तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 31 December 2018

मंगरुळपीरच्या तहसीलदारांनी मुख्याध्यापिकेचा बेकायदेशीर प्रस्ताव पाठविल्याची तक्रार


माजी मुख्याध्यापकांची शिक्षणाधिकाऱ्यांकडे धाव

मंगरुळपीर ता ३१/ तालुक्यातील सावरगाव(कान्होबा) येथील कानिफनाथ महाराज विद्यालयाच्या मुख्याध्यापक पदाची मान्यता आदेश  कु छबू पवार यांना मिळणेसाठीचा बेकायदेशीर प्रस्ताव हा या संस्थेचे प्रशासक असलेल्या तहसीलदार,मंगरुळपीर यांनी  शिक्षण अधिकारी,माध्यमिक यांना पाठविल्याची तक्रार तथा आक्षेप या शाळेचे निलंबित मुख्याध्यापक विश्वनाथ गर्दे यांनी ता ३१ डिसेंम्बर रोजी नोंदवला आहे.
                                     सावरगाव (कान्होबा) येथील कानिफनाथ महाराज विद्यालयाचे निलंबित मुख्याध्यापक विश्वनाथ गर्दे यांनी ता ३१ रोजी शिक्षण अधिकारी,माध्यमिक जिल्हा परिषद वाशीम यांना देण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे की,कु छबू पवार यांना कानिफनाथ महाराज विद्यालय,सावरगाव च्या मुख्याध्यापक पदाची मान्यता आदेश मिळणेबाबतचा प्रस्ताव हा संस्था प्रशासक तथा तहसीलदार,मंगरुळपीर यांनी शिक्षणाधिकारी,माध्यमिक यांचेकडे पाठविला असल्याचे या कार्यालयातून मिळालेल्या माहितीच्या आधारे समजले.परंतु शिक्षणाधिकारी व उप शिक्षणाधिकारी यांनी असा प्रस्ताव आला नसल्याचे सांगितले.पवार यांची सन जुलै २०१३ मध्ये महात्मा ज्योतिराव फुले विद्यालय,कोठारी येथून कानिफनाथ महाराज विद्यालय,सावरगाव येथे अवैध कार्यकारी मंडळाने बदली केली होती तसेच आपल्या कार्यालयीन पत्रानुसार तसेच उच्च न्यायालयाच्या १ फेब्रुवारी २०१६ च्या आदेशानुसार सदर बदली रद्द करण्यात आल्याने पवार ह्या कानिफनाथ महाराज विद्यालयाच्या अधिकृत कर्मचारी नाहीत.त्यामुळे प्रशासक तथा तहसीलदार यांनी सादर केलेला याबाबतचा प्रस्ताव हा बेकायदेशीर असून पवार यांना मुख्याध्यापक पदाचा पदभार देता येणार नाही.अन्यथा उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होईल अशी तक्रार गर्दे यांनी दिली आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835

No comments:

Post a Comment