तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Saturday, 13 January 2018

साईबाबा जन्मस्थान मंदिर विश्वस्तांच्या राष्ट्रपती आणि मुख्यमंत्री यांच्या भेटीने विकास कामांना मिळणार गती

सकारात्मक चर्चा झाल्याची विश्वस्त संजय भूसारींची तेजन्यूज ला माहीती

किरण घुंबरे पाटील
पाथरी:-येथिल श्री साईबाबा जन्मस्थान मंदिर परिसराचा विकास व्हावा या साठी होत असलेल्या प्रयत्नांना आता गती मिळाली असून शुक्रवारी मंदिर समितीचे अध्यक्ष सिताराम धानू यांच्या नेतृत्वात विश्वस्तांचे शिष्टमंडळ मुंबईत राजभवनात महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना जन्मस्थान मंदिर कृती विकास आराखड्या संदर्भात चर्चा करण्या साठी 13जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता भेटले असून या आराखड्याला मुख्यमंत्री मान्यता देऊन किमान अर्धा निधी उपलब्ध करून देतील अशी अपेक्षा असल्याची माहिती या शिष्टमंडळातील विश्वस्त असलेले संजय भुसारी यांनी तेजन्यूज हेडलाईन्सशी दुरध्वनी वरून बोलतांना दिली.
पाथरी शहर विकासा साठी 98 कोटी रुपये खर्चाचा कृती आराखडा अकोला येथील महेंद्र दवे यांच्या कंपनीने तयार करून तो जिल्हा अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना दिला असून यात काही त्रुटी राहिल्या असून त्या पुर्ण करून पालक मंत्र्यांच्या शिफारशी ने पाठवाव्यात असे परभणी जिल्हा अधिका-यांना आदेश देण्यात आले असून १७ जानेवारी रोजी या विषयी परभणी जिल्हा अधिकारी कार्यालयात बैठक ठेवण्यात आली असून त्यात पालकमंत्री उपस्थित असनार आहेत. त्या नंतर हा कृती आराखडा पुन्हा मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात येणार असून त्या नंतर याला मंजूरी मिळून किमान अर्धा निधी मार्च आगोदर मिळून विकास कामांचा मुहुर्त होईल अशी अपेक्षा विश्वतांना वाटत असल्याचे भूसारी यांनी सांगीतले.  शुक्रवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची राजभवनात सायंकाळी सहा वाजता साईबाबा जन्मस्थान मंदिर समितीचे अध्यक्ष सिताराम धानू यांच्या नेतृत्वात विश्वस्त , आ बाबाजानी दुर्रांनी, अॅड अतुल चौधरी,संजय भुसारी, सचिन करवा,प्रकाशसेठ सामत, बालाप्रसाद मुंदडा या सात जनांच्या शिष्टमंडळाने साईबाबा जन्मस्थान मंदिर विकास कृती आराखड्या संदर्भात राष्ट्रपती महोदयांची भेट घेऊन विकास कामां विषयी १५ मिनिटे सविस्तर चर्चा केल्याचे भुसारी यांनी सांगितले या वेळी या शिष्टमंडळाने साई समाधी शताब्दी समारोहा साठी राष्ट्रपतींनी उपस्थित राहाण्याचे निमंत्रण पत्र दिले. या नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांचे राजभवनात आगमन झाल्या नंतर परत या शिष्टमंडळाला राष्ट्रपतींनी निमंत्रीत केले या वेळी राष्ट्रपती समोर मंदिर विकास कृती आराखड्या विषयी चर्चा झाल्या नंतर आपण दिलेल्या कृती आराखड्यात त्रुटी आढळून आल्याने या विषयी १७ जानेवारी रोजी परभणी जिल्हाअधिकारी कार्यालयात होणा-या पालकमंत्र्यांच्या बैठकीत त्रुटी दुर करून पालकमंत्र्यांच्या शिफारशी वरून हा ९८ कोटी रुपयांचा कृती आराखडा मुख्यमंत्र्यांना पुन्हा सादर होऊन त्याला अंतीम मंजूरी मिळेल अशी अपेक्षा भुसारी यांनी व्यक्त करून या मार्च आगोदर किमान अर्धा निधी प्राप्त होईल अशी अपेक्षा व्यक्त करुन पाथरी शहरातील विकास कामांचे उद्दघाटन राष्ट्रपतींच्या हस्ते करण्या साठी आपण त्यांना निमंत्रीत करावे असे या वेळी राष्ट्रपतीं समोर मुख्यमंत्र्यांना विनंती केल्या नंतर या शिष्टमंडळाची विनंती मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.  तत्पुर्वी मुख्यमंत्र्यांनी पाथरी येथे साईबाबा जन्मस्थान मंदिराला भेट देण्याचे निवेदन ही या वेळी मुख्यमंत्र्यांना दिल्याचे सांगितले या वेळी मुख्यमंत्र्यांनी आपण नक्की पाथरीला येऊ असे आश्वासन या वेळी या शिष्टमंडळाला दिल्याचे सांगितले.  ९८ कोटी रुपयांच्या विकास कृती आराखड्यात १४ मीटर रुंदीचे तीन रस्ते, जन्मस्थान मंदिर परिसरातील २५० स्वेअर मीटरचा परिसर रिकामा करण्यात येणार असून ६० रुमचे सर्व सोई सुविधा युक्त भव्य भक्तनिवास , तीन प्रसादालय, गार्डन,अध्ययन कक्ष, भक्ती केंद्र, पाच हजार भाविक बसतील असा सभामंडप, विजेचे दिवे, पाईपलाईन, सुलभ सौचालय अशा विकास कामांचा समावेश आहे. या साठी अध्यक्ष सिताराम धानू यांच्या नेतृत्वातील ही ४ थी भेट असून रेल्वे सह विकास कामांच्या भुमीपुजना साठी राष्टपतींनीच यावे असे निवेदन या वेळी राष्टपतींनाही दिल्याचे भुसारी यांनी सांगितले.

प्रस्तावित रेल्वे मार्गाला निधी देणार
नुकतेच मानवत रोड ते परळी या ६७ किमी अंतराच्या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण पुर्ण झाले असून या कामी २१५ कोटींचा निधी केंद्र सरकारने मंजूर केलेला आहे. यात भुमी अधिग्रहणा साठी राज्याने त्यांचा पन्नास टक्के वाटा तात्काळ द्यावा जेणे करून या कामाला गती मिळेल अशी विनंती मुख्यमंत्र्यांना राष्ट्रपती महोदया समोर या शिष्टमंडळाने केल्या नंतर आपण या साठी त्वरीत निधी ऊपलब्ध करून देण्या साठी प्रयत्न करून तो लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करू असे सांगितल्याचे ते म्हणाले. त्या मुळे आता पाथरी शहर विकासाची चक्रे गतीमान होऊन लवकरच राष्ट्रपतींच्या हस्ते विकास कामांचे भुमीपुजन होईल असा आशावाद संजय भुसारी यांनी तेजन्यूज हेडलाईन्स शी बोलतांना व्यक्त केला .१८ ऑक्टोबर २०१८ ला साई समाधी शताब्धी समारोह असनार आहे . तत्पूर्वी कृती विकास आराखड्या नुसार प्रत्यक्ष कामांना राष्ट्रपतींच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या प्रमुख उपस्थितीत भुमीपुजन होईल अशी आशा भुसारी यांनी व्यक्त केली.


लोकशाहीतुन समाजसेवा करावी; शिवव्याख्याते सहाने


   प्रतिनिधी : भोकरदन

   जिजाऊ जयंती निमित्त बरंजळा लोखंडे येथे पवनपुञ सेवाभावी संस्थेन व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. तरुणानी राजकारणात यावं व लोकशाही वाचवावी व त्यातुन समाजसेवा करावी असा संदेश तरुणाना नारायन सहाने यांनी त्यांच्या वानितुन  दिला ..

  भारतीय लोकशाहीची दुर अवस्था या विषयावर नारायण सहाने अत्यंत अभ्यास पुर्वक मार्गदर्शन करुन तरुणांचा राजकारणावरील विश्वास वाढवला .आणि तरुणाची मने जिंकली ..व तरुणानां राजकारणात येऊन गावाची व समाजाची सेवा करावी ..अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली ..संसद न्याय पालीका शासन आणि प्रसार माध्यम या लोक शाहीच्या चारही आधार स्तंभावर त्यांनी प्रकाश टाकला व त्यांची कार्य काय असतात आणि आज ते काय करत आहे या खूप सविस्तर मार्गदर्शन केले.

   तसेच,अनिल गिरणारे,बंड्डु जाधव,समाधान लोखंडे यांनी सह जिल्हा परिषद शाळेतील विद्यांर्थांनी जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जिवनावर प्रकाश टाकला व वकृत्व स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थांचे यावेळी पेन व रजिस्टर देऊन मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.

   या कार्यक्रमाचे सुञसंचालन समाधान लोखंडे यांनी केले,तर आभार प्रदर्शन नारायण लोखंडे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पवनपुञ सेवासेवा भावी संस्थेच्या युवकांनी मेहनत घेतली.यावेळी गावातील प्रतिष्टित नागरीक व ग्रामस्थ मोठ्या संख्खेने उपस्थित होते.

     ╭════════════╮    ▌ प्रतिनिधी : मधुकर सहाने - भोकरदन -------------------------------- 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी मो.नं./व्हाॅट्स अॅप :  9637599472 ...                           ╰════════════╯

औरंगाबादेत आय टी आय कॉलेजच्या विद्यार्थनी बनवीले डी.सी. कूलर

प्रतिनिधी
औरंगाबाद:-शहरातील यशोदीप आय.टी.आय कॉलेजच्या द्वितीय वर्षाला शिकनारे विद्यार्थी शुभम जाधव,कृष्ना बोगाने,विशाल पवार ,अभिजीत पाटिल यानी एक डी.सी.वोल्टेज वर चालनारे वाटर कूलर बनवीले आहे त्यासाठी त्यांनी 2 डी.सी.मोटर,बॉक्स,जाळी,12 होल्ट चे ट्रांसफार्मर,व् स्वतः बनवलेली वॉटर मोटर,हे साहित्य त्यांनी घेऊन स्वतः हे कूलर बन्विले आहे.हे डी.सी. कूलर बन्विल्याने येशोदीप आय टी आय कॉलेजेच्या प्राचार्य,शिक्षक,व सहकारी विद्यार्थानि त्यांचे स्वागत केले आहे.

--

जिल्हा परिषद शाळा निमगाव येथे राजमाता जिजाऊ जंयती साजरी..

   प्रतिनिधी : भोकरदन

  १२ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ यांची  जंंयती   जि.प.प्रा.शाळा निमगाव येथे मोठ्या  ऊत्साहात साजरी  करण्यात आली.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन शाळेचे मुख्याध्यापक श्री फलके सर हे होते.या कार्यक्रमामध्ये शाळेतील विद्यार्थानी राजमाता जिजाऊ यांच्या  जिवनावर प्रकाश टाकनारी भाषणे केली.आज १२ जानेवारी हा दिवस ईतिहासातील असा दिवस आहे की आजच्या या दिवशी महाराष्टाच्या ईतिहासाला एक कलाटनी मिळाली होती,स्वाभिमानाची आणी स्वातंञ्याची साक्षात भवाणी जिजाऊ रुपाने सिंदखेडराजा येथे लखुजीराजे जाधवच्या घरी प्रकटली हीच ती स्वाराज्य जनणी,हीच ती माता जिन्हे स्वाराज्याचे देखिने स्वप्न देखिले,हीच ती  जनणी जिने आमच्या रक्ता  रक्ता मध्ये स्वाभिमान भिनवला जिन्हे प्रत्येक मावळ्या मध्ये शिवबा घडविला.या माऊली ने आपले ऊभे आयुष्य या स्वाराज्याच्या जडण घडणीसाठी पनाला लावले हे स्वाराज्य साखार होण्यासाठी कित्येकांनी आपले रक्त सांडले आहे.आणी हे आसे घडायला,झोकुन देऊन लढायाला प्रव्रत्त होयाला गरज असते शिवबाची आणी तो शिवबा घडायला गरज आसते जिजाऊची आशाप्रकारे जिजाऊ यांच्या जिवनावर प्रकाश फलके सर यांनी टाकला.
याप्रसंगी बोर्डै सर,गौतम साळवे,तुळशीराम डवरे,व विद्यार्थी मोठ्या प्रमानात ऊपस्थित होते.

मंडळ अधिकारी कामे करा ..तरच वेतन अदा............

परभणी तहसील कार्यालया अंतर्गत कार्यरत असलेल्या मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांना आधार बेसड् बायोमॅट्रिक बंधनकारक असून, जे कर्मचारीया पद्धतीत हजेरी सादर करणार नाहीत, अशा कर्मचार्यांचे वेतन अदा करू नयेत, असे सक्त आदेश जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी सर्व तहसीलदारांना दिले आहेत़जिल्ह्यातील प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता यावी आणि नागरिकांची कामे व्हावीत, या उद्देशाने जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांतील कर्मचार्यांना आधार बेसड् बायोमॅट्रिकच्या सहाय्यानेच हजेरी नोंदविण्याचे आदेश दिले आहेत़ मात्र महसूल प्रशासनातील तलाठी व मंडळ अधिकाºयांनी या हजेरीला विरोध केला होता़ तलाठी, मंडळ अधिकारी हे फिल्डवर असतात़ त्यामुळे या कर्मचाºयांना आधार बेसड् बायोमॅट्रिक बंधनकारक करू नये, अशी मागणी केली होती़ मात्र जिल्हाधिकार्यांनी ही मागणी फेटाळून लावली होती़ त्यानंतर तलाठी व मंडळ अधिकार्यांना 21 डिसेंबर 2017 पर्यंत आधार बेसड् बायोमॅट्रिकसाठी नोंदणी करण्याचे निर्देश दिले होते़ त्यानंतरही अनेक तलाठी व मंडळ अधिकार्यांनी नोंदणी केली नाही़ ही बाब जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांच्या निदर्शनास आली़ त्यामुळे या प्रकरणी जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी 11 जानेवारी रोजी स्वतंत्र परिपत्रक काढले आहे़ त्यात आधार बेसड् बायोमॅट्रिक संदर्भात जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना नव्याने निर्देश दिले आहेत़ त्यानुसार आधार बेसड् बायोमॅट्रिकची नोंदणी न करणे ही अतिशय गंभीर बाब असल्याचेही या पत्रकात नमूद केले आहे़ ज्या मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांनी अद्यापपर्यंत आधार बेसड् बायोमॅट्रिक मशीनद्वारे उपस्थिती नोंदविण्यासाठी रितसर नोंदणी केली नाही, त्यांनी अशी नोंदणी तत्काळ करावी, असे निर्देशही या परिपत्रकात देण्यात आले आहेत़ दरम्यान, जिल्हाधिकार्यांनी आधार बेसड् बायोमॅट्रिक उपस्थितीती बंधनकारक केल्यामुळे कर्मचार्यांची उपस्थिती वाढली आहे़ ग्रामीण पातळीवरही ही प्रक्रिया सुरू केल्यास ग्रामस्थांच्या अडचणी सुटण्यास मदत होणार आहे़ त्यामुळे ग्रा़मपंचायत स्तरावर याची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी होत आहे़२ फेब्रुवारीपर्यंत तहसीलदारांकडे उपस्थिती दाखल कराआधार बेसड् बायोमॅट्रिक उपस्थिती नोंदविण्या संदर्भात जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी सर्व विभागप्रमुखांना यापूर्वीच निर्देश दिलेहोते़ जानेवारी महिन्यातील उपस्थिती ही आधार बेस्ड बायोमॅट्रिक पद्धतीनेच घेतली जाणार आहे़ त्यामुळे 1 जानेवारी 2018 पासून प्रत्येकमहिन्यात तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी महिनाभराची दैनंदिनी पुढील महिन्याच्या 2 तारखेपर्यंत तहसीलदारांकडे सादर करावी़ जे तलाठी, मंडळ अधिकारी ही दैनंदिनी सादर करणार नाहीत, त्यांचे त्या महिन्याचे वेतन अदा करू नये, असे निर्देशही या परिपत्रकात तहसीलदारांना देण्यात आले आहेत़ जिल्ह्यातील बहुतांश तलाठी आणि मंडळ अधिकार्यांनी अद्याप नोंदणीच केली नाही़ त्यामुळे या कर्मचार्यांची जानेवारी महिन्यातील 10 तारखेपर्यंतची उपस्थिती कशी नोंदविणार व त्यावर काय कारवाई होणार? याविषयी प्रश्न निर्माण होत आहेत.*

कारखान्याचे निवृत्त कार्यकारी संचालक सानप यांचे निधन

सुभाष मुळे...
---------------
गेवराई, दि. १३ __ जयभवानी सहकारी साखर कारखान्याचे निवृत्त कार्यकारी संचालक शेषेराव पांडूरंग सानप यांचे शनिवार, दि. १३ रोजी सकाळी ६ वाजता राहत्या घरी दुःखद निधन झाले.
    जयभवानी सहकारी साखर कारखान्याचे सेवानिवृत्त कार्यकारी संचालक शेषेराव पांडूरंग सानप यांचे ६७ व्या वर्षी मौजे खडकी, ता.गेवराई येथील राहत्या घरी शनिवार, दि.१३ रोजी सकाळी ६ वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्यावर दुपारी मौजे खडकी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. कै.शेषेराव सानप हे सन १९७८ ते १९९५ या कालावधीत जयभवानी सह. साखर कारखान्यावर कार्यालयीन अधिक्षक आणि सन २००४ ते २०१५ या कालावधीत कार्यकारी संचालक या पदावर कार्यरत होते. सन १९९५ ते २००४ या कालावधीत ते कडा सहकारी साखर कारखाना येथे कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत होते. कुशल प्रशासक, शांत आणि मनमिळाऊ स्वभाव यामुळे ते सर्व परिचित होते. त्यांची निधन वार्ता समजल्यानंतर जयभवानी सह.साखर कारखाना साईटवर शोककळा पसरली. कारखान्याने शोकसभेचे आयोजन करून त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली. याप्रसंगी कारखाना संचालक, अधिकारी, कर्मचारी व कामगार यांनी दुःख व्यक्त केले.
     यावेळी माजी चेअरमन जयसिंह पंडित, व्हाईस चेअरमन जगन्नाथ शिंदे, सभापती जगनपाटील काळे, माजी सभापती कुमार ढाकणे, कारखान्याचे संचालक श्रीराम आरगडे, कार्यकारी संचालक के.एल. क्षीरसागर, जनरल मॅनेजर दत्तात्रय टेकाळे, चीफ इंजिनियर अशोक होके, चीफ केमिस्ट रामचंद्र समुद्रे, चीफ अकाऊंटंट लक्ष्मणराव नवले, संचालक दिवाणकाका, डिस्लरी इनचार्ज सखाराम जोशी व कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी, कामगार यांच्यासह इतरांनी सानप यांना श्रध्दांजली वाहून त्यांच्या आत्म्यास चिरशांती मिळण्यासाठी प्रार्थना केली.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेत सहभागी व्हा - संदीप क्षीरसागर

नियोजनाची रायमोहमध्ये बैठक, कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती

रायमोह : सरकार मागील तीन वर्षात फक्त आश्‍वासनाची पाने जनतेच्या तोंडाला पुसली आहेत. कर्जमाफीच्या नावाखाली शेतकर्‍यांची सरकारने फसवणूक केली आहे. अद्यापही अनेक पात्र शेतकर्‍यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झालेली नाही. बोंडअळीने शेतकरी चिंताग्रस्त आहे. जोपर्यंत सरसकट कर्जमाफी होत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून लढा सुरु आहे. शेतकरी सर्वसामान्यांच्या विरोधातील या खोटारड्या सरकारला ताळ्यावर आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजीत केलेल्या हल्लाबोल मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हा असे आवाहन राष्ट्रवादीचे युवानेते तथा जिल्हा परिषद सदस्य संदीप क्षीरसागर यांनी केले आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सरकार विरुद्ध हल्लाबोल मोर्चाचे आयोजन मराठवाड्यात केले आहे. दि.17 जानेवारी रोजी हल्लाबोल मोर्चाच्या निमित्ताने आयोजीत केलेली पदयात्रा बीड जिल्ह्यात दाखल होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सन्माननीय नेते या रॅलीत असणार आहेत. बीडमध्ये जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असून या निमित्ताने राहमोहा तालुका शिरुर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य मदन जाधव, सभापती अमर नाईकवाडे, बाळु गुंजाळ, रामदास हंगे, पं.स.सदस्य माऊली सानप, भास्कर सानप, माजी सरपंच हाशीम शेख, सरपंच दिलीप जाधव, दत्ता शिंदे, बप्पासाहेब मिसाळ, परमेश्‍वर तांबारे, राधाकिसन परजणे, दत्ता परजने, सोमिनाथ दादा सोनवणे, विजू पवार, तागडगावचे उपसरपंच तांबारे यांच्यासह परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सरपंच, ग्रा.पं.सदस्य यांची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना संदीप क्षीरसागर म्हणाले की, हे सरकार शेतकरी विरोधी आहे. सर्वसामान्य माणसाला या सरकारनं जगण महाग केलं आहे. या खोटारड्या सरकारला ताळ्यावर आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या या हल्लाबोल आंदोलनात सहभागी व्हा असे आव्हान त्यांनी केले. यावेळी माजी जि.प.सदस्य मदन जाधव, रामदास हंगे, यांचीही समायोजीत भाषणे झाली.

हिवरा राळा येथील तरुण शेतकऱ्यांची ऐन सणासुदीच्या काळात कर्ज बाजारी पणाला व नापिकीला कंटाळून आत्महत्या!!

         हिवराराळा/ बालाजी फुकटे जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातहील हिवरा राळा येथील 30 वर्षीय शेतकरी गणेश विठोबा कबाडे यांची नापिकीला व कर्ज बाजारी पणाला कंटाळून आत्महत्या केली आहे त्यांच्या पाश्चात पत्नी दीड वर्षांचा  मुलगा तीन वर्षांची मुलगी आहे या शेतकऱ्याच्या नावर बँक ऑफ इंडियाचे कर्ज असून त्यात बोंड आळीने शेतकरी ग्रस्त झाला आहे या सर्व गोष्टीने त्याने आपले जीवन संपवणे पसंद केली असल्याची गावात चर्च आहे आत्महत्या केल्या मुळे गावात हळहळ व्यक्त करत आहे

विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांच्या सुचनेवरून डाँ.संतोष मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी व हिंगोली येथे आढावा बैठक संपन्न


हिंगोली / परभणी (प्रतिनिधी) :- 
     भुलथापा देऊन हे सरकार सत्तेवर आले असून त्यांना सर्वसामान्यांच्या प्रश्नांची कांही देणे घेणे नाही. शेतकरी, शेतमजुर, विद्यार्थी बेरोजगार युवक, महिला तसेच मराठवाड्यातील विविध विकासाच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हल्लाबोल आंदोलन यात्रेची सुरुवात १६ जानेवारीपासून तुळजापूर येथून होत आहे. माजी उपमुख्यमंञी अजित पवार, प्रदेशाध्यक्ष श्री सुनिल तटकरे, विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, खा. सुप्रिया सुळे, युवक अध्यक्ष संग्राम कोते, यांच्यासह राष्ट्रवादीचे खासदार -आमदार यांच्या उपस्थितीत भव्य हल्लाबोल मोर्चाचे आयोजन  करण्यात आले. तरी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँगे्रस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे यांनी आज हिंगोली व परभणी येथे बैठक घेण्यात आली त्यावेळेस ते मार्गदर्शन प्रसंगी बोलत होते.
      या मोर्चाच्या संदर्भात हिंगोली व परभणी  येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक विधान परिषदेचे सदस्य आ.रामराव वडकुते साहेब यांच्या अध्यक्षतेखाली तर      राष्ट्रवादी युवक काँगे्रस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे यांच्या उपस्थितीत शनिवार 13 जानेवारी रोजी घेण्यात आली. याहिंगोली येथील राष्ट्रवादी भवनात हल्लाबोल मोर्चाच्या नियोजन संदर्भात महत्त्वपुर्ण बैठकीस संपन्न यावेळी  जिल्हाध्यक्ष मुनिर पटेल ,जिपउपाध्यक्ष अनिल पतंगे ,शहराध्यक्ष जावेद राज,कळमनुरी विधानसभाध्यक्ष डॉ.जयदिप देशमुख , उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण , युवक जिल्हाध्यक्ष बालाजी घुगे ,विद्यार्थीध्यक्ष सुजय देशमुख ,सरचिटनीस बी.डि.बांगर ,जगजित खुराणा ,संतोष गुठ्ठे ,मेडिया जिल्हाध्यक्ष राज थळपते ,डॉ.लक्ष्मण पठाडे ,अमोल देशमुख ,गुलाब भोयर ,नदिमभाई ,माधवराव कोरडे ,मतिन  ईनामदार ,बाबाभाई ,नाझिम रजवी ,समदभाई लाला ,उमेशभाऊ गोरे,संचित गुंडेवार , परळीचे प्रभाकर देशमुख, भगवान पौळ, डाँ.भोसले साहेब आदी उपस्थित होते. या बैठकीत कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. बैठकीस जिल्हाभरातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
   तसेच परभणी येथील बैठकीस राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शांतीस्वरूप जाधव, नगरसेवक इम्रानभाई, महिला आघाडी अध्यक्षा राठोडताई, ओ.बी.सी.जिल्हाव्यक्ष रोडगे, पाथरीचे शहराध्यक्ष खालेद शेख, परभणीचे शहराध्यक्ष तळेकर, माणिक जेवणार तसेच याबैठकीस विविध सेलचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    परभणी येथील प्रास्ताविकात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शांतीस्वरूप जाधव यांनी तुळजापूर येथुन निघालेल्या हल्लाबोल मोर्चात परभणी व परिसरातून मोठ्या प्रमाणात जनता सहभागी होणार असल्याचे सांगितले. सर्व तालुक्यातुन जवळपास जास्तीत जास्त   हजारांहून अधिक संख्येने शेतकरी, शेतमजूर कष्टकरी सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
  याप्रसंगी बोलताना शेतकरी, सर्वसामान्य नागरिक, त्रस्त तसेच  कर्जमाफीची अंमलबजावणी नाही, बोंडअळीने कापूस पीकाच्या झालेल्या नुकसानीला मदत नाही, शेतमालाला हमीभाव सरकार दयायला तयार नाही, कायदा व सुव्यवस्था ढासाळली आहे.वीजेचा प्रश्न आणि मराठवाडयातील समस्यांकडे सरकारचे होत असलेला दुर्लक्ष, वाढती महागाई, बेरोजगारी  या विरोधात आम्ही सरकारविरुद्ध पुन्हा एकदा हल्लाबोल करणार आहोत. या सर्व बाबींचा शासनाला जाब विचारण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने हल्लाबोल मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.

व्यसने माणसाला कंगाल बनवतात : रामपाल महाराज

      
आशिष धुमाळ
परतूर
व्यसनाचे विविध प्रकार असून , ही व्यसनेच माणसाला कंगाल बनवतात . त्यामुळे माणसाने विवेक जागा ठेउन तसेच आपली परंपरा निट तपासून आपली वाटचाल केली पाहिजे . असे प्रतिपादन सत्यपाल महाराज यांचे शिष्य रामपाल महाराज यांनी केले .           येथील मराठा क्रांती भवन येथे राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई जन्मोत्सवाच्या निमित्ताने समाजप्रबोधन व बक्षीस वितरण कार्यक्रम घेण्यात आला . या कार्यक्रमाचे अध्यक्ष डी .वाय .एस .पी संतोष वाळके , पोलिस निरीक्षक आर .टी रेंगे, सिनेअभिनेते संभाजी तांगडे  यांची प्रमुख उपस्थिती होती . यावेळी वक्तृत्व व निबंध स्पधेत प्राविण्य मिळवलेल्या विदयार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .विशेष बाब ही की यावर्षी चारहजार विद्यार्थ्यांनी या स्पधेत भाग घेतला होता . पुढे बोलताना रामपाल महाराज म्हणाले , विज्ञानावर विश्वास ठेवा . अफवावर विश्वास ठेऊ नका . शिक्षणाचे महत्त्व , भुकेचे प्रश्न , ग्रामआरोग्य, स्वच्छता ,भ्रष्ट्राचार, हुंडाबळी , शेतकऱ्यांची दुःखे यांच्या कारणांचा इतिहास श्रेत्यासमोर ठेवला . विविध संतच्या अंभगांचे दाखले आपल्या खंजेरीच्या वादनाने व मंत्रमुग्ध गायनाने करून श्रमाचे , कष्टाचे महत्त्व पटवून दिले . या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कैलाश शेळके यांनी केले . सूत्रसंचलन प्रा .पाडुरंग नवल यांनी केले .आभार प्रा . शरद बोराडे यांनी मानले . सभापती कपील आकात , अशोक बरकुले , मराठा सेवा संघाचे प्रभाकर नळगे, बाबा भापकर, राजाभाऊ ढवळकर , अशोक तनपुरे , संपत टकले तसेच राजू भुजबळ , अखिल काझी , कृष्णा आरगडे व पचक्रोशीतील रसिक श्रोत्यांची व महिलांची संख्या लक्षणीय होती .

पालम पशु वैद्यकीय दवाखाण्यात पाच दिवसा पासुन डॉक्टर गायब शेतकऱ्याची गाय मृत्यूशी झुंज देत आहे

आरूना शर्मा

पालम पशु वैद्यकीय दवाखाना श्रेणी 1 मध्ये गेल्या पाच दिवसा पासुन दवाखाण्यात डॉक्टर नसल्याने पालम शहरातील शेतकरी चक्रधर नामदेवराव रोकड़े यांची गाय आजारी असल्याने या शेतकऱ्यानी दोन ते तिन दिवसा पासुन गाय दवाखाण्या आनली मात्र डॉक्टर नसल्याने या गाईचा इलाज पाच दिवसा पासुन झाला नाही हि गाय गेल्या पाच दिवसा पासुन मृत्यूशि झुंज देत आहे. दि.12 जानेवारी रोजी पालम तहसिलदार यांना शेतकऱ्यानी निवेदन दिले आसता तहसिलने पशु वैद्यकीय दवाखाण्याचा पंचनामा केला मात्र या शेतकऱ्याच्या गाईचा ईलाज केव्हा होणार हे कोणी सागण्यास तयार नाही या दवाखाण्यात डॉक्टर केव्हा ऐनार असे शेतकरी वर्गातून बोलल्या जाते. या बाबतचे निवेदन पत्रकारांच्या हाती लागताच पत्रकारांनी पशु वैद्यकीय दवाखाना गाठला या वेळी चार ते पाच वाजण्याच्या वेळी दवाखाण्यास कुलूप लावलेले निदर्शनास आले. या वेळी अशी महिती मिळाली की या दवाखाण्यातील डॉक्टर् सय्यद हे पुणे येथे ट्रेनिग साठी गेले आसुन सध्या या दवाखाण्याचा चार्ज डॉक्टर मैडमला याना देण्यात आला आहे डॉ.मैडम गेल्या तीन ते चार दिवासा पासुन दवाखाण्यात आल्या नसल्याचे कळाले शेतकरी गेल्या पाच दिवसा पासुन शेतकरी असंख्य जनावरे बिमार आहेत मात्र त्यांचा इलाज करण्या करीत कोणी नाही  शेतकरी आपल्या गाय,मौस,शेळी दवाखाण्यात आनतात व दवाखाण्यात डॉक्टर नसल्याने जनावरे बिगर विलाजाचे घरी घेऊन जात आहेत मात्र चक्रधर रोकडे यांची कदाचीत विलाजा अभावी गाय दगावली तर कोणास जिमेदार धरायाचे यांची नुकसान भरपाई कोनी दयाची हा प्रश्न पडला आहे. अशा मनमानी करनाऱ्या डॉक्टराची चौकशी करून कार्यवाही करावी अशी मागणी पालम पत्रकार संघ व शेतकरी वर्गातून होत आहे. दवाखाण्यात विचारले कि डॉक्टर कुठे गेले आहेत ते सरळ सांगतात कि डॉक्टर ला दोन गावाचा चार्ज आहे आता डॉक्टर रावराजुर येथिल दवाखाण्यात आहेत व रावराजुर व रावराजुरच्या शेतकऱ्यानी विचारणा केली की डॉक्टर कुठे गेले आहेत त्याना सागण्यात येते की डॉक्टर पालम च्या दवाखाण्यात आहेत अशी लपना छपनिचा डाव सध्या चालू आहे अशी शेतकऱ्याची दिशाभुल केली जात आहे मात्र डॉक्टर दोन्ही गावाला नसल्याने शेतकरी हैरान आहेत तरी प्रशासनाने याची त्वरीत दखल घेउन त्वरीत दुसरे पशु वैद्यकिय डॉक्टर द्यावा अशी मागणी समोर येत आहे.