तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Saturday, 3 February 2018

‘ट्रिपल तलाक’विरोधात मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डच सज्ज, विवाहाच्या वराकडून लिहून घेणार.

तीन वेळा ‘तलाक, तलाक, तलाक’ असे म्हणून पत्नीला घटस्फोट देणार्या मुस्लीम समाजातील प्रथेविरुद्ध कायदा करण्याची संपूर्ण तयारी केंद्र सरकारने केली असतानाच, आॅल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने निकाहनाम्यात दुरुस्ती करणार असल्याचे जाहीर केले आहे. विवाहाच्या वेळीच वराकडून ‘तिहेरी तलाक’ देणार नसल्याचे वचन निकाह नाम्यात लेखी घेण्यात येईल,असे बोर्डाने म्हटले आहे. तिहेरी तलाकची प्रथा सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी आॅगस्ट मध्येच बेकायदा ठरविली. सरकारनेही तिहेरी तलाक देणे फौजदारी गुन्हा ठरविणारा कायदा करण्याची तयारी केली आहे. संसदेच्या या अधिवेशनात हा कायदा संमत होण्याची शक्यता आहे. त्याआधीच पर्सनल बोर्डाचे प्रवक्ते मौलाना खलील उर रेहमान सज्जाद नोमानी यांनी सांगितले की, आम्ही निकाह नाम्यात तिहेरी तलाक विरोधी तरतूद करीत आहोत. निकाह नाम्यातील एका स्तंभात ‘मी पत्नीला तिहेरी तलाक देणार नाही’, असे लिहिलेले असेल. त्यावर वराने होयची खूण केल्यास त्याला पत्नीला तिहेरी तलाक देता येणार नाही.ते म्हणाले की, बोर्डाच्या 9 फेब्रुवारी रोजी होणाºया बैठकीत या सुधारणेवर विचार केला जाईल. केंद्राच्या कायद्यास पर्सनल लॉ बोर्डाने विरोध केला आहे. आम्ही तिहेरी तलाकच्या विरोधात आहोत. मात्र कायद्याला आमचा विरोध आहे,कारण हा कायदा मुस्लिमांच्या वैयक्तिक कायद्यात हस्तक्षेप करणारा आहे. (वृत्तसंस्था)

सरकार करणार चर्चा

‘ट्रिपल तलाक’वर संसदेच्या बाहेरही सर्वपक्षीय खासदारांशी चर्चा करण्याचा निर्णय भाजपाने केला आहे. मित्रपक्षांबरोबरच विरोधकांशीही सरकार व पक ्षपातळीवर चर्चा केली जाणार आहे. पक्षांसोबत विरोधी पक्षांच्या संसद सदस्यांसोबतही चर्चा करण्यात येणार आहे. सुषमा स्वराज यांच्या घरी याबाबत एक बैठक झाली. तिथे पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यासह भाजपाचे ज्येष्ठ नेते, मंत्री उपस्थित होते. राज्यसभेत एनडीएकडे बहुमत नसल्याने भाजपाची अडचण झाली आहे. त्यामुळेच हा प्रयत्न सुरू आहे.

खोट्या कागदपत्रांद्वारे नोकरी : राज्यातील एसटी/एसटी प्रवर्गातील 11 हजार 700 कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार.

सरकारी नोकरी मिळवण्यासाठी गैरप्रकार होणे आता नवीन राहिलेले नाही. अनेकजण खोटी कागदपत्रे सादर करून सरकारी नोकरी लाटत असतात. अशाच खोटी कागदपत्रे सादर करून सरकारी नोकरी लाटणाऱ्या महाराष्ट्र राज्य सरकारमधील एसटी/एनटी प्रवर्गातील 11 हजार 700 कर्मचाऱ्यांवर कारवाईची तांगती तलवार लटकत आहे. खोटी कागदपत्रे सादर करून सरकारी नोकरी मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांना हटवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सात महिन्यांपूर्वी दिले होते. त्यामुळे या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आव्हान राज्य सरकार समोर आहे.राज्यात सुमारे 11 हजार 700 सरकारी कर्मचाऱ्यांनी जातीची खोटी प्रमाणपत्रे सादर करून सरकारी नोकरी मिळवल्याचे समोर आले आहे. यासंदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे,. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना सेवेतून कसे काय हटवायचे असा प्रश्न महाराष्ट्र सरकारला पडला आहे.  खोट्या कागदपत्रांद्वारे सरकारी नोकरी मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये असेही अनेक कर्मचारी आहेत ज्यांचा सुमारे वीस वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला होता.  तसेच खोट्या पदवीद्वारे कारकून म्हणून नोकरीची सुरुवात करणारे अनेक कर्मचारी राज्य सरकारमध्ये उपसचिवाच्या पदापर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांना कामावरून हटवल्यास राजकीय पक्ष आणि कामगार संघटना सरकारविरोधात आघाडी उघडू शकतात. या संदर्भात जुलै 2017 मध्ये दिलेल्या आदेशांमध्ये सर्वोच्त न्यायालयाने जातीच्या खोट्या प्रमाणपत्रांद्वारे नोकरी आणि शैक्षणिक संस्थेत प्रवेश मिळवणाऱ्या व्यक्तींची नोकरी आणि पदवी काढून घेचली पाहिजे, असे म्हटले होते. तसेच या लोकांची नोकरीवरून उचलबांगडी करतानाच त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची सूचनाही केली होती. जरी सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात स्पष्ट आदेश दिले असले तरी या आदेशांची अंमलबजावणी करणे राज्य सरकारसाठी अडचणीचे ठरू शकते. त्यामुळे सरकारने याबाबत न्याय विभाग आणि अॅडव्होकेट जनरल यांच्याकडून अभिप्राय मागवला आहे.

पेण अर्बन बँक घोटाळ्यातील जमिनी सिडकोला विकत घेण्याचे आदेश – मुख्यमंत्री

पेण अर्बन घोटाळ्यातील नना क्षेत्रात येणाऱ्या जमिनींची सिडको मार्फत खरेदी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. या व्यवहारातून जमा होणाऱ्या रकमेतून ठेवीदारांची देणी दिली जातील. अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.ते कर्जत येथे माजी आमदार देवेंद्र साटम यांच्या भाजप पक्ष प्रवेश सोहळ्यात बोलत होते. यावेळी आदिवासी विकास मंत्री विष्णुसावरा, राज्यमंत्री रिवद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार प्रविण दरेकर आदी उपस्थित होते.पेण अर्बन बँक घोटाळ्यामुळे खातेदारामध्ये अस्वस्थता आहे. पण खातेदारांना दिलासा मिळावा यासाठी राज्यशासन प्रयत्नशील आहे. मात्र बँक घोटाळ्यातील जप्त झालेल्या जमिनींना योग्य दर मिळत नसल्याने त्यांची विक्री होऊ शकली नाही. ही बाब लक्षात घेऊन या जमिनींची सिडको मार्फत खरेदी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. नना क्षेत्रात मोडणाऱ्या जमिनींची यात खरेदी केली जाणार आहे. ननाचा नकाशा तयार करण्याचे काम सुरू असून तो लवकरच अंतिम मंजूरीसाठी ठेवला जाईल. त्यानंतर या जमिनी सिडकोकडे  समाविष्ट होतील. आणि त्याला उचित किंमतही मिळेल. या पशातून ठेवीदांरांची देणी दिली जातील. अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.रायगड जिल्हा हा राज्यातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारा जिल्हा आहे. या विकासाला साथ देण्याचे काम राज्यसरकार करते आहे. या विकास प्रक्रियेला साथ द्या.असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. काँग्रेस- राष्ट्रवादी पक्षांवर त्यांनी यावेळी सडकून टिका केली. या दोन्ही पक्षांची अवस्था ‘जल बीन मछली ’ प्रमाणे झाली आहे. सत्ता असताना शेतकऱ्यांसाठी काही केले नाही .आणि आज हल्ला बोल करत फिरतआहेत. स्वामिनाथन आयोगाचा अहवाल २००४ सालीप्रसिद्ध  झाला. २०१४ पर्यंत यांची केंद्रात व राज्यात सत्ता होती. तेव्हा याआयोगाच्या शिफारशी का लागू केल्या नाहीत. असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

दुधना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

आशिष धुमाळ

परभणी
निम्न दुधना प्रकल्प जलाशयातून दुधना नदीपात्रात मंगळवार दि.6 फेब्रुवारी 2018 रोजी सकाळी 11 वाजता 1200 क्युसेकने पाणी सोडण्यात येत असल्याने दुधना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
परभणी शहर महानगरपालिका यांच्याकरीता क्षेत्रात पिण्याच्या पाण्याची आवश्यकता असल्याने जालना पाटबंधारे विभागाअंतर्गत निम्न दुधना प्रकल्प जलाशयातून दुधना नदीपात्रात मंगळवार दि.6 फेब्रुवारी 2018 रोजी दुपारी 11 वाजता 1200 क्युसेकने पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे दुधना नदीकाठच्या गावातील कोणत्याही रहिवासी व शेतकऱ्यांनी नदी पात्रात जाऊ नये किंवा जनावरे, पशु नदीपात्रात जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. यासाठी सर्वांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीपात्रात सोडण्यात आलेल्या पाण्याचा उपसा विद्युत मोटारीद्वारे कोणत्याही गावकऱ्यांनी किंवा शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रयोजनासाठी करु नये. नदी पात्रात काही मालमत्ता असल्यास ती सुरक्षित स्थळी हलवण्यात यावी. दुधना नदीकाठच्या गावांतील रहिवासी व शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यासाठी व पाण्याचा उपसा होणार नाही या अनुषंगाने कार्यवाही करण्यासाठी संबंधित तहसीलदारांना निर्देश देण्यात आले आहेत असेही जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

चोरवड येथील हिरकणी शाळेचे सातवे वार्षिक संम्मेलनाचे आयोजन

अरुणा शर्मा

पालम :- तालुक्यातील चोरवड येथील हिरकणी सी.बी.एस.ई.स्कुल चोरवड ता.पालम या  शाळेचे सातवे वार्षिक स्नेह संम्मेलन हिरकणी बाल महोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 6 फेब्रुवारी रोजी सायकाळी 6 वाजता आयोजन केले आहे.
या कार्यक्रमास प्रमुख आकर्षण सिनेअभिनेता / दिगदर्शक गफ्फार मास्टर, सिनेस्टार कॉमेडीचा बादशहा मकरंद अनासपुरे हे उपस्थित राहाणार असुन कार्यक्रमाच्या उद्घाटीका सौ. भावनाताई अनिलभाऊ नखाते जि.प.उपाध्यक्ष व सभापती परभणी कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे गंगाखेड प्रमुख उपस्थिती डॉ. सिध्दार्थ भालेराव वैद्यकीय अधिकारी पालम राहाणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर, सौ. करूणाताई कुंडगीर, संतोषभाऊ मुरकूटे, विठलराव रबदडे (मामा), गणेशराव रोकडे (दादा), भगवान भाऊ सानप, सौ. प्रणिता रुपला राठोड, राजेश फड, विजयकुमार शिंदे, आत्माराम सोडनर, विलासराव गाढवे, सुरेशदादा बंडगर, वसंतराव सिरस्कर, कैलास झुंजारे, माधवराव शेंडगे, सय्यद अल्ताफ, गोविंदराव मानवतकर, अण्णासाहेब किरडे, बालाजी वाघमारे, पांडुरंग होळगे, हनुमंत पौळ, विशाल दादेवाड, मारोती साळवे, आर.के. कदम, वामनराव बरडे, माऊली पैके, माऊली मुंढे, नारायण रसाळ, डॉ. गणेश वाघमोडे, डॉ. शिंदे, डॉ. गवळी, डॉ. जयश्री होळे, डॉ. आकनगीरे, डॉ. चिलगर या सह तालुक्यातील प्रमुख मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित राहाणार आहेत. तर यावेळी स्वागताध्यक्ष गोपाळराव देवकते अध्यक्ष व संयोजक प्राचार्य अशोक लवटे, सचिव हे असुन या कार्यक्रमास पालम तालुक्यातील नागरीकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे व कार्यक्रमाची शोभावाढवावी असे सुजितसिंग (ओडीशा), अरुण कसबे (सोलापुर), नितेश तांबे (मुंबई), रणजित सिंग (ओडीशा), राम सोळंके, एन. गाजले, शेख रहिम शेख अब्दुल, सौ. संगिता पवार, सौ. जयश्री लवटे, कु. आलका कदम आदिंनी असे आव्हाण केले आहे.

वरिष्ठांच्या जाचाला कंटाळला बेस्ट कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न.


वरिष्ठांचा जाचाला कंटाळून वरळी बेस्ट आगारातील कर्मचार्याने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना आज घडली. राजीव आडारकर असे या कर्मचाऱयाचे नाव असून तो वरळी आगारातबस निरीक्षक म्हणून कार्यरत आहे. आगारात डय़ूटीवर असतानाच आडारकर यांनी आत्महत्येचा पाऊल उचलले. त्यांच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृतीला धोका नसल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.वरिष्ठ जाच करत असल्याची लेखी तक्रारआडारकर यांनी महाव्यवस्थापकांकडे केली होती. पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आडारकरांचा आरोप आहे. दरम्यान, बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी घटनेची माहिती मिळताच तातडीने रुग्णालयात धाव घेतली आणि आडारकर यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश कोकीळ यांनी दिले आहेत.

पालम येथे सलमान खॉन मित्रमंडळाची शाखा स्थापन


अरुणा शर्मा

पालम :- येथे नुकतीच सलमान खान मित्रमंडळाची शाखा स्थापन करण्यात आली असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मसूद हुसैनी यांची उपस्थिती होती. तसेच मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सलमान खॉन पठाण, शाखाध्यक्ष इसाक खॉन आदींची उपस्थिती होती. यावेळी पालम तालुका कार्यकारणीची निवड करण्यात आली. त्यानुसार तालुकाध्यक्ष सय्यद फारुख, उपाध्यक्ष दिलावर खॉन, शहरध्यक्ष रईस खुरेशी, शहर उपाध्यक्ष शेख रहीम, सचिव आरेफ खुरेशी, कोषाध्यक्ष सय्यद परवेज तसेच सलमान खॉन मित्रमंडळाचे सदस्य मोठया प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सलमान खॉन यांनी केले.तर सय्यद फारुख यांनी आभार मानले.

आनंदवन स्कूल मध्ये स्नेहसंमेलन आणि राष्ट्रपती पदक विजेत्या विद्यार्थ्यांचा सन्मान

प्रतिनिधी

पाथरी:-शहरातील नामवंत आनंदवन इंटरनॅशनल स्कूल मध्ये स्नेहसंमेलन आणि साहसा बद्दल राष्ट्रपती पदक मिळालेल्या नांदेड येथील नदाफ एजाज अब्दूल यांचा सत्कार आणि रोख रक्कम पुरस्कार देऊन करण्यात येणार असल्याची माहिती या शाळेचे संस्थापक डॉ सलीम यांनी दिली.
येत्या सतरा फेब्रुवारी रोजी आनंदवन शाळेत वार्षीक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे या स्नेहसंमेलनाचे उदघाटन आ बाबाजानी दुर्रांनी यांच्या हस्ते संपन्न होणार असून प्रमुख उपस्थितीत जि प उपाध्यक्षा भावनाताई नखाते, कृऊबास सभापती अनिलराव नखाते, न प गट नेते जुनेदखान दुर्रांनी यांची उपस्थिती असनार आहे.या वेळी राष्ट्रपतींच्या हस्ते या वर्षी बाल शोर्य पुरस्कार मिळवलेल्या भैया स्कूल पार्डी ता अर्धापुर जि नांदेड येथील आपल्या जिवाची पर्वा न करता दोन मुलींना बुुडण्या पासून रोखत त्यांचे प्राण वाचवनारा नदाफ एेजाज अब्दूल या विद्यार्थ्याला डॉ सलीम मेडीकल अँड एज्यूकेशन फाऊंडेशनच्या वतिने देण्यात येणारा आनंदवन गॅलंट्री अॅवार्ड-२०१८ हा रोख पाच हजार रुपये व स्मतिचिन्ह पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. त्याच बरोबर आनंदवंद एेक्सीलेंन्सी अॅवार्ड -२०१८ गांधी रिसर्च फाऊंडेशन जळगाव व्दारा महाराष्ट्र स्तरावर आयोजीत गांधी विचार संस्कार परिक्षेत बीड जिल्ह्यातून सर्व प्रथम आलेली माध्यमिक विद्यालय तालखेड ता माजलगाव येथील विद्यार्थिनी कु कोमल विक्रम राऊत हीला रोख पाच हजार आणि स्मती चिन्ह असा दुहेरी गौरव या स्नेहसंमेलनात करण्यात येणार आहे. या कार्यक्रमा साठी मोठ्या संखेने पालक हितचिंतक यांनी उपस्थित राहाण्याचे आवाहन या संस्थेच्या अध्यक्षा डॉ अर्शिया सलीम, डॉ सलीम शेख यांनी केले आहे.

सबसेतेज,तेजन्यूज हेडलाईन्स ताज्या घडामोडी संक्षिप्त

अनुज केसरकर
सावंतवाडी-हेल्पलाईन लीग बांदा संघावर सावंतवाडी संघाने विजय मीळविला/अंतिम सामन्याला गालबोट/दोनसंघात हाणामारी

मुंबई - आज मध्य रेल्वेची सीएसएमटी ते दादर मार्गावरील रेल्वे सेवा काही काळ बंद राहणार

रायगड - मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, पनवेलजवळ कारने ट्रकला दिलेल्या धडकेत कारचालकाचा मृत्यू

मुंबई - मुलूंड (प.) येथील शांती इंडस्ट्रीयल इस्टेट परिसरात लागलेल्या आगीवर आठ तासांनंतर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश

एक्सप्रेस वेवर भीषण अपघात... 5 जागीच ठार.


शनिवारी संध्याकाळी मुंबई - पुणे महामार्गावर भीषण अपघात झालाय.आत्ताच हाती आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, एक्सप्रेस वेवर भरधाव वेगात असणाऱ्या एका कारची दुसऱ्या बाजुनं येणाऱ्या आयशर टेम्पोला जोरदार धडक बसली. लोणावळ्या जवळ झालेल्या या अपघात पाच जणांचा जागीच मृत्यू झालाय तर दोन गंभीर जखमी आहेत. मृतांमध्ये 5 महिलांचा समावेश आहे. हा अपघात इतका भयंकर होता की टेम्पो डिव्हायडर तोडून दुसऱ्या बाजुच्या रस्त्यावर येऊन धडकला. महत्त्वाचं म्हणजे, पाच जणांची आसनक्षमता असलेल्या कारमध्ये पाच ऐवजी सात जण प्रवास करत होते. यामध्ये एक पुरुष ड्रायव्हर होता तर इतर सर्व महिला प्रवासी होत्या. या प्रवाशांची ओळख मात्र अद्याप पटलेली नाही.

'कृष्णकुंज'वर दाखल झालं चांदीचं सिंहासन आणि...

गोष्ट एका सिंहासनाची... राज ठाकरे यांनी यापुढे फक्त सिंहासनावरच बसावं, अशी त्यांच्या एका चाहत्या कुटुंबाची इच्छा होती.
शनिवारी सकाळी 'कृष्णकुंज'वर अचानक एक सिंहासन येऊन धडकलं... आर्थिक सुबत्ता आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करण्याचीही रुची असलेल्या पुण्यातल्या विधाते कुटुंबियांनी केलेली ही कमाल होती... कुटुंबातले सर्वच सदस्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निस्सीम चाहते... आणि आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांनी ठाकरेंसाठी चक्क एक चांदीच सिंहासन तयार करून घेतलं.

शनिवारी सकाळी सिंहासना सोबतच विधाते कुटुंबियांनी कृष्णकुंज गाठलं... त्यांना सिंहासन राज ठाकरे यांना भेट द्यायचं होतं... पण त्याची कुठलीही कल्पना त्यांनी ठाकरे यांना दिली नव्हती. त्यामुळे 'कृष्णकुंज'वर पक्षाच्या कार्यकर्त्यांचा थोडा गोंधळच उडाला. पण आपल्या चाहत्यांचा अगदीच हिरमोड होऊ नये, याचीही काळजी ठाकरे यांनी घेतली. त्यांनी घराबाहेर येऊन चाहत्यांचा भावनांचा मान राखला... ठाकरेंनी सिंहासनातले बारकावेही पाहिले... पण सिंहासन घेण्यास त्यांनी नम्रपणे नकार दर्शवला.

'पुढचा मुख्यमंत्री मनसेचाच!

'बाळासाहेब ठाकरें प्रमाणेच राज ठाकरे यांनीही सिंहासनावर बसून पक्ष चालवावा, ही त्यांच्या चाहत्यांची इच्छा होती. ती पूर्ण होऊ शकली नाही... पण, महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री मनसेचाच होणार असा अभिप्राय आपल्या स्वाक्षरीसह देत ठाकरेंनी चाहत्यांना निराश केलं नाही.शुक्रवारी विश्वसुंदरीच्या सदिच्छा भेटी निमित्तानं हिरेजडित मुकुट 'कृष्णकुंज'वर आला होता. त्यापाठोपाठ शनिवारी सिंहासनही आलं... अचानक हे योग जुळून येऊ लागल्यानं आता सत्ताही अशीच चालत यावी, अशी प्रामाणिक इच्छा मनसे कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण नझाली तर नवल!

पालम तालुका प्रशासकीय पातळीवरच पाणंदमुक्त अनेक गावांची अवस्था जैसे थे


अरुणा शर्मा

पालम :- स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत पालम तालुक्यामध्ये केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना राबवून 66 ग्रामपंचायती 82 गावे पाणंदमुक्त झाल्याची माहिती पंचायत समिती गटविकास अधिकारी कोळी यांनी दिली. असे असले तरी आजही तालुक्यातील अनेक गावाची अवस्था जैसे - थे असल्याने ही योजना काही प्रमाणात कार्यान्वित आहे की नाही असे काहीसे चित्र दिसून येत आहे. पालम तालुक्यातील 66 ग्रामपंचायती 82 गावातील 18673 कुटुंबांना शौचालये बांधून गावे पाणदंमुक्त करण्यात यश आले असल्याचा दावा प्रशासकीय पातळीवर अधिकारयांकडून केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. स्वच्छ भारत मिशन ग्रामीणचे ध्येय गाठण्यासाठी स्वच्छतेकडून समृध्दीकडे जाण्यासाठी लोकसहभागातून स्वच्छतेची चळवळ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, पंचायत समिती व जिल्हा परिषदेचे पदाधिकारी यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. तालुका पाणंदमुक्त करण्याचा संकल्प ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांच्या समन्वयातून करण्यात आला. तसेच लोकसहभागाचाही या मध्ये समावेश होता. लोकांना शौचालय बांधकाम करण्यास प्रवृत्त करण्यात आले. शौचालयाचा नियमित वापर करावा. उघडयावर शौचास जाऊ नेय. याकरिता जनजागृतीचा एक भाग म्हणून गुड मॉनिंग पथकाच्या माध्यमातून शहर व ग्रामीण भागात जागृती अभियान राबविण्यात आले. पालम तालुका हागणदारीमुक्त झालाचा कांगावा प्रशासकीय येत यंत्रणा करीत असली तरीही तालुक्यातील 66 ग्रामपंचायतींपैकी अनेक गावे कागदपत्रे हागणदारीमुक्त झाले आहेत.

पाकिस्तानातून प्रशिक्षण घेऊन परतणाऱ्या दोन दहशतवाद्यांना काश्मीरमध्ये अटक.

दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयाने दिलेल्या व्हिसावर अधिकृतरित्या पाकिस्तानात जाऊन दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण घेऊन परतणाऱ्या दोन काश्मीरी तरुणांना सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतले आहे. हो दोघे भारतात मोठा घातपात घडवून आणण्याच्या तयारीत होते. बारामुल्ला पोलिसांच्या माहितीनुसार, अब्दुल मजीद भट आणि मोहम्मद अशरफ मीर अशी या दोन दहशतवाद्यांची नावे आहेत. या दोघांनी पाकिस्तानात जाऊन लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या प्रशिक्षणस्थळी जाऊन प्रशिक्षण घेऊन आले आहेत. वाघा बॉर्डरवर त्यांना भारतात प्रवेश करताना ५२ राष्ट्रीय रायफल्स, सीआरपीएफच्या ५३व्या बटालियनने संयुक्तरित्या ताब्यात घेतले. वाघा बॉर्डरवर तपासणी दरम्यान संशयास्पद हालचालींवरुन त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर अधिक चौकशीनंतर त्यांनी पाकिस्तानात जाऊन प्रशिक्षण घेतल्याचे उघड झाले आहे.ज्या प्रशिक्षण केंद्रांवर या दोघांनी प्रशिक्षण घेतले त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानी मुलांनाही प्रशिक्षित केले जात असल्याचे या दोघांनी सांगितले. यामध्ये पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतातील १० ते १२ वर्षे वयोगटातील सर्वाधिक मुले आहेत. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधील बरमा शहरात हे प्रशिक्षण केंद्र चालवले जात असून याला हंजाला अदनान आणि उमर या कोडवर्डचे नाव असलेला कामांडर चालवत आहे. तसेच जे इतर जे दहशतवादी या ठिकाणी प्रशिक्षण देण्याचे काम करीत आहेत त्यांची नावे ओसामा, नावीद आणि हताफ अशी आहेत. नवी दिल्लीतील पाकिस्तानच्या उच्चायुक्तांनी या दोघांना व्हिसा मंजूर केला होता.