तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 30 December 2018

एक लोकप्रिय संदेश- स्वातीताई मोराळे

अहमदनगर:- "दारू सोडा, दुध प्या"स्वातीताई मोराळे
"ओबीसी फौंडेशन इंडियाच्या राष्ट्रीय अध्यक्ष स्वातीताई मोराळे यांच्या संकल्पनेतून नवीन वर्षाच्या पूर्व संध्येस दारू सोडा, दुध प्या हा सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे हे दुसरे वर्षे आहे. हा कार्यक्रम महाराष्ट्रच्या सर्व जिल्हा व सर्व तालुक्यातुन हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
    आज विशेषतः तरुणांमध्ये व्यसनांचे प्रमाण मोठया प्रमाणात वाढले आहे. ज्या वयात दुध प्यायला पाहिजे त्या वयात युवकांमध्ये दारूची फॅशन म्हणून दारूचे व्यसन वाढत आहे. एकदा दारूचे व्यसन जडल्यास हे तरुण त्याच्या आहारी जातात. या पासून त्यांना दूर ठेवण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे अशी माहिती ओबीसी फौंडेशन इंडिया च्या राष्ट्रीय अध्यक्ष स्वातीताई मोराळे यांनी दिली आहे. हा उपक्रम महाराष्ट्र मधील सर्व जिल्हा व तालुक्यातुन राबवणार आहोत.
       आजच्या फॅशनच्या जमान्यात मुलींमध्ये सुद्धा व्यसनांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. होस्टेल चे जीवन, मिळणारा मोकळेपणा, मी उजव्या सरणीची आहे, पुरोगामी महाराष्ट्र मध्ये रहाते हे दाखवण्यासाठी मुलीही व्यसनांकडे वाढत आहे. यामधून अपघाताचे प्रमाण वाढत आहे. यासाठी ओबीसी फौंडेशन इंडिया यांनी गेल्या वर्षी पासून हा उपक्रम राबवत आहे.यावर्षीही36जिल्हामधून व350तालुक्यामधून 500पेक्षा जास्त ठिकाणी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. मी सर्व तरुण तरुणींना आव्हान करते की आपण दारू न पिता, दूध प्या.आपली होणारी शारीरिक, मानसिक, आर्थिक हानी थांबवून दूध पिऊन मानसिक व शारीरिक क्षमता वाढवावी असे आव्हान स्वातीताई मोराळे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment