तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 28 December 2018

मानवतावादी युवा मंच पालमच्या वतीने स्पर्धा परिक्षाचे आयोजन


अरुणा शर्मा

पालम :- माधवराव पाटील महाविद्यालय पालम राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत सामान्य ज्ञान स्पर्धा परिक्षा आयोजन मानवतावादी युवा मंच पालम यांच्या वतीने पालम तालुका स्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा परिक्षाचे आयोजन दि. 1 जानेवारी रोजी करण्यात आले आहे. या स्पर्धा परिक्षेचा उद्देश MPSC, UPSC चा दृष्टीकोन कौशल्य स्पर्धा परीक्षेत उतरण्याची संधी या दृष्टीकोनातुन ही स्पर्धा परिक्षा घेण्यात येणार आहे. या परिक्षा चा वेळ सकाळी 10:30 ते 11:30 पर्यंत राहणार आहे. या स्पर्धा मध्ये प्रथम बक्षिस डॉ. असोसिएशन पालम यांच्या हस्ते 3000 रु. व द्वितीय बक्षिस विजयकुमार घोरपडे शिक्षण सभापती तथा नगर सेवक पालम यांच्या हस्ते 2100 रु. तर तृतीय बक्षिस रामभाऊ बनसोडे पवन झेरॉक्स पालम यांच्या हस्ते 1100 रु. व हे बक्षिस MPSC च्या पुस्तकाच्या स्वरुपात दिले जातील. तरी पालम तालुक्यातील महाविद्यालयातील इच्छुक स्पर्धकांनी या स्पर्धा परिक्षेत सहभाग नोंदवावा. नाव नोंदनी माधवराव पाटील महाविद्यालया मधील प्रा. चव्हाण सर, प्रा. रनवीरकर मँडम व ममता कॉलेज प्रा. सुर्व सर, प्रा. मस्के सर तर शिवनेरी कॉलेज प्रा. भस्के सर यांच्याकडे स्पर्धकानी नाव नोंदनी करावी. नाव नोंदनीची अंतीम दि. 30 डिसेंबर राहील. तर परिक्षा शुल्क 10 रु. आहे. या परिक्षा चे स्थळ माधवराव पाटील महाविद्यालय पालम येथे होणार आहे. तरी तालुक्यातील इच्छुक स्पर्धकांनी सहभाग नोंदवावा आशे आव्हान धिरज वाघमारे, देविदास गुंडाळे, मोतीराम चौधरी यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment