तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 31 December 2018

आवड व कौशल्य लक्षात घेऊन करिअर घडवा - प्राचार्य डॉ. वसंत सातपुते


तेजन्यूज हेडलाईन्स प्रतिनिधी
सोनपेठ : विद्यार्थ्यांनी स्वतःची आवड व कौशल्य लक्षात घेऊन करिअर केले पाहीजे, कारण त्यामुळे यशस्वी होण्याची जास्त शक्यता असते असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. वसंत सातपुते यांनी केले.ते करिअर अँड कौन्सिलिंग सेल व विवेक वाहीनीच्या वतीने करिअरच्या संधी या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोप करताना बोलत होते. इंजि. सचिन जायभाये यांच्या मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहूणे प्रा. डॉ. मुकुंदराज पाटील, प्रा. डॉ. सुनिता टेंगसे, प्रा. डॉ. मुक्ता सोमवंशी होते.
कै. रमेश वरपुडकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेच्या मार्गदर्शनासाठी व व्यावसायिकतेसाठी करिअर अँड कौन्सिलिंग व  विवेक वाहिनीच्या वतीने करिअर संधी या विषयावर नुकतेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत एईओ म्हणून निवड झालेले इंजि. सचिन जायभाये यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन करताना त्यांनी  ध्येय निश्चित करून अभ्यास केल्यास यश मिळते, तसेच स्वतःचे मुल्यमापन विद्यार्थ्याने केले पाहीजे, सर्व शक्तीनिशी अभ्यास करावा लागतो असे मत व्यक्त केले.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. वसंत सातपुते यांनी विद्यार्थ्यांनी केवळ सहज म्हणून स्पर्धा परिक्षेकडे किंवा कोणत्याही व्यवसायाकडे न पहाता, स्वतःची आवड व कौशल्य लक्षात घेऊन करिअर करावे, त्यामध्ये यश मिळण्याची जास्त शक्यता असते असे मत व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. डॉ. संतोष रणखांब, प्रास्ताविक प्रा. डॉ. शिवाजी वडचकर, पाहुण्यांचा परिचय प्रा. विठ्ठल मुलगीर तर आभार प्रा. डॉ. अंबादास बर्वे यांनी मानले. यावेळी मंचावर प्रा. विठ्ठल जायभाये, प्रा. डॉ. आशोकराव जाधव, प्रा. अंगद फाजगे होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. दिलीप कोरडे, प्रा. श्रीकांत गव्हाणे, प्रा. कैलास आरबाड, प्रा. सतिश वाघमारे आदींची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment