तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 31 December 2018

खा. डाॅ. प्रितमताई मुंडे यांच्या प्रयत्नांना यश ; नाथरा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)  :- दि. २२ ------ खासदार डाॅ प्रितमताई मुंडे यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे नाथरा येथे शासनाने प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर केले असून तसा आदेश सार्वजनिक आरोग्य विभागाने आज निर्गमित केला आहे.

    नाथरा ता. परळी येथील ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेवून याठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र तातडीने सुरू करावे अशी  मागणी खासदार डाॅ प्रितमताई मुंडे यांनी आरोग्य मंत्र्यांना पत्र पाठवून केली होती. नाथरा ही लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची जन्मभूमी आहे, त्यांच्यामुळे या गावची महाराष्ट्रात ओळख झाली.  विकासाच्या अनेक योजना याठिकाणी  आल्या असल्या तरी येथील ग्रामस्थांची आरोग्य केंद्राची मागणी अजून पुर्ण झाली नाही. येथे पुरेशा आरोग्य सुविधा उपलब्ध नाहीत, त्यामुळे ग्रामस्थांना उपचारासाठी दूर अंतरावर जावे लागते. आरोग्य केंद्र नसल्याने ग्रामस्थांची मोठी गैरसोय होते.      याठिकाणी सध्या एक हेल्थ युनिट आहे परंतु त्याचा फारसा उपयोग होत नाही त्यामुळे त्याचे श्रेणीवर्धन करून याठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करावे अशी मागणी त्यांनी केली होती. त्या अनुषंगाने आरोग्य विभागाने आज आदेश निर्गमित करून याठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर केले आहे.

No comments:

Post a Comment