तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 28 December 2018

काँग्रेसचा वर्धापन दिन परळीत उत्साहात साजरा

चादर वाटप व फळ वाटपासह विविध उपक्रमांचे आयोजन

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-

भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात व विकासाची दिशा देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या काँग्रेस पक्षाचा 134 वा वर्धापन दिन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य तथा प्रदेश सरचिटणीस प्रा. टी.पी. मुंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज परळी तालुका व शहर काँग्रेस व युवक काँग्रेसच्यावतीने उत्साहात साजरा करण्यात आला

          भारत देशाच्या विकासात स्वातंत्र्यलढ्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या काँग्रेस पक्षाचा 134 वा वर्धापन दिन आज परळीत काँग्रेस युवक काँग्रेसच्यावतीने विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला मोंढा मैदानावरील विजयस्तंभावर काँग्रेसचे शहराध्यक्ष बाबुभाई नंबर दार यांच्या हस्ते पक्षाच्या ध्वजाचे ध्वजारोहण करून राष्ट्रगीत गाण केले

 
          यानंतर शहरातील विविध सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर झोपलेल्या व थंडीत कुडकुडणाऱ्या गरजवंतांना काँग्रेस व युवक काँग्रेसच्यावतीने युवक काँग्रेसचे परळी विधानसभा अध्यक्ष तथा परळी मार्केट कमिटीचे उपसभापती प्रा. विजय मुंडे यांच्या हस्ते मायेची ऊब म्हणून चादर वाटप करण्यात आले तर उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना जि. प .सदस्य तथा युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस प्रदीप भैया मुंडे यांच्या व अन्य पदाधिकार्‍यांच्या हस्ते फळवाटप करण्यात आले

       यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सूर्यकांत मुंडे शहराध्यक्ष बाबुभाई नंबर दार ज्येष्ठ नेते प्रा नरहरी काकडे    अनिल मस्के माजी नगरसेवक ओम प्रकाश सारडा पंडित झिंजुर्डे सुदाम लोखंडे हाजी दुले पाशा शहर उपाध्यक्ष नितीन शिंदे मागासवर्गीय सेलचे जिल्हा उपाध्यक्ष ऍड संजय जगतकर तालुकाध्यक्ष डॉ माणिक कांबळे रघुनाथ डोळस विश्वनाथ देवकर अल्पसंख्यांक सेलचे तालुकाध्यक्ष जम्मू भाई शहराध्यक्ष बबलू सय्यद साजेद ,श्याम गडेकर नवनाथ क्षीरसागर प्राचार्य डॉ. बि.डी .मुंडे परळी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष बद्दर भाई कॉंग्रेस सेवा दलाचे शहराध्‍यक्ष नागेश व्हावळे युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष प्रशांत तोतला विजय अटकोरे गफार भाई बागवान पवन वाघमारे अनंत महाराज मुंडे श्रीमंत कांगणे परळी विधानसभा काँग्रेसचे मल्टिमीडिया प्रमुख प्रा संदिपान मुंडे आदीसह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते

No comments:

Post a Comment