा परिचय प्रा. विठ्ठल मुलगीर तर आभार प्रा. डॉ. अंबादास बर्वे यांनी मानले. यावेळी मंचावर प्रा. विठ्ठल जायभाये, प्रा. डॉ. आशोकराव जाधव, प्रा. अंगद फाजगे होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. दिलीप कोरडे, प्रा. श्रीकांत गव्हाणे, प्रा. कैलास आरबाड, प्रा. सतिश वाघमारे आदींची उपस्थिती होती.

दगड मुरूमावर ना पाणी ना दबई;वाघाळा रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे

प्रतिनिधी
पाथरी:-तालुक्यातील मुख्य रस्त्यां सह ग्रामिण भागातील रस्त्यांची वाताहत झालेली असतांना काही ठिकाणी रस्ता कामे सुरू झाली आहेत त्यातही थातूर मातूर कामे आटोपण्याचा प्रयत्न सुरू असुन वाघाळा फाटा ते वाघाळा या पाच किमी अंतरातिल रस्त्या चे काम ठेकेदार दगड टाकून त्यावर मुरूम फेकुन गायब असून या वर ना पाणी टाकले जात आगे ना त्याची दबई केली जात आहे त्या मुळे होत असलेल्या कामावर शंका उपस्थित होत असून काम अतिषय सुमार दर्जाचे होत असल्याने वाघाळा ग्रामस्थ या विरोधात आता आंदोलनाच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे.
  वाघाळा फाटा ते वाघाळा या पाच किमी अंतरातील रस्त्याच्या काही भागाचे काम सुरू असून दगड आणि मुरून ठेकेदाराने अंथरून टाकला वास्तवात दगड अंथरून टाकल्यावर दबई करणे गरजेचे त्या नंतर मुरूम टाकून त्यावर पाणी टाकत पुन्हा दबई करणे महत्वाचे असते परंतु संबंधित ठेकेदार हा रस्त्याच्या दोन्ही बाजूतील काळी माती साईड पट्ट्यात टाकून भरल्या आहेत तर रस्त्यावर दगड टाकून त्यावर मुरूम टाकून बीबीएम करून मोकळा झाला आहे या रस्त्यावर पाणी टाकून त्याची दबई करणे महत्वाचे असतांना ते करतांना दिसत नाही. या मुळे सुरूवातीलाच या रस्त्याच्या दर्जा वर शंका उपस्थित होत आहे. हा रस्ता अशा स्थिती मुळे वाहन धारकां साठी अडथळ्यांची शर्यत बनल्याने ग्रामस्थां मधुन संताप व्यक्त होत आहे. या वर परत दुसरा कोट ही अशाच प्रकारे करण्या साठीची सामग्री ठेकेदार आणुन टाकत असून संबंधित विभागाचा अधिकारी तर सोडाच रोड कारकून सुद्धा या कामा कडे फिरकला नसल्याचे वाघाळा ग्रामस्थ सांगतात त्या मुळे या ठिकाणी होत असलेल्या रस्त्याचे काम अतिषय दर्जा हीन होत असून या कडे संबंधित विभागाच्या अधिका-यांनी लक्ष द्यावे अन्यथा या विरोधात वाघाळा ग्रामस्थ आंदेलनाच्या पवित्र्यात दिसून येत आहेत.

धनंजय मुंडेंच्या प्रयत्नांना यश ; गावकर्‍यांनी मानले आभार

नाथ्रा येथे प्राथमिक केंद्र मंजुरीचा शासन निर्णय जाहिर

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  दि.31.......... मौजे नाथ्रा ता.परळी वैजनाथ येथे अखेर प्राथमिक आरोग्य केंद्र मंजुर झाले असून, त्याचा शासन निर्णय आज प्रसिध्द झाला आहे.  विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नामुळे मंजुर झालेल्या या प्राथमिक आरोग्य केंद्रामुळे नाथ्रा व परिसरातील 30 हजार लोकांच्या आरोग्याचा प्रश्‍न सुटण्यास मदत झाली असून, या बद्दल जिल्हा परिषद सदस्य तथा राष्ट्रवादी युवक कॉंग्रसचे युवक प्रदेशाध्यक्ष अजय मुंडे व नाथ्रा ग्रामस्थांनी धनंजय मुंडे यांचे आभार मानले आहेत.

नाथरा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू व्हावे यासाठी 01 नोव्हेंबर रोजी ना.मुंडे यांनी आरोग्य मंत्री डॉ.दिपक सावंत यांना पत्र पाठवले तसेच त्यांच्याशी चर्चा करून त्याच दिवशी नाथरा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करण्यासंदर्भात वेगळी नस्ती सादर करण्याचे आदेश मंत्री महोदयांकडून विभागाला गेले.

त्यानंतर विभागाने मागील दिड महिन्यात तातडीने कारवाई करून नाथरा प्राथमिक आरोग्य पथकाचे श्रेणी वर्धन करून प्राथमिक आरोग्य केंद्र मंजुर करण्यासंदर्भात प्रधान सचिवांना प्रस्ताव पाठवला. सदर प्रस्ताव प्रधान सचिव व मंत्र्यांनी मान्य करून त्यासंबंधीचा शासन निर्णय आज शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

अवघ्या दोन महिन्यात हे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजुर करून घेण्यात ना.मुंडे यांना यश आले आहे. त्यामुळे नाथ्रा व परिसरातील 30 हजार नागरिकांना आरोग्य सुविधा मिळणार असून, या बद्दल अजय मुंडे व समस्त नाथ्रा ग्रामस्थ यांनी धनंजय मुंडे यांचे आभार व्यक्त केले आहेत.

दरम्यान सदर प्राथमिक आरोग्य केंद्र लवकरात लवकर कार्यान्वित व्हावे यासाठी पाठपुराव करणार असल्याचे श्री.अजय मुंडे यांनी सांगितले.

श्री शिवशंभो प्रतिष्ठान अहमदनगर ची कार्यकारिणी जाहीर..


अहमदनगर (प्रतिनिधी) :-  सामाजिक, शैक्षणिक,  सांस्कृतिक, साहित्यिक क्षेत्रात गेल्या 20 वर्षा पासून कार्यरत असलेल्या श्री शिवशंभो प्रतिष्ठान अहमदनगर ची सन 2019-2021 या तीन वर्षासाठी कार्यकारिणी आज जाहीर करण्यात आली.
नुकतीच प्रतिष्ठान च्या सदस्यांची बैठक पार पडली. त्या मध्ये नवीन कार्यकारिणी निवडण्या संदर्भात प्रस्ताव मांडला गेला. त्यामध्ये खालील प्रमाणे सर्वानुमते कार्यकारिणी निवडण्यात आली.
अध्यक्ष- अॅड शिवाजी अण्णा कराळेपाटील
उपाध्यक्ष- रमेश राठोड सर
कार्याध्यक्ष- रामदास मुळीक
सचिव- सचिन ठाणगे सर
कोषाध्यक्ष- कुशल घुले मेजर
सदस्य- विजयकुमार आमटेसर, कांतीलाल गर्जे सर, बापुसाहेब फसले सर, महादेव आमले सर, बाळासाहेब शिरसाट सर, विनायक तळेकर, बाळासाहेब पुंडे सर, भास्कर पालवे, उत्तम शिंदे सर.

श्री शिवशंभो प्रतिष्ठान अहमदनगर चे माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. समाजात उत्तम काम करणारे सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक, शिक्षक, पत्रकार, कलावंत इ. सन्माननीय व्यक्तीचा शिवशंभो रत्न पुरस्कार देऊन  दरवर्षी सन्मान करण्यात येतो.

स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत १ ते ३१ जानेवारी कालावधीत 'स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धा

फुलचंद भगत
वाशिम, ता.३१: स्वच्छ भारत मिशन ( ग्रामीण ) अंतर्गत १ ते ३१ जानेवारी २०१९ या कालावधीत 'स्वच्छ सुंदर शौचालय' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  ही स्पर्धा राज्यस्तरीय असुन जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीनी सहभाग नोंदवावा असे आवाहन उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) सुदाम इस्कापे यांनी केले आहे.
         केंद्र सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालय व महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने निर्देशित केल्याप्रमाणे १ जानेवारी ते ३१ जानेवारी २०१९ या कालावधीत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामिण भागातील ग्रामस्थांना शाश्वत स्वच्छता राखण्यात यावी. प्रत्येक कुंटुंबाला शौचालय आपले वाटावे. त्याप्रति अभिमानास्पद स्वामित्व भावना वाटावी. स्वच्छता सुविधा स्पष्टपणे नजरेत याव्यात.  शौचालय स्वच्छ सुदर दिसावे. हा या स्पर्धेचा उद्देश आहे.  या स्पर्धेत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीचा सहभाग असणार असुन ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व कुंटुबांनी आपली वैयक्तिक शौचालय रंगवुन त्यावर स्वच्छतेचे संदेश, स्वच्छता विषयक जाणीव जागृती करण्याची चित्रे यांची निर्मिती करावयाची आहे.
           १ जानेवारी ते ३१ जानेवारी २०१९ या अभियान कालावधीत उत्कृष्ट काम केलेल्या राज्य, जिल्हा, कुंटुब यांची राज्यस्तरावर पेयजल व स्वच्छता मंत्रालयाकडुन स्थापन केलेल्या समिती कडुन निवड करुन राज्यस्तरावर सन्मानित करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामस्थानी या अभियान काळात सहभाग नोंदवावा असे आवाहन उप मुख्य कार्यकारी अधिकारी  सुदाम इस्कापे यांनी केले आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835

नवीन वर्षाचे स्वागत दारू सोडा, दुध प्या"स्वातीताई मोराळे


मुंबई : दि.३१ ओबीसी फौंडेशन इंडियाच्या राष्ट्रीय अध्यक्ष स्वातीताई मोराळे यांच्या संकल्पनेतून नवीन वर्षाच्या पूर्व संध्येस दारू सोडा, दुध प्या हा सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे हे दुसरे वर्षे आहे. हा कार्यक्रम महाराष्ट्रच्या सर्व जिल्हा व सर्व तालुक्यातुन हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
आज विशेषतः तरुणांमध्ये व्यसनांचे प्रमाण मोठया प्रमाणात वाढले आहे. ज्या वयात दुध प्यायला पाहिजे त्या वयात युवकांमध्ये दारूची फॅशन म्हणून दारूचे व्यसन वाढत आहे. एकदा दारूचे व्यसन जडल्यास हे तरुण त्याच्या आहारी जातात. या पासून त्यांना दूर ठेवण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे अशी माहिती ओबीसी फौंडेशन इंडिया च्या राष्ट्रीय अध्यक्ष स्वातीताई मोराळे यांनी दिली आहे. हा उपक्रम महाराष्ट्र मधील सर्व जिल्हा व तालुक्यातुन राबवणार आहोत.
आजच्या फॅशनच्या जमान्यात मुलींमध्ये सुद्धा व्यसनांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. होस्टेल चे जीवन, मिळणारा मोकळेपणा, मी उजव्या सरणीची आहे, पुरोगामी महाराष्ट्र मध्ये रहाते हे दाखवण्यासाठी मुलीही व्यसनांकडे वाढत आहे. यामधून अपघाताचे प्रमाण वाढत आहे. यासाठी ओबीसी फौंडेशन इंडिया यांनी गेल्या वर्षी पासून हा उपक्रम राबवत आहे.यावर्षीही36जिल्हामधून व350तालुक्यामधून 500पेक्षा जास्त ठिकाणी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. मी सर्व तरुण तरुणींना आव्हान करते की आपण दारू न पिता, दूध प्या.आपली होणारी शारीरिक, मानसिक, आर्थिक हानी थांबवून दूध पिऊन मानसिक व शारीरिक क्षमता वाढवावी असे आव्हान स्वातीताई मोराळे यांनी केले आहे.

सम्यक विद्यार्थी आंदोलन पश्चिम विदर्भ आयटी सेल प्रमुख पदी इंगोले व किर्तक यांची निवड

अकोला
प्रतिनिधी :भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी भारिप बहुजन महासंघ अधिक मजबूत करण्यासाठी आणि यामध्ये विद्यार्थ्यांना काम करता येईल यासाठी सम्यक विद्यार्थी आंदोलन या संघटनेची स्थापना करून, विद्यार्थ्यांनांमध्ये काम करण्यासाठी उत्सव निर्माण केला असून,संपूर्ण महाराष्ट्रात ही विंग काम करीत असून, त्याची व्याप्ती वाढत आहे. भारिप बहुजन महासंघ प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन पश्चिम विदर्भ आयटी सेल प्रमुख पदी पारितोष इंगोले व योगेश किर्तक यांची मार्गदर्शक नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने सम्यकचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महेशजी भारतीय यांनी सर्वानुमते एका पत्रकाद्वारे निवड केली.पारितोष इंगोले व योगेश किर्तक यांनी या निवडीचे श्रेय त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कायम स्वरुपी खांद्याला खांदा लावून उभं असणाऱ्या सर्व सहकारी मित्रांना दिले आहे.