तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 29 December 2018

पालम तालुका कृषी अधिकारयांचे व कर्मचारयांचे 17 रिक्त पदे भरा --


सलमान खान मित्र मंडळाची मागणी

अरुणा शर्मा

पालम :- शेतकरयांच्या विकासासाठी शासनामार्फत विविध योजना तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने राबविण्यात येतात. परंतु पालम तालुका कृषी अधिकारी कार्यालय अंतर्गत तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारयांसह वेगवेगळया कर्मचारयांचे एकुण रिक्त पदे 17 आहेत. कर्मचारयाचे पद रिक्त असल्यामुळे तालुक्यात कृषी विकास कामांना खिळ बसल्याने शेतकरयांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. तरी रिक्त पदे भरण्याची मागणी सलमान खान मित्र मंडळच्या वतीने करण्यात आली.
    शेतकरी आत्महत्याग्रस्त म्हणुन ओळखल्या जाणारया परभणी जिल्हातील पालम तालुक्यात शेतकरयांचा विकास करण्यासाठी शासन विविध प्रकारच्या योजना राबविण्याचा निर्णय घेत असले तरी अधिकारयांसह, कर्मचारयांची रिक्त पदे अडथळा ठरत आहेत. पालम तालुक्यातील जनतेचा प्रामुख्याने शेती व शेतमजुरी हा व्यवसाय असुन पावसावर ते अवलंबून आहे. तालुक्यात औद्योगिक कारखाने व इतर काही कंपन्या नाहीत. यामुळे बेरोजगारीचे प्रमाण झपाटयाने वाढत आहे. व शासन शेतकरयांच्या आत्महत्या रोखण्यासाठी वरिष्ठ पातळीवर वेगवेगळे धोरण ठरवून शेतीमधुन भरघोस उत्पन्न निघण्यासाठी व शेतीमालाला चांगला भाव मिळवून देण्यासाठी वेगवेगळ्या योजना अनुदानावर राबवत आहे. तालुका कृषी अधिकारी कार्यालया अंतर्गत फळबाग लागवड, शेती औजारे वाटप, ठिबक सिंचन, कृषीवर आधारित प्रक्रिया उद्योग, रेशीम उद्योग, जलयुक्त शिवार, जलसंधारणाची कामे, हरित गृह अशा अनेक योजना अनुदानावर राबविण्यात येतात. शेती संदर्भात मार्गदर्शन तसेच मोफत सल्ला दिला जातो. यात शासनाचा उद्देश हा कि येथील शेतकरयांचा विकास व्हावा त्यांची प्रगती व्हावी. मात्र पालम कृषी विभागाला गेल्या दोन वर्षापासून तालुका कृषी आधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, पर्यवेक्षक, सहाय्याक वरिष्ठ लिपीक यांच्यासह गावपातळीवर काम करणारे कृषी सहाय्यक असे रिक्त पद आहेत.
  एकंदरीत एकूण मंजूर 34 पदांपैकी तब्बल 17 पदे रिक्त आहेत. तर भरलेले पदे 17 आहेत. शेतकरी कार्यालयात समस्या घेऊन गेला तर त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी अधिकारी मिळत नाही. शेतकरयांना योजनेची माहिती मिळत नसल्यामुळे शासनाच्या चांगल्या योजना केवळ कागदावरच दिसत आहेत. तालुका कृषी कार्यालयातील अधिकारयांच्या रिक्त पदामुळे शेतकरयांच्या विकासाला मोठा अडथळा ठरत आहेत. यामुळे रिक्त पदे भरावी अशी मागणी सलमान खान पठाण तालुका अध्यक्ष पालम यांच्या वतीने एका निवेदना द्वारे जिल्हा कृषी अधिकारी परभणी यांना मागणी केली आहे.

No comments:

Post a Comment