तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Saturday, 27 January 2018

शिक्षण संचालक कार्यालयावर प्रेरक संघटनेचा विविध मागण्या संदर्भात भव्य मोर्चा-गौतम साळवे

प्रतिनिधी
भोकरदन:- दि ३० जाने रोजी महाराष्ट प्रेरक संघटनेच्या वतिने शिक्षण संचालक कार्यालय पुणे येथे भव्य मोर्चाचे  आयोजन राज्य अध्यक्ष मा.देशमुख साहेब यांच्या नेत्रत्वाखाली केले आहे.
साक्षर भारत यौजने अंतर्गत महाराष्टामधिल दहा जिल्हा मध्ये प्रेरकांची निवड करण्यात आली होती.सदरील प्रेरकांनी २०११-२०१२ पासुन ग्राम लोक शिक्षण केंद्रा मार्फत निरक्षराना साक्षर करण्याचे काम केले आहे.सदरील यौजनेमधिल प्रेरकांची मुदत ३१ डिंसेबर ला संपली असताना आज रोजी पर्यत नियुक्तीचे कुठलेही पञ कार्यालयास आलेले नाही त्यामुळे सदरील प्रेरकानवर बेरोजगारीची कुर्हाड कोसळली आहे.साक्षर भारत यौजने अंतर्गत प्रैरकांचे मागील जवळपास ४५ महीण्याचे मानधण थकीत आहे.वेळोवेळी पाठपुरावा करुनही शासनाणे त्यांचे मानधण अदा केलेले नाही.त्यामुळे प्रेरकांचे मानधण तात्काळ मिळावे आणी त्यांची सम्मानपुर्वक नौकरीत कायम करावे यासाठी प्रेरक संघटना महाराष्ट राज्य यांच्या वतिने शिक्षक संचालक कार्यालय पुणे येथे  दि.३० जानेवारी रोजी भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे.तरी जालना जिल्हा मधिल सर्व प्रेरकांनी पुणे मोर्चा साठी हजर राहण्याचे अवाहन जालना जिल्हा अध्यक्ष गौतम साळवे यांनी केले आहे.

 
     ╭════════════╮    ▌ प्रतिनिधी : मधुकर सहाने - भोकरदन -------------------------------- 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी मो.नं./व्हाॅट्स अॅप :  9637599472 ...                           ╰════════════╯

शेवगा येथे प्रजासत्ताक दिनी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप 

परतूर:-तालुक्यातील शेवगा येथे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने परब फाऊंडेशन तर्फे 

विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप करण्यात आले.शेवगा येथील जि. प. शाळेत' प्रजासत्ताक दिन ' मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

 याप्रसंगी सर्वप्रथम ध्वजारोहण करण्यात आले . याप्रसंगी परब फाऊंडेशन चे अध्यक्ष शेख शबीर व सचिव बाळासाहेब धुमाळ यांच्या हस्ते कु. सारिका लिंबाजी धुमाळ या विद्यार्थिनीस शालेय साहित्य व गणवेश वाटप करण्यात आला नंतर सर्व गरजू ना ही . परब फाउंडेशन च्या वतीने  जे विद्यार्थी आर्थिक अभावामुळे शिकू शकत नाहीत त्यांना मदतीचा हात देणार 

परब फाऊंडेशन मध्ये आदित्य कांकरिया व मधू कांकरिया हे देखील वेळो वेळी मदत करतात .

 याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री पाटोळे पी. जे. ग्रामसेवक ग्रामसेवक बालाजी बोकन, तलाठी श्री देशपांडे , सरपंच कैलासनाथ भजन,  रामेश्वर राजबिंडे, उपसरपंच  विष्णू उगले शाळेचे सर्व शिक्षक , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवा धुमाळ, उपाध्यक्ष, सर्व सदस्य व विद्यार्थी उपस्थित होते.

रक्तदान" म्हणजे गरजुवंतासाठी जीवनदान आहे- पोलीस निरीक्षक रेंगे

9 महिला व 53 पुरूषांनी केले रक्तदान

परतुर:-प्रजासत्ताक दिनाच्या अवचित्याने गायत्री परिवाराने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे ,प्रल्हाद गुंजकर आदी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते भारतमाता पूजन करून शिबीराची सुरुवात करण्यात आली. श्री रेंगे यांनी प्रजासत्ताक दिनाच्या व गायत्री परिवाराच्या उपक्रमास शुभेच्छा देऊन रक्तदात्याचे पुष्पहार प्रशस्तीपत्र व पेन देऊन अभिनंदन केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविक प्रसंगी स्वामी विवेकानंद बी सी ए महाविद्यालयाचे प्राचार्य व गायत्री परिवारातील सदस्य प्रा. शाम जवळेकर यांनी गायत्री परिवाराच्या सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, आदी उपक्रमाची संक्षिप्त माहिती दिली व प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन रतदानाचे महत्व सांगितले. या शिबीरात शहरातील 9 महिला व 54 पुरूष एकुण 62 रक्तदात्यांनी रक्तदान देऊन मोलाचे कार्य केले.

शहरातील व्यापारी, डॉक्टर, सामाजिक कार्य करणाऱ्या विविध पक्षातील प्रतिनिधी, पत्रकार मंडळी ,  नगरसेवक आदींनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

जनकल्याण रक्तपेटी जालना यांनी रक्त संकलित केले.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गायत्री परिवारामधील प्रमुख सदस्य कान्हा बगडिया, लखन जोशी, प्रा शाम जवळेकर, निखिल अग्रवाल ,सतिष लाळे, नवीन बगडिया,सर्वेश मोर,सागर गेलहोत,दत्तप्रसाद जेथलिया,प्रणय मोर, रामेश्वर नरवडे,गौरव लाठी,रोहित शर्मा,आयुष्य मुंदडा, विष्णू पावले, रोहित मुंदडा,श्रेणीक बगडिया,पंकज गेलहोत, वल्लभ जवळेकर आदीनी परिश्रम घेतले.

सेनगांव प्रिमियर लिग २०१८ ला उत्साहात सुरुवात

विश्वनाथ देशमुख सेनगांवकर

सेनगांव:- शहरात दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी सेनगांव प्रिमियर लिग २०१८ चे आयोजन करण्यात आले असुन याचे उदघाटन जि.प.सदस्य रामरतन शिंदे यांच्या हस्ते दि.२७ जानेवारी शनिवार रोजी थाटात संपन्न झाले.
सेनगांव शहरात दरवर्षी क्रिकेटचे सामने आयोजित केले जातात. सेनगांव प्रिमियर लिग २०१८ मध्ये एकुण ८ संघ दाखल झाले असुन याचे उदघाटन भानखेडा सर्कलचे जि.प.सदस्य रामरतन शिंदे यांच्या शुभहस्ते दि.२७ जानेवारी शनिवार रोजी थाटात उदघाटन संपन्न झाले. यावेळी माजी सभापती दिनकरराव देशमुख, भारत अण्णा लोखंडे,नारायण कोटकर,अनिल अगस्ती, प्रविण महाजन,सुनिल देशमुख, वैभव देशमुख, प्रताप लोखंडे, संतोष गाढवे-पाटील उपस्थित होते.या प्रिमियर लीगमध्ये जय किसान क्रिकेट क्लब भर जहागिर,युवा योध्दा सेनगांव,सुपर किंग सेनगाव, राज क्रिकेट क्लब सेनगाव, फ्रेन्डस क्रिकेट क्लब सेनगाव, के.सि.सि.करडा,तुळजाई स्पोर्टस, फ्रेन्डस ११ शिंदेफळ संघानी सहभाग घेतला असुन प्रथम पारीतोषीक जि.प.सदस्य रामरतन शिंदे यांच्याकडुन ३१००० रुपये तर व्दितीय पारीतोषीक २१००० रुपये सेनगांव ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष राजेंद्र गोरडे यांच्याकडून ठेवण्यात आले असुन मँन आँफ द मँच शिवसेना हिंगोली उप जिल्हाप्रमुख संदेशजी देशमुख यांच्याकडून तर मँन आँफ द सिरीज ग्रामीण काँम्पुटर सेनगांव यांच्याकडुन देण्यात येणार आहे. सेनगांव प्रिमियम लिग २०१८ चे आयोजक वैभव देशमुख, अनिल अगस्ति,प्रविण महाजन,सुनिल देशमुख, प्रताप लोखंडे,संतोष गाढवे-पाटील हे आहेत.


जिल्ह्यातील 96 कोटी रुपये खर्चाच्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांचे

ना. बबनराव लोणीकरांच्या हस्ते भुमिपुजन
                                                                                                                                                                                                                            बोदवड, मुक्ताईनगर व भुसावळ तालुक्याच्या 82 गावांमधील नागरीकांना
12 रुपयांत एक हजार लिटर जंतुविरहित पाणी मिळणार
                                                                                                                                                                                                                          जळगाव, दि. 27 - मुख्यमंत्री पेयजल योजनेतंर्गत राबविण्यात येत असलेल्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या माध्यमातून बोदवड तालुक्यातील 48 गावांना, भुसावळ तालुक्यातील 31 गावांना तर मुक्ताईनगर तालुक्यातील 3 गावांना येत्या दीडवर्षात अवघ्या 12 रुपयांत एक हजार लिटर जंतुविरहित पाणी मिळणार असल्याची माहिती राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.
जलस्वराज्य टप्पा 2 अंतर्गत बोदवड येथे 51 गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे भुमिपुजन ना. लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. याप्रंसगी खासदार रक्षाताई खडसे, माजीमंत्री तथा आमदार एकनाथ खडसे, आमदार संजय सावकारे,जिल्हा बँकेच्या चेअरमन रोहिणीताई खडसे-खेवलकर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नंदकुमार महाजन, बोदवड नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा मुमताज बागवान, बोदवड पंचायत समितीचे सभापती गणेश पाटील, उपसभापती दिपाली राणे, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती निवृत्ती पाटील, जिल्हा परिषद सदस्य जयपाल बोदडे, निलेश पाटील, भानुदास गुरसळ, वर्षाताई पाटील, किशोर गायकवाड, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता एस. जी. कालिके, कार्यकारी अभियंता एस. सी. निकम, तहसीलदार थोरात, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी भोसले यांचेसह नगरसेवक, पंचायत समितीचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी बोलतांना पाणीपुरवठा मंत्री ना. लोणीकर म्हणाले की, राज्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंर्द फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री पेयजल योजनेतंर्गत राज्यात 2500 कोटी रुपये खर्चाची कामे सुरु आहे. देखभाल व दुरुस्ती अभावी राज्यातील अनेक पाणीपुरवठा योजना बंद पडल्या होत्या तसेच अनेक योजना अपुर्ण अवस्थेत होत्या. राज्य शासनाने या योजनांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी 130 कोटी रुपयांची तरतुद केली असून त्यापैकी 45 कोटी रुपयांचा निधी या योजनांसाठी उपलब्ध करुन दिला आहे. ही योजना पूर्ण् झाल्यांनतर या गावांमधील पाणीटंचाईची समस्या कायमस्वरुपी मिटणार आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातर्फे जळगाव जिल्हयासाठी 453 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला असून यामध्ये 108 कोटी रुपये शौचालयांची निर्मिती करण्यासाठी तर मुख्यमंत्री पेयजल योजनेतून जिल्हयातील 71 योजनांसाठी 170 कोटी रुपये दिले असल्याचे सांगून श्री. लोणीकर पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेचा नारा दिला. राज्यातील 56 लाख कुटूंब उघड्यावर शौचास बसत होते. शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचाराने चालणाऱ्या शासनाने स्वच्छ महाराष्ट्राचा संकल्प केला आहे. या कुटूंबांना शौचालय बांधून देण्याचा निर्णय घेतला असून यासाठी प्रत्येकी 12 हजार रुपये अनुदान देण्यात येत आहे. गेल्या तीन वर्षात राज्यातील 17 जिल्हे, 234 तालुके, 24 हजार ग्रामपंचायती तर 34 हजार गावे संपूर्ण हागणदारीमुक्त झाली आहे. तर येत्या सहा महिन्यात संपूर्ण राज्य हागणदारीमुक्त करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 
यावेळी बोलतांना माजीमंत्री आमदार एकनाथ खडसे म्हणाले की, बोदवड शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना सुरु करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून तालुक्यातील दुष्काळ व टंचाई दूर करण्यासाठी उपसा सिंचन योजना पूर्ण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर शासनाच्यावतीने तालुक्यात सुरु असलेल्या विविध विकास कामांची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. याप्रसंगी खासदर रक्षाताई खडसे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता श्री. कालीके यांनी या योजनेचा आराखडा तयार करताना 2038 मधील लोकसंख्येचा विचार करुन ही योजना तयार करण्यात आल्याचे सांगितले. तसेच या योजनेची सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस ना. लोणीकर यांच्या हस्ते 45.52 लाख रुपये खर्चाच्या बोदवड व मुक्ताईनगर तालुक्यातील 51 गावे पाणीपुरवठा योजनेच्या कोनशिलेचे अनावरण करुन या योजनेचे भुमिपुजन करण्यात आले. यावेळी बोदवड नगरपंचायतीच्यावतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास नगरपंचायतीचे नगरसेवक, विविध गावांचे सरपंच, विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.
त्यानंतर ना. लोणीकर यांच्या हस्ते भुसावळ तालुक्यातील तळवेल येथे 33 कोटी 74 लाख रुपये खर्चाच्या 31 गावे पाणीपुरवठा योजनेच्या कोनशिलेचे अनावरण करुन या योजनेचे भुमिपुजन करण्यात आले. यावेळी मान्यवरांसह तळवेलचे सरपंच सुनील पाटील हे उपस्थित होते. तर भुसावळ तालुक्यातील खडका येथे 16 कोटी 82 लाख रुपये खर्चाच्या निमशहरी खडके पाणी पुरवठा योजनेच्या कोनशिलेचे अनावरण करुन भुमिपुजन करण्यात आले. यावेळी मान्यवरांसह माजी आमदार दिलीप भोळे, यांचेसह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

भरत मोरे यांची निवड


पूर्णा -प्रतिनिधी -तालुक्यातील पिंपळगाव लिखा येथील भरत संभाजी मोरे यांची महाराणा ब्रिगेडच्या पूर्णा तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. निवडीचे पत्र महाराणा ब्रिगेडचे महाराष्ट्र महामंत्री राजेशशिंह नाईक यांनी प्रदान केले असून निवडीनंतर भरत मोरे यांचा पिंपळगाव लिखा येथे नागरी सत्कार करण्यात आला, यावेळी त्यांनी महाराणा ब्रिगेडच्या माध्यमातून महाराणा प्रताप यांचे विचार घरा घरात पोहचून राजपूत समाजात संघटन वाढवून पूर्णा तालुक्यात गावागावात शाखा व युवकांना संघटित करणार असल्याचे ते म्हणाले

फ्लॅटफार्म एक वर नवीन तिकीट खिडकी सुरू करण्याची मागणी


पूर्णा -प्रतिनिधी-पूर्णा शहरातील रेल्वेच्या प्लॅटफार्म क्रमांक एक वर प्रवाश्यांच्या शेवेसाठी नवीन तिकीट खिडकी उघडण्यात यावी अशी मागणी, पूर्णा तालुका विकास संघर्ष समिती तर्फे रेल्वे महाव्यवस्थापका कडे एका लेखी निवेदना द्वारे  करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,पूर्णा हे निजाम कालीन रेल्वे स्टेशन असून या स्थानकावरून दररोज जलद अति जलद वीस ते तीस गाड्या धावतात परंतु शहराच्या दक्षिण बाजूला विजय नगर,पंचशील नगर,डॉ आंबेडकर नगर,तहसील कार्यालय ,पंचायत समिती, अशी मोठी वस्ती आहे दररोज हजारो प्रवाशी ये जा करतात प्लॅटफार्म क्र चारवर तिकीट काढण्यासाठी असलेली सुविधा ही प्लॅटफार्म क्र एकवरील दक्षिणेकडील प्रवाश्यांना गैर सोयीचे असून जेष्ठ नागरिक अबाल वृद्ध ,मुले ,महिला यांना तिकिटांसाठी धावपळ करावी लागत आहे. त्यामुळे दक्षिणेकडील बाजूला अतिरिक्त तिकीट खिडकी उघडून शेकडो प्रवाश्यांना दिलासा द्यावा अशी मागणी दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापकाकडे पूर्णा तालुका विकास संघर्ष समितीचे अध्यक्ष शेख महेबूब कुरेशी,सचिव रमेश सरोदे,यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे

संतोष भोसले यांना पुरस्कार प्रदान

सुभाष मुळे....
------------------
गेवराई, दि. २७  __ येथील पञकार संतोष भोसले यांना शनिवार, दि. २७ रोजी बीड येथे विविध मान्यवरांच्या उपस्थीतीत मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार प्रदान करण्यात आला.
           दैनिक सामना चे गेवराई तालुका प्रतिनिधी संतोष भोसले यांनी पञकारीता क्षेञात उल्लेखनीय काम केल्याबद्दल दखल घेत बीड येथील सा. कश्मकश व दैनिक दिव्यवार्ता च्या संयुक्त विद्यमाने संपादक, संयोजक मुहंमंद अबुबकर यांनी पुरस्कारासाठी निवड केली होती. त्याचे वितरण शनिवार रोजी करण्यात आले.
      गेल्या ८ वर्षापासुन हा सामाजिक उपक्रम चालवला जात आहे. पञकारीता, व सामाजीक क्षेञात तब्बल २५ वर्ष उल्लेखनीय काम केल्याबद्ल संतोष भोसले यांना हा पुरस्कार मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस.एम देशमुख, अमरावती येथील प्रसिद्ध कवी अबरार काशिफ, जेष्ठ पञकार शोएब खुसरो, पञकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संतोष मानुरकर, वसंत मुंडे, जिल्हाध्यक्ष वैभव स्वामी, संपादक व संयोजक महंमद आबुबकर यांसह विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

पांडुरंग ईगंलिश स्कुल येथे प्रजासत्ताक दिन साजरा


शांताराम मगर प्रतिनिधी लोणी खुर्द
वैजापुर तालुक्यातील तलवाडा पांडुरंग ईगलीश स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला .झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव सचिन सुर्यवंशी हे होते तर प्राचार्य संतोष सुर्यंवशी मुख्याध्यापक रुपाली पवार.दिपाली तळेकर राणी सुर्यवंशी आदिंचि प्रमुख उपस्थिती होती प्रथम सचिन सुर्यंवशी यांच्या हस्ते ध्वजावंदन करण्यात आले त्यानंतर विध्यार्थीयांनी विविध प्रात्यक्षिके सादर केली त्यानंतर मुलांनी विविध वेशभूषा सादर करून देशभक्ती पर गीते सादर केली या सांस्कृतिक कार्यक्रमाचे गावकर्यानी कौतुक केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष सुर्यवंशी यांनी केले तर आभार सचिन सुर्यंवशी यांनी मानले.

मँरॉथॉन स्पर्धेत देशमुख प्रथम


सोनपेठ : येथिल साजेद भैया कुरेशी मित्र मंडळाच्या वतीने 26 जानेवारी व साजेद कुरेशी यांच्या वाढदिवसानिमित्त 27 जानेवारी रोजी आयोजीत केलेल्या मँरॉथॉन स्पर्धेत प्रकाश नानासाहेब देशमुख ( वाशीम)  यांनी प्रथम क्रमांक  पटकावला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलिस निरीक्षक सोपान सिरसाट, उद्घाटक नगरसेवक अँड. श्रीकांत विटेकर, प्रमुख मार्गदर्शक प्राचार्य डॉ. वसंतराव सातपुते, सपोनि बाबुराव जाधव, प्रजापिता  ब्रम्हाकुमारीच्या मिरा बहन, नगरसेवक सुनिल बर्वे, प्रा. गोविंद वाकणकर, तालुका क्रीडा अधिकारी सुमित लांडे, विकास फपाळ रविकुमार स्वामी प्रा. डॉ. संतोष रणखांब आदिंची मंचावर उपस्थिती होती.
साजेद भैया कुरेशी मित्र मंडळाच्या वतीने मँरॉथॉन स्पर्धेचे आयोजन सोनपेठ शहरात करण्यात आले होते.  यास्पर्धेसाठी राज्यभरामधून स्पर्धकांनी नोंदनी करत सहभाग नोंदवला होता, 273 स्पर्धक या स्पर्धेत राज्यातून सहभागी झाले होते. त्याच प्रकाश नानासाहेब देशमुख यांनी प्रथम क्रमांक पटकावला.  शुभम कैलास राठोड  चिखली बुलढाणा यांनी द्वितीय क्रमांक, संजय मारोती झाकणे परभणी यांनी तृतीय किरण पांडुरंग मात्रे चतुर्थ परभणी व अर्जुन रामदास साळवे चिखली बुलढाणा यांनी पाचवा क्रमांक मिळवले.
यावेळी परभणी अथलेटिक्स असोशियशनचे पदाधिकारी पंच म्हणून उपस्थित होते. तसेच सुत्रसंचालन बाळासाहेब लष्करे यांनी तर आभार काशीनाथ लोकरे यांनी मानले मित्र मंडळाचे संयोजक समितीचे महंमदनूर कुरेशी, शेख जावेद, वसंत राठोड, अश्फाक अन्सारी, शेख सलमान, शेख छोटु, वाजेद कुरेशी, राजकुमार राठोड,  शेख मोईन, शेख शारोख, अफरोज कुरेशी, बाबा पाडुळे, अविनाश राठोड,  अक्रम पठाण, व सर्व साजेद भैय्या मित्र मंडळाचे कार्यकर्ते ऊपस्थित होते.

जय वैष्णवी माता शिक्षण संस्थेच्या वतीने खेर्डा जि.प.शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेश वाटप कार्यक्रम संपन्न...

पाथरी- तालुक्यातील खेर्डा येथील जय वैष्णवी माता शिक्षण संस्थेच्या वतीने जि.प.प्रा.शाळा खेर्डा शाळेतील  26 गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेश वाटपाचा कार्यक्रम 25 जानेवारी 2018 रोजी शाळेत संपन्न झाला.यामुळे खेर्डा येथील जि.प.शाळेतील १०० टक्के विद्यार्थ्यांना गणवेश उपलब्ध झाला आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा.ज्ञानेश्वरराव आम्ले तर प्रमुख पाहुणे म्हणून मा.राजेशराव ढगे(सभापती,पं.स.पाथरी),
मा.मधुकरराव सिताफळे(उपाध्यक्ष,जय वैष्णवी माता शिक्षण संस्था,खेर्डा)मा.विष्णूप्रसाद सिताफळे
(उपसरपंच,ग्रा.पं खेर्डा),मा.सिकंदरखाॅ पठाण(उपाध्यक्ष,शा.व्य.स.खेर्डा),श्री.टेंगसे आर.एम
(केंद्रप्रमुख,कें.प्रा.शाळा हदगाव),श्री.गोरे बी.टी
(ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी हदगाव बीट),श्रीमती खाकरे मॅडम(तलाठी सज्जा रेनाखळी),मु.अ.महिपाल बी.ए. हे उपस्थित होते.

मुंबई येथे फार्मा कंपनी मध्ये कार्यरत असलेल्या आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सदैव तत्पर असणाऱ्या निलोफर नोमानी यांचे विशेष सहकार्य लाभले. जय वैष्णवी माता शिक्षण संस्थेच्या वतीने खेर्डा येथील जि.प. शाळेसाठी सतत सहकार्य करत असते. यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, गरजू विद्यार्थ्यांची शैक्षणिक फीस, १२ वि नंतर उच्च  शिक्षणासाठी लागणारे मार्गदर्शन करण्यात येते.यासाठी  संस्थेचे उपाध्यक्ष मा.मधुकरराव सिताफळे,सचिव शरद सदाफळे,शिक्षकमिञ गोपाल आम्ले पुढाकार घेत असुन
सर्व शिक्षक आणि गावकऱ्यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.या कार्यक्रमासाठी क्रिडा शिक्षक सुधाकर आम्ले,दगडु आम्ले,भरत आम्ले,शेख इरफान,जगन्नाथ आम्ले,विलास मस्के,अरूण भाग्यवंत,सिध्दोधन भाग्यवंत उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दाताळ व्ही.आर यांनी,प्रास्ताविक निपाणीकर डि.यु यांनी केले.तर आभारप्रदर्शन भिसे ए.एम यांनी केले.कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी व गावातील नागरिक उपस्थित होते.

मानवत येथे पल्स पोलिओ लसीकरण जनजागृती रॅली संपन्न...

मानवत -ग्रामिण रूग्णालय मानवत व धरती जनसेवा प्रतिष्ठाण संचलित  काँलेज आँफ फार्मसी (डी. फार्म)  पोहेटाकळी ता. पाथरी जि. परभणी यांचा संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पल्स पोलिओ लसिकरण मोहिम जनजागृती रॅली दि.27 जानेवारी 2018 रोजी आयोजित करण्यात आली होती.

  सदरील रॅली बस स्टँड मानवत पासून नगरपरिषद मानवत पर्यंत काढण्यात आली होती. ह्या रँलीत महाविद्यालयाचे प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला सदरील रँली यशस्वी करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी सुनील खरात, सत्वधर सर व महाविद्यालयातील कर्मचारी प्रा. एन.आर.आंबटवार ,आर जी. पिंपळे, व्हि.जी.साखरे,जे.एस. आचार्य, डी.एस.चिंचाने,पी.एस. नाईक ,पाटील सर,घुंबरे सर, एन.आर.आमले,जी.ए. सिसोदीया,व्ही.एस.किर्तनकार,राम दहे यांनी परिश्रम घेतले.

कठोरा फाट्या जवळ ट्रॅक्टरचा अपघात दोन गंभीर

प्रतिनिधी
भोकरदन :-तालुक्यातील अन्वा रोड परीसरातील कठोरा बाजार फाट्या जवळ ट्रेक्टर पलटी होऊन दोन जण गंभीर जखमी झाले असुन उपचारासाठी औरंगाबाद येथील शासकिय रूग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे ग्रामीण रूपयाचे डाॅ. युसुफ यांनी सांगितले या विषय सविस्तर वृत्त असे की वाकडी येथुन भरधाव वेगाने येणाऱ्या सोनालीका कंपनीच्या ट्रॅक्टर पलटी होऊन भिषण अपघात घडला असुन यात दोन जण जबर जखमी झाले असुन पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले आहे सत्तार मोहम्मद तडवी वय ३०वर्षे रा.वाकडी शकील शेर खा तडवी वय २५.वर्षे हे दोघे गंभीर जखमी झाले असुन यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सुत्रांनी सांगितले तर संजय जाफर बरडे वय ३०.वर्षे यालापण चागला मार लागला असुन याची प्रकृती स्थिर असल्याचे त्याचे सहकार्यानी सांगितले आहे विषेश म्हणजे सदरील ट्रॅक्टर वाकडी येथुन वाडी येथे मका भरण्यासाठी जात होता ट्रॅक्टर एमटी असल्याने ट्रॅक्टरची  स्पीड अधिक असल्यामुळे चालकाला कंट्रोलच करता आले नसल्यामुळे ट्रॅक्टर शेवटी पलटी झाले यात तीन जन बसेल होते तर दोन जनाची प्रकृती चिंताजनक आहे तर तीसरा जखमी झाला असल्याचे सुत्रांनी सांगितले सदरील अपघात दुपारी तीन वाजेच्या दरम्यान घडला असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले घटनेची माहिती मिळताच भोकरदन पोलीस ठाण्याचे पो काॅ गणेश पायघन पो केंद्रे पो सागर यांनी घटनास्थळी धाव घेतली होती