तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 13 December 2018

पाथरीत कर्जा साठी उपोषणाला बसलेल्या शेतक-याचा मृत्यू;मृतदेह बँकेत

किरण घुंबरे पाटील
पाथरी:-कर्ज भेटत नसल्याने बँके समोर बुधवार 12 डिसेंबर पासून उपोषणाला बसलेल्या शेतक-याला -हदयविकाराचा जोरदार झटका आल्याने त्याचा दवाखाण्यात जाण्या पुर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी तीन ते चार च्या सुमारास घडली असून या घटने मुळे शेतक-यां मधून बँक प्रशासना विरोधात तिव्र संताप व्यक्त केला जात असून बँक अधिका-यां विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. दरम्यान संतप्त शेतक-यांनी मृतदेह बँकेत आणला आहे.
मागील अनेक दिवसा पासून भाकपाच्या नेतृत्वात शेतकरी पिककर्जा साठी स्टेटबँक ऑफ इंडीया समोर उपोषण आणि विविध आंदोलने  करत होते ,प्रत्येक वेळी बँक अधिका-यांनी आश्वासनावर बोळवन केल्याने 12 डिसेंबर रोजी पुन्हा भाकपाच्या नेतृत्वात उपोषण सुरू होते दरम्यान 13 डिसेंबर रोजी दुपारी तुकाराम वैजनाथराव काळे वय 42  या मरडसगाव ता पाथरी येथिल शेतक-याला -हदयाचा त्रास जाणऊ लागला त्याला तात्काळ दवाखान्यात हलवले मात्र प्रकर्ती चिंताजनक असल्याने त्यांना मानवत येथील शासकिय रूग्णालयात हलवण्यात आले मात्र तत्पुर्वीच त्यांची प्राणज्योत मावळली. या विषयी पाथरी शहरातील बँके समोर वातावरण तणावपुर्ण झाले आहे. संतप्त उपोषण कर्त्यांनी मृत शेतक-याचा मृतदेह अँम्बूलन्स मधून बँके समोर आणला असुन या ठिकाणी सहा वाजच्या पासून सेलू मार्गावर रास्ता रोको करत मृत शेतक-याच्या कुटूंबाला आर्थिक मदत,कुटूंबाचे पुनर्वसन आणि एकाला शासकीय नौकरी देण्याची मागणी केली आहे. या विषयी तेजन्यूज हेडलाईन्स ने सर्वप्रथम हे वृत्त दिल्याने शासन स्तरावरून सहकार खात्या मार्फत माहिती मागवली जात आहे. दरम्यान रास्ता रोकोत मोठ्या संखेने शेतकरी सहभागी असून पोलीसांची जादा कुमक शहरात दाखल झाली असून चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे .बँके समोर तनावपुर्ण शांतता आहे. दरम्यान तब्बल सहा तासा नंतर 

या प्रकऱणात नुसान भरपाई म्हणून बँक प्रशासन दहालक्ष रूपये देणार, मुख्यमंत्री सहायता निधी साठी प्रस्ताव पाठवणार, संबंधित बँक प्रशासनावर प्रकरणाची चौकशी नंतर 304 चा गुन्हा दाखल करण्यात येणार या आश्वासनावर तडजोड करण्यात आली प्रकरणी आ बाबाजानी दुर्रांनी,आमोहन फड, भाकपा चे राजन क्षिरसागर, स्वाभिमानीचे शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष माणिकराव कदम बँकेचे आरबिओ विश्वास राव या सह उपोषण कर्ते आणि शेतकरी यांची उपस्थिती होती. प्रकणावर ठोस आश्वासन मिळाल्या नंतर मृतदेह असलेली रुग्णवाहीका मरडसगाव कडे रात्री अकरा वाजता अंत्यसंस्कारा साठी रवाना झाली.

 या प्रकऱणात नुसान भरपाई म्हणून बँक प्रशासन दहालक्ष रूपये देणार, मुख्यमंत्री सहायता निधी साठी प्रस्ताव पाठवणार, संबंधित बँक प्रशासनावर प्रकरणाची चौकशी नंतर 304 चा गुन्हा दाखल करण्यात येणार या आश्वासनावर तडजोड करण्यात आली प्रकरणी आ बाबाजानी दुर्रांनी,आमोहन फड, भाकपा चे राजन क्षिरसागर, स्वाभिमानीचे शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष माणिकराव कदम बँकेचे आरबिओ विश्वास राव या सह उपोषण कर्ते आणि शेतकरी यांची उपस्थिती होती.

1 comment: