तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 28 December 2018

३१ डिसेम्बर ला बाहेर वायफळ खर्च करणे टाळा....


आज आपण सर्वत्र ३१ डिसेम्बर साजरा केला जातो हा कुठलाही सण नाही तरी सर्वत्र साजरा केला जातो
असे आपण का करतो खूप साऱ्या पार्ट्या खुप सार एन्जॉयमेंट करीत असतो पण जर आज आपण बघितलं तर आपल्या येथे दुष्काळ , खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या होत असताना आपण अश्या प्रकारे वायफळ खर्च करणे कितपण योग्य आहे . आपण विचार करायला हवा तस बघायला गेलं तर आपण ह्या दिवशी खूप खर्च करतो परंतु एखाद्या चांगल्या कार्यक्रमास आपण किती मदत करतो हा प्रश्न देखील आपल्या मनात आला पाहिजे .

    आज आम्ही निसर्गासाठी काही चांगले काम करतोय परंतु कुठल्याच मोठ्या असो वा साधारण कोणीही मदतीसाठी पुढे येत नाही ह्याची मनात खंत वाटत असते. आणि गेल्या २ दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्र मध्ये कुठे ना कुठे खूप मौज मस्ती चालू आहे . परंतु इतर दिवस काय ज्या वेळी दुष्काळ पडतो त्यावेळी काय हा प्रश्न कोणासमोर का येत नाही ह्याचे मात्र विशेष वाटते .

     तरी समस्त झाड फौंडेशन तर्फे आव्हान करण्यात येते कि आपण जेवढा खर्च करणार त्याच्या १% तरी आम्हाला मदत करावी जेणेकरून काही तरी चांगले काम नवीन वर्षात आपण करणार आहोत ह्या भावनेने तुम्हाला समाधान वाटेल हीच अपेक्षा...

समस्त झाड फौंडेशन टीम

अध्यक्ष
सचिन देवरे

उपाध्यक्ष
विकास मराठे

No comments:

Post a Comment