तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 30 December 2018

विकृत माणसीकत्ता ही सामाजिक प्रगतीस अडसर असते- कथाकथनकार सौ.रेखा मुंदडा

सौ.रेखा मुंदडा यांच्या कथाकथनाने परळीकर रसिकांना केले मंत्रमुग्ध

परळीच नावलौकिक केलेल्यांचा विशेष सत्कार

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
स्व.मोहनलालजी बियाणी स्मृती व्याख्यानमाले अंतर्गत ५ वे पुष्प सौ . रेखा मुंदडा यांच्या कथाकथनाने गुंफण्यात आले. दैनिक मराठवाडा साथी चे संस्थापक-संपादक स्वर्गीय मोहनलालजी बियाणी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मारवाडी युवा मंच, मसाप , पत्रकार संघ , आरोग्य मित्र यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सुप्रसिद्ध कथा कथनकार सौ.रेखा मुंदडा यांनी कथेच सादरीकरण केले.परळीचं नावलौकिक केलेल्यांचा विशेष सत्कारही यावेळी करण्यात आला.या कथाकथन कार्यक्रमात प्रेक्षकांची मोठी गर्दी होती.

लोकनेते गोपीनाथ राव मुंडे नटराज रंगमंदिर येथे शनिवार दि. २९ डिसेंबर रोजी संपन्न झालेल्या कार्यक्रमात स्व.मोहनलालजी बियाणी यांच्या प्रतिमेचे पुजन व दीपप्रज्वलन कथाकथनकार सौ.रेखा मुंदडा,कार्यक्रमाचे उदघाटक माजी नगराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया,कार्यक्रमाचे अध्यक्ष सायं. रिपोर्टरचे कार्यकारी संपादक गणेश सावंत, स्व.मोहनलालजी बियाणी व्याख्यानमालेचे मुख्य संयोजक चंदुलाल बियाणी,जगदिश बियाणी,सौ.कल्पना चंदुलाल बियाणी,सौ.प्रेमलता बद्रीनाथ बाहेती आदी मान्यवरांच्या हस्ते करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कथाकथनाअंतर्गत सौ.रेखा मुंदडा यांनी सुप्रसिद्ध साहित्यिक रणजित देसाई यांची एक तर व.पु. काळे यांच्या दोन कथा यावेळी सादर केल्या. ‘ताजमहल ‘रूपी सौंदर्यपूर्ण कलाकृती निर्माण करणाऱ्या कलावंताची करुण कहाणी रणजित देसाई यांच्या कथेच्या आधारे कथन केली. तर व . पु. च्या ‘रानडे कानडे ‘ या कथेच्या माध्यमातून हसवता हसवता त्यांनी रसिकांना मंत्रमुगध केले . तिसऱ्या पत्रात्मक कथेतून मानवी जीवना ‘ संशय ‘ हा शोकात्मिकेला कसा कारणीभूत ठरतो . म्हणून माणसाने संशयीवृत्ती काढून टाकावी असा दिलेला संदेश समाजासाठी उदबोधक होता .सलग दोन तास त्यांनी केलेल्या कथाकथनाने रसिक मनावर गारुड केले .
यावेळी उदघाटनपर भाषणात जुगलकिशोर लोहिया यांनी स्व.मोहनलालजी बियाणी यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.काकाजींनी आपल्या जीवनात विद्यार्थी घडवले . त्याचबरोबर विविध संस्थाही निर्माण केल्या. ते अतिशय मनमिळावू तिथकेच कठोर होते.कुठेही त्यांनी इमानदारीशी तडजोड केली नाही.एक आदर्श व्यक्ती म्हणून त्यांनी आपल्यासमोर आदर्श निर्माण करुन ठेवला तर आहेच बियाणी परिवार सुद्धा त्यांच्या पश्चात त्यांच्या पावलावर पाऊल टाकत आहे अशा शब्दात त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सायं.दैनिक बीड रिपोर्टर चे कार्यकारी संपादक गणेश सावंत यांनीही अध्यक्षीय भाषण करताना ” काकाजी हे एक चालते बोलते विद्यापीठ होते. ” असे भावोद्गार काढले . या महान संपादकाच्या नावाने असलेल्या व्याख्यानमालेचे अध्यक्षीय स्थान मला मिळाले ते मी भाग्य समजतो अशा शब्दात त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.डॉ.राजकुमार यल्लावाड, अनंत मुंडे सर, मोहन व्हावळे यांनी केले.
या कार्यक्रमाचे आयोजन मारवाडी युवा मंच, दै मराठवाडा साथी, परळी शहर व तालुका पत्रकार संघ, मराठवाडा साहित्य परिषद, राधा-मोहन साथी प्रतिष्ठान, आरोग्य मित्र यांच्या वतीने करण्यात आले होते.
———————-

परळीचे नावलौकिक केलेल्यांचा विशेष सत्कार
———————————
मराठवाडा भूषण पुरस्कार प्राप्त सौ.प्रेमलता बद्रीनाथ बाहेती, स्मार्ट स्पोर्ट बॉय ऑफ द ईयर पुरस्कार मिळवलेले सिध्दांत जगदीश बियाणी,डॉ.होमी भाभा टॅलेन्ट स्पर्धेत तालुक्यातून प्रथम आलेले शशांक राख,टॅलीचे मुख्य वितरक म्हणून गौरव झालेले
बजरंग भन्साळी,परभणी येथे नुकताच राज्यस्तरीय क्रीडारत्न पुरस्कार प्रदान झालेले
पै.मुरलीधर मुंडे,शरीरसौष्ठव स्पर्धेत महाराष्ट्र श्री म्हणून गौरव मिळवलेले ऋषीकेश फड,तलाठी संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून निवड झालेले विष्णू गित्ते,अद्यकवी श्री मुकुंदराज पुरस्कार प्राप्त अॕड दतात्रय आंधळे,गोवा फिल्म फेस्टीवल मध्ये पाण्या खालचे पाणी या लघुचित्रपटाने दाद मिळविल्याबद्दल दिग्दर्शक रानबा गायकवाड व त्यांच्या कलाकारांचा,
परळी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बाळासाहेब कडबाने, पत्रकार संघाच्या शहराध्यक्षपदी निवड झाल्याबदल धिरज जंगले ,पत्रकार संघाच्या कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबदल रामप्रसाद शर्मा,पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबदल बालकिशन सोनी, स्वाभिमानी मल्टी मिडियाच्या विभागीय अध्यक्षपदी निवड झाल्याबदल महादेव गिते, मराठी विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्या बद्दल केशव कुकडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
—————————————
स्व.सुवालालजी वाकेकर स्मृती दिनदर्शिका चे प्रकाशन
—–
गेली पंधरा वर्षापासुन मारवाडी युवा मंचच्या वतिने प्रकाशीत होत असलेल्या समाजभूषन स्व. सुवालालजी वाकेकर स्मृती दिनदर्शिका चे प्रकाशन जगप्रसिद्ध कथाकथनकार सौ रेखाजी मुंदड़ा, माजी नगराध्यक्ष श्री जुगलकिशोरजी लोहिया यांच्या हस्ते व सोबत मारवाड़ी युवा मंच चे अध्यक्ष चंदुलाल बियाणी ,कार्याध्यक्ष विजय वाकेकर ,सल्लागार ओमप्रकाश सारड़ा , रामप्रसाद शर्मा , सतीश सारड़ा ,बद्रीनारायण बाहेती ,अशोक जाजू ,गोविंद सोमानी यांच्या हस्ते करण्यात आहे.

No comments:

Post a Comment