तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Saturday, 20 January 2018

शहिदांच्या वारसाला एसटीत नोकरी, पत्नीला मोफत प्रवास.

एसटी महामंडळाच्या वतीने मुंबईत राष्ट्रीय कृतज्ञता दिन सोहळ्यात, एसटीच्या पहिल्या किफायतशीर शयनयान म्हणजेच स्लीपर कोच बसचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं.मोफत आजीवन प्रवास पास यावेळी परिवहन मंत्री शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहिद सन्मान योजनेची घोषणा करण्यात आली.या योजनेंतर्गत शहिदांच्या वारसाला एसटीत नोकरी आणि पत्नीला मोफत आजीवन प्रवास पास देण्याची घोषणा, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली.

वीर बिरसा मुंडा पुनर्वसन प्रकल्प...

विशेष म्हणजे यवतमाळच्या आदिवासी महिलांची एसटी चालक म्हणून नेमणूक होणार आहे.तर गडचिरोली जिल्ह्यात आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवादी युवकांची एसटी महामंडळाच्या विविध पदांवर नियुक्ती योजना वीर बिरसा मुंडा पुनर्वसन प्रकल्प नावाने राबवली जाणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.

तथागत मित्र मंडळाच्या वतिने नामविस्तार दिन उत्साहात साजरा होणार


——————————-
पूर्णा/ प्रतिनिधी- {राजेश वालकर}शहरातील प्रसिद्ध माजी उपनगराध्यक्ष आजी नगरसेवक तथा तथागत मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष उत्तम भैया खंदारे आणि त्यांच्या तथागत मित्र मंडळाच्या वतिने पूर्णा शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मैदानात आज रविवार २१ जाने २०१८ रोजी सायंकाळी ६ वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन सोहळा कार्यक्रम सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होणार असल्याची माहीती नगरसेवक उत्तम भैया खंदारे यांनी दिली आहे.या निमित्त पूर्णा शहरामध्ये नामविस्तार दिन सोहळा व नामांतर लढ्यातील शहिदांना अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे.नामांतर लढ्यातील शहिदांना अभिवादन करण्यासाठी व मान्यवरांच्या विचारातून नामांतर चळवळीतील आठवणीला उजाळा देणा-या कार्यक्रमाचे सर्वांनी साक्षीदार व्हावे असी विनंती करण्यात येतेय.या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून पूज्य भदन्त उपगुप्त महास्थविर बुध्द विहार पूर्णा हे राहतील.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ रवि एन सरोदे(संचालक परिक्षा व मुल्यमापन मंडळ,स्वा रा ति म.विद्यापीठ नांदेड) हे राहणार आहेत.तर प्रमुख वक्ते व सत्कारमुर्ति म्हणून सिध्दार्थ खरात हे (सहसचिव,उच्च व तंत्रशिक्षण विभाग,मंत्रालय,मुंबई)उपस्थित राहणार आहेत.आणि स्वागताध्यक्ष म्हणून उत्तम भैया खंदारे हे राहतील.तसेच प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य मोहनराव मोरे,प्रकाश कांबळे( नामांतर लढ्यातील अग्रणी पँथर),ए जी खान (डि वाय एस पी),सुनिल ओव्हळ (पि आय पूर्णा) हे उपस्थित राहतील.शिवाय,प्रमुख म्हणून अँड धम्मा जोंधळे नगरसेवक,अनिल खर्गखराटे नगरसेवक,अँड हर्षवर्धन गायकवाड नगरसेवक,विरेश कसबे नगरसेवक,मधुकर गायकवाड नगरसेवक,हाजी कुरेशी नगरसेवक, महेबुब कुरेशी नगरसेवक,श्रीकांत हिवाळे,दादाराव पंडीत सामाजिक कार्यकर्ते,मुकूंद भोळे नगरसेवक,देवराव दादा खंदारे माजी नगरसेवक,अशोक धबाले मा.नगरसेवक,शेख रफिक,शेख इस्माईल हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.तसेच तथागत मित्रमंडळाचे अध्यक्ष विशाल भुजबळ,सचिव किरण सरोदे,उपाध्यक्ष नितिन भावे,कोषाध्यक्ष प्रशांत गायकवाड,सल्लागार सुशांत गजभारे,सुमित वाव्हळे,अजय खंदारे,धम्मभुषण जोगदंड,तुषार इंगोले,संदिप जोंधळे,सुबोध खंदारे,प्रकाश उबाळे सह असंख्य कार्यक्रारी मंडळी कार्यक्रमासाठी परिश्रम घेताहेत.अभिवादन सभेनंतर लगेचच भिम व बुध्द गीतांचा सप्तसुर म्युझिक ग्रुप लातूर कार्यक्रम सुरू होणार आहे.सदरील नामविस्तार दिन सोहळा कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे अवाहन तथागत मित्र मंडळाच्या वतिने करण्यात आले आहे.

शांती, प्रगती,मुक्ति सर्वांचा अधिकार-रईस इकबाल

जमाते ईस्लामी हिन्दच्या वतिने पत्रकारांचा सत्कार 

परतुर:-शांती, प्रगती, मुक्ति हा सर्वांचा अधिकार असल्याचे मत पत्रकार रईस इकबाल यांनी व्यक्त केले ते परतुर येथील शासकीय विश्राम गृह येथे दर्पन दिनानिमित्त आयोजित पत्रकारांच्या सत्कार सोहळा व जमीयत च्या पत्रकार परीषदेत बोलत होते पुढे बोलतांना त्यांनी सांगितले की पत्रकारांनी आपली जबाबदारी योग्यरीत्या पार पाडणे अावश्यक आहे.

सध्याच्या युगात अन्याय,अत्त्याचार, दरिद्रय,अराजकता,रक्तपात,दहशतवाद,जातीयवाद,असाक्षरता,इत्यादी पसरलेले आहे हे सर्व संपविने अत्यंत गरजेचे आहे.न्याय,सदाचार,समृद्धि, सामाजिक सलोख़ा,आदर,साक्षरता, आदर्श समाज,निर्माण करणे अावश्यक असल्याचे मतही त्यांनी यावेळी मांडले.

यासाठी जमाते ईसलामे हिंद च्या वतिने महाराष्ट्र भर राज्यव्यापी मोहिम 'इस्लाम शांती, प्रगती, व मुक्ति साठी'राबवीत आहे.याद्वारे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे त्याचाच एक भाग म्हणुन दरवर्षी प्रमाणे यावर्षी पण तालुक्यातील सर्व पत्रकारांचा दर्पण दिनानिमित्त दिनांक 20 जानेवारी रोजी सत्कार सोहळा अयोजित केला होता यावेळी कार्यक्रमाची सुरुवात हाफेज अकील साहेब यांनी पवित्र ग्रंथ कुरान पठन करून केली याप्रसंगी पत्रकारांच्या वतीने अजय देसाई,एम.एल.कुरेशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले 

यावेळी जमीयत चे शहराध्यक्ष हामेद चाउस सह पञकार  उपस्तिथ होते कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता अब्दुल मुकसीद. उस्मान खान.मियां खान.नईम ख़ातिब.शेख तौफीक.आदिंनी परिश्रम घेतले.सूत्रसंचालन मोहसिन खान यांनी तर आभार प्रदर्शन हामेद चाउस यांनी केले हाफेज अकील यांच्या दुवाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली

दिल्लीत आगीमध्ये होरपळून 17 जणांचा मृत्यू, जीव वाचवण्यासाठी काहींनी इमारतीच्या गच्चीवरुन उडया मारल्या.

_________________________________

उत्तर दिल्लीतील बवाना इंडस्ट्रीयल भागातील एका तीन मजली प्लास्टिक कारखान्याला शनिवारी संध्याकाळी भीषण आग लागली. या आगीमध्ये होरपळून आता पर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार अजूनही काही जण इमारतीत अडकले असून त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अग्निशमन दलाच्या 15 ते 20 गाडया आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत. आगीवर आता नियंत्रण मिळवल्याचे सांगण्यात आले आहे. सर्वप्रथम इमारतीच्या तळ मजल्यावर आग भडकली. नेमकी कशामुळे ही आग लागली ते अजून स्पष्ट झालेले नाही. पण प्लास्टिकमुळे ही आग वेगाने पसरली. आग लागली त्यावेळी कारखान्यात कामगार काम करत होते. आग वेगाने पसरल्यामुळे अनेक महिलांना बाहेर पडता आले नाही. खालचे मजलेआगीच्या ज्वाळांनी वेढल्यामुळे काही कामागारांनी जीव वाचवण्यासाठी इमारतीच्या गच्चीवरुन उडल्या मारल्या. त्यात काही जण जखमी झाले आहेत.
संध्याकाळी 6.20 च्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर लगेचच 10 गाडया घटनास्थळी पाठवल्या असे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी टि्वट करुन आगीच्या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले. दिल्ली सरकार बचाव मोहिमेवर लक्ष ठेऊन असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारने या दुर्घटने प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत असे दिल्ली सरकार मधील मंत्री सत्येंद्र जैन यांनी सांगितले. मुंबई मध्येही अलीकडच्या काही दिवसात आगी लागण्याच्या मोठया घटना घडल्या असून त्यात अनेकांचा मृत्यू झाला.

रा.काँ.च्या हल्लाबोल मोर्चात बहुसंख्येने सहभागी व्हा-आप्पासाहेब देशमुख

विश्वनाथ देशमुख सेनगांवकर

सेनगांव:- तालुक्यासह हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी हिंगोली येथे दि.२२ जानेवारी सोमवार रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भव्य मोर्चा निघणार असुन या मोर्चाला रा.काँ.नेते अजितदादा पवार, सुप्रियाताई सुळे उपस्थित राहणार आहेत तरी या हल्लाबोल मोर्चात बहुसंख्येने सहभागी व्हा असे आवाहन माजी सभापती तथा उप नगराध्यक्ष तथा हिंगोली रा.काँ.विधानसभा अध्यक्ष आप्पासाहेब देशमुख यांनी केले आहे.
शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी,२४ तास वीजपुरवठा, बोंडअळीचे प्रति एकर २५ हजार रुपये अनुदान आदीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा भव्य हल्लाबोल मोर्चा निघणार आहे. या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार, सुप्रियाताई सुळे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. सेनगांव तालुक्यातुन बहुसंख्येने शेतकरी बांधव या मोर्चासाठी जाणार आहेत हे सरकार शेतकरी विरोधी असुन शेतकऱ्यांना कर्जाच्या खाईत लोटत आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय सरकारला घेणे भाग पाडण्यासाठी तसेच सेनगांव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी या हल्लाबोल मोर्चाचे आयोजन केले असून या मोर्चात सेनगांव तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन माजी सभापती, सेनगांव नगरपंचायत चे उप नगराध्यक्ष तथा हिंगोली राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा अध्यक्ष आप्पासाहेब देशमुख यांनी केले आहे. आ.रामराव वडकुते यांच्या नेतृत्वाखाली सेनगांव तालुक्यात या मोर्चासाठी जय्यत तयारी चालु असुन या मोर्चासाठी हिंगोली जि.प.चे उपाध्यक्ष अनिल पतंगे,तालुकाध्यक्ष रविंद्र गडदे,नगरसेवक कैलासराव देशमुख, उमेश देशमुख, संदिप बहिरे, रा.काँ.युवक तालुकाध्यक्ष तथा माजी पं.स.सदस्य विकास शिंदे आदीसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते परीश्रम घेत आहेत.

गंगाखेड येथील राष्ट्रवादी काँग्रेस च्या हल्लाबोल यात्रेच्या सभेतील काही छायाचित्रे

गंगाखेड येथील राष्ट्रवादी काँग्रेस च्या हल्लाबोल यात्रेच्या सभेतील काही छायाचित्रे

खोटे बोललेलं गळून पडू नये म्हणून लाखोंचा मेकअप केला जात असावा - धनंजय मुंडे यांचा मुख्यमंत्र्यांना टोला

नांदेड ( लोहा ) दि 20 - श्री देवेंद्र फडणवीस हे  देखणे आहेत त्यामुळे त्यांना सुंदर दिसण्यासाठी तशी मेकअपची गरज नाही . मात्र मुख्यमंत्री म्हणून ते राज्यातील जनतेला  रेटून खोटे बोलतात हे खोटे रेटून बोललेले गळून पडू नये म्हणून कदाचित त्यांच्या  मेकअप वर लाखोंचा खर्च केला जात असावा असा टोला विधानपरिषद विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मराठवाड्यात सुरु असलेल्या  हल्लाबोल यात्रेच्या पाचव्या दिवशी नांदेड जिल्ह्यातील लोहा येथे आयोजित भव्य मोर्चा आणि त्यानंतरच्या जाहीर सभेत ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर माजी उपमुख्यमंत्री श्रीअजितदादा पवार , प्रवक्ते नवाब मलिक, सौ चित्राताई वाघ आमदार विक्रम काळे आमदार सतीश चव्हाण माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे ज्येष्ठ नेते कमलकिशोर कदम संग्राम कोते आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

मी मुख्यमंत्री बोलतोय या मुख्यमंत्र्यांवर चित्रीत होणा-या कार्यक्रमावर होणारा लाखोंच्या खर्चाचा मुद्दा मागील 2 दिवसापासून गाजत आहे त्याचा संदर्भ घेत श्री मुंडे यांनी वरील टोला लगावला. मुख्यमंत्री यांच्या मेकअप आणि चेह-यावर प्रकाश टाकण्यासाठी लाखोंचा खर्च करण्यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेचा मेक ओव्हर नीट करा आणि विकास कामांवर नीट प्रकाश टाका असेही ते म्हणाले .

भाजप-सेनेच्या कार्यकाळात प्रत्येक घटक संपावर जातोय. कामगार, शेतकरी, डॉक्टर, बँक कर्मचारी सर्वच संपावर जातायत. या हल्लाबोल आंदोलनाच्या माध्यमातून आता या सरकारलाच संपावर पाठवावं लागेल असा इशाराही त्यांनी दिला.

आलेगावं येथे विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन


पूर्णा -प्रतिनिधी-तालुक्यातील आलेगावं सवराते येथे नेहरू युवा केंद्र परभणी व नेहरू युवा मंडळ आलेगावं यांच्या संयुक्त विद्यमाने ,परिसरातील युवकांसाठी सामुदायिक विकास प्रशिक्षण 27 जानेवारी ते 29 जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आले आहे,या  प्रशिक्षण कार्यक्रमात युवकांना संभाषण कौशल्य ,व्यक्तीमत्व विकास,जीवन कौशल्य, योग्य जीवनाचा मार्ग, संगणक साक्षरता प्रबल करणे कॅशलेस जनजागृती या विषयावर मार्गदर्शन केले जाणार असून या तीन दिवसीय विकास प्रशिक्षण कार्यक्रमात युवकांनी मंडळाने सहभागी व्हावे असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष अनिता येडके, शिवाजी येडके,यांनी केले आहे

एकलारा बानोदा येथे अल्पवयीन मुकबधीर मुलीचा ६५ वर्षीय वृध्दाने केला विनयभंग आरोपीला जामीन


संग्रामपुर [ प्रतिनिधी ] दि २० जाने तालुक्यातील एकलारा बानोदा येथील एका अल्पवयीन मुकबधीर मतिमंद मुलीचा गैरफायदा घेऊन चॉकलेटचे आमीष दाखवुन वाईट उद्देशाने एकांतात नेऊन आरोपी महादेव विष्णुजी अस्वार रा एकलारा बानोदा या ६५ वर्षीय वृध्दाने विनयभंग केल्याची घटना दि १९ रोजी रात्री ११ वाजता दरम्यान घडली
पीडीत मुलीच्या वडिलाने तामगाव पो स्टे ला दिलेल्या फिर्यादी वरुन तामगाव पोलीसांनी आरोपीला एकलारा बानोदा येथुन मध्यरात्री अटक करून आरोपी विरुध्द अ प नं ७/ १८ कलम ३५४ ब मास्को बाल लैगिक कायदा अंतर्गत कारवाई केली आरोपी महादेव विष्णुजी आस्वार ला न्यायलयात हजर केले असता पोलीसांनी सदर आरोपीच्या न्यायलयीन कोठडीची मांगणी केली असता वृद्धअसल्याचा विचार करून आरोपीला जामीन मिळाली  पुढील तपास तामगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार डि बी इंगळे यांच्या मार्गदर्शनात पी एस आय गणेश राठोड करित तालुक्यात एकाच आठवड्यात माणुसकीला काळीमा फासणारी दुसरी घटना असल्याने वातावरण ढवळुन निघाले आहे

पांघरा ढोणे येथे आज हरी कीर्तन


पूर्णा -प्रतिनिधी-तालुक्यातील पांघरा ढोणे येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह तुळशी रामायण कथेमध्ये आज रविवार 21 जानेवारी रोजी रात्री 9 ते 11 ह भ प वैजनाथ थोरात महाराज आळंदी देवाची यांचे रात्री 9ते 11 हरी कीर्तन आयोजित केले असून या कीर्तनाचा लाभ परिसरातील भाविकांनी घ्यावा असे आवाहन गावकरी मंडळी पांघरा ढोणे यांनी केले आहे

पूर्णा पंचायत समिती येथील वरिष्ठ सहायक लिपिक कनकुटे 1500 रुपयाची लाच घेताना अँटी करप्शनच्या जाळ्यात ?


कुंपणाने शेत खाल्ले कर्मचाऱ्याने कर्मचाऱ्यांकडून घेतली लाच

पूर्णा{राजेश वालकर} पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्याच्या गाडीवरील चालकाकडून 1500 रुपयांची लाच स्वीकारतांना पूर्णा पंचायत समितीतील वरिष्ठ सहायक लिपिकास नांदेड येथील लाच लुचपत प्रतिबंधक च्या पथकाने सापळा रचून रंगेहाथ पकडून गजाआड केल्याची घटना 20 जानेवारी रोजी पूर्णा शहरातील वरदळीच्या ठिकाणी घडल्यामुळे पूर्णा शहरात खळबळ उडाली असून पथकाने दुचाकीवरून रक्कम स्वीकारून जात असतांना ताब्यात घेतले ,
या बाबत अधिक माहिती अशी की ,पूर्णा पंचायत समिती मधील शासकीय गाडीवरील चालक याचे काही दिवस अतिरिक्त काम केल्याचे देयके पंचायत समितीच्या लेखा शाखेत प्रलंबित होती ,ही बिले मंजूर करण्यासाठी वरिष्ठ सहायक लिपिक राजेंद्र मुंजाजी कनकुटे याच्या कडे वारंवार विनंती केली असता त्याने  लाचेची मागणी केली, यासंदर्भात सदर चालकाने लिपिकाविरुद्ध लाच लुचपत प्रतिबंधात्मक पोलिसांकडे तक्रार दिली, तडजोडी अंती ठरलेल्या प्रमाणे 1500 रुपयाची लाच स्वीकारतांना पूर्णा पंचायत समितीचे लिपिक राजेंद्र मुंजाजी कनकुटे हे शनिवारी सायंकाळी पूर्णा शहरातील एकबाल पाटी जवळ 1500 रुपयांची लाच स्वीकारतांना रंगेहाथ सापडले पोलीस उपअधीक्षक एन एन बेंबडे ,पोलीस निरीक्षक भारती, हवालदार लक्ष्मण मुरकुटे ,अनिल कटारे,अविनाश पवार,सचिन गुरसुडकर ,सारिका टेहरे,भालचंद्र बोके,रमेश चौधरी,यांनी सापळा यशस्वी रित्या पार पाडला आरोपी कडून लाचेची रक्कम ताब्यातून हस्तगत करण्यात आली असून त्याच्या विरुद्ध पूर्णा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाठीमागच्या बचावला लाचेची रक्कम स्वीकारतांना कनकुटे सह पाठीमागे बसलेला पंचायत समितीचा लेखाविभागातील अन्य एक कर्मचारी सोबतीला होता रक्कम स्वीकारून त्या सोबत्याला लाचेची काही रक्कम कनकुटे यांनी दिली परंतु पाठीमागच्या पथकाने दोघांना काही अंतरावर पकडल्यामुळे दोघांचीही तारांबळ उडाली उसनंवारीचेही पैसे अन्य कर्मचाऱ्याकडून पथकाने जप्त केले ,एकंदरीतच शासकीय कर्मचाऱ्या कडूनच शासकीय कर्मचारी लाच स्वीकारतांना पकडण्याचा पूर्णेतील हा पहिला प्रकार असल्याचे बोलल्या जाते

पूर्णेत श्रामनेर शिबिराचे आयोजन


पूर्णा-प्रतिनिधी-शहरातील बुद्धविहार येथे आगामी 15 व्या बौद्धधम्म परिषदेच्या निमित्ताने 16 ते 22 वयातील मुलांसाठी श्रामनेर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, दि 23 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या या शिबिरात तज्ञ भिक्कु मार्गदर्शन करणार असून वंदना धम्म अभ्यास वर्ग विपश्यना अभ्यास वर्ग घेण्यात येणार आहे, दुःख नष्ट करण्याचे न्यान व मार्ग अर्थासहित सांगितल्या जाते ते न्यान इंद्रिय परंपरेचे न्यान केवळ बुद्धाच्या धम्मात आहे या विचाराचा प्रचार प्रसार होण्यासाठी तरुण मुलावर धम्म संस्कार करण्यासाठी या श्रामनेर शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन भदंत उपगुप्त महाथेरो डॉ बी आर आंबेडकर स्मारक व बुद्धविहार समिती पूर्णा यांनी केले आहे

कपिल झिंजाडे यांची निवड


पूर्णा -प्रतिनिधी -तालुक्यातील नऱ्हापूर येथे कपिल दत्तराव झिंजाडे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पूर्णा तालुकाउपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे, निवडीचे पत्र आ डॉ मधुसूदन केंद्रे यांनी विधानसभा अध्यक्ष श्रीधर पारवे ,मारोतराव बनसोडे,तालुकाध्यक्ष शहाजी देसाई, यांच्या उपस्थितीत झिंजाडे यांनां प्रदान केले या निवडी बध्दल कपिल झिंजाडे यांचे विठ्ठल कदम,बालाजी झिंजाडे, प्रमोद झिंजाडे, गंगाधर झिंजाडे, सूरज झिंजाडे, शुभम झिंजाडे, राकेश झिंजाडे, सह आदींनी स्वागत केले आहे.

परळीत निबंध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण मिथिलेश नरबागे, प्रतीक लाहोटी प्रथम


स्पर्धांमधून सुप्त कलागुणांना वाव मिळतो: भिवाजी डोईफोडे
परळी (प्रतिनिधी) येथील कामगार कल्याण केंद्रातर्फे आयोजित निबंध स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला. या  स्पर्धेच्या पहिल्या गटात मिथिलेश नरबागे तर दुसऱ्या गटात प्रतीक लाहोटी यांनी प्रथम क्रमांक मिळविला. परळी शहरातील विविध शाळेतील विद्यार्थी या निबंध स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेचे बक्षीस वितरण कामगार कल्याण केंद्राच्या सभागृहात पार पडले. अध्यक्षस्थानी बुलढाणा अर्बन बँकेचे शाखा व्यवस्थापक भिवाजी डोईफोडे होते तर पाहुणे म्हणून माजलगाव शुगरचे प्रकाश परळीकर, केदार बुंदेले, राजकुमार लाहोटी, केंद्र संचालक आरेफ शेख, उमा ताटे उपस्थित होते. या स्पर्धेत पहिल्या गटात श्रद्धा सुगरे  द्वितीय,  जय धुमाळ  तृतीय तर शेख तबस्सुम, शेख फिरदोस यांना उत्तेजनार्थ पारितोषिके मिळाली. तसेच दुसऱ्या गटात सागर कांबळे द्वितीय,  नेहा गोडबोले तृतीय तर संध्या सुगरे, शेख समरीन यांनी उत्तेजनार्थ बक्षीस मिळविले. प्रत्येक स्पर्धाही आपल्या सुप्त कलागुणांना वाव मिळवून देते, स्पर्धेतील सहभागाने आत्मविश्वास वाढतो. अभ्यासासोबत विविध कला स्वतःमध्ये विकसित करावे असे आवाहन भिवाजी डोईफोडे यांनी केले. स्पर्धेसाठी भगवान मंडलीक, मसरत खान अश्विनी पांडकर, अंबिका  घोगरे यांनी परिश्रम घेतले.

फोटो क्यापशन... परळी कामगार कल्याण केंद्राच्या वतीने निबंध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वाटप करतांना भिवाजी डोईफोडे, प्रकाश परळीकर, राजकुमार लाहोटी, केंद्र संचालक आरेफ शेख, उमा ताटे आदी.