तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 30 December 2018

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभाग तालुकाध्यक्ष पदी सैय्यद लुकमान  


संग्रामपुर [ प्रतिनिधी] राष्ट्रवादी कॉग्रेस अल्पसंख्यांक विभाग तालुकाध्यक्ष पदी सैय्यद लुकमान सैय्यद सुभान यांची नियुक्ती करण्यात आली  पक्षाचे नेते माजी मंत्री डॉ. राजेन्द्र शिंगणे ,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नाझेर काझी,  जिल्हा जिल्हाकार्यध्यक्ष संगीतराव भोंगळ यांच्या आदेशान्वये राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग जिल्हाध्यक्ष मोबीन अहेमद शेख मुनीर यांनी एका नियुक्ति पत्राद्वारे केली आहे  राष्ट्रवादी कॉ जिल्हाकार्याध्यक्ष संगितराव भोंगळ यांच्या हस्ते सैय्यद लुकमान सैय्यद सुभान यांना अल्पसंख्यांक तालुकाध्यक्षपदी नियुक्तिपत्र देण्यात आले नवनिर्वाचीत अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष यांचे शाल श्रीफळ देऊन पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आला पक्षाच्या ध्यय धोरण कार्य तळा गाळा पर्यत पोहचवुन  आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकीत अल्पसंख्यांक समाजचे संघटन मजबुत करुन पक्षवाढी तन मन धनाने कार्य निपक्ष पातीपणाने  करावे अशी अपेक्षा नियुक्ति पत्रातुन व्यक्त करण्यात आली सैय्यद लुकमान हे आपल्या नियुक्तिचे श्रेय जिल्हाध्यक्ष मोबीन अहेमद यांच्या सह पक्ष श्रेष्टीना देतात अल्पसंख्यांक विभाग तालुकाध्यक्षपदी सै लुकमान यांची नियुक्ति झाल्या बद्दल त्यांचे कौतुक होत आहे

No comments:

Post a Comment