तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Saturday, 10 February 2018

बनावट कागदपत्रा आधारे कर्ज घेतलेल्या कर्जदारांवर कधी गुन्हे दाखल करणार :- तुळशीराम पवार


परळी प्रतीनिधी:- वैद्यनाथ बैंकेचे चेअरमन यांच्या शिफारशीवरुन कर्जदारांनी बनावट कागदपत्रा आधारे कोट्यवधी रुपयांचे कर्ज उचलले आहे त्यामुळे बैंक डबघाईला येऊन गोरगरिबांच्या ठेवीला धोका निर्माण होत आहे मा चेअरमन यांनी स्वतः च्या मर्जीतील व स्वतः च्या फायद्यासाठी कर्जदाराचे घनिष्ठ संबंध असल्याने कोणतेही तारण न घेता कर्ज दिले आहे     परंतु लहान कर्जदार व शेतकरी यांना वसुलीच्या  तगादयापोटी आत्महत्या करण्याची वेळ येत आहे त्यामुळे बैंकेने व पोलिस प्रशासनाने थकीत  मोठ्या कर्जदारावर कार्यवाही करावी जेणेकरून गोरगरिबांच्या ठेवीला धोका निर्माण होणार नाही व चेअरमन ची हुकूम शाही बंद होईल. तसेच ज्या संचालकांनी स्वतः च्या व नातेवाईकांच्या नांवे बिना कागद पत्रा आधारे कर्ज कोट्यावधी रुपयाचे कर्ज घेतले आहे त्यांच्या वरही तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत नसता आपण १५ फेब्रुवारी रोजी सकाळी वैद्यनाथ बैंके समोर उपोषणाला बसु आसा इशारा शिवसंग्राम चे बिड जिल्हा अध्यक्ष मा तुळशीराम पवार यांनी दिला आहे.

जालना जिल्हात अवकाळी पाऊसासह गारपीटीचा तडाखा शेतकरी हवाल दिल


आशिष धुमाळ

परतूर
हवामान खात्याने दिलेल्या इशारानंतर आज  दिनांक 11 फेब्रुवारी रविवार रोजी सकाळी हवामानात अचानक बदल होऊन अवकाळी पाऊसासह गारपीट झाली .परतूर तालुक्यातील आष्टी,कार्‍हाळा परिसरात सकाळी 7:00 वाजल्या पासुन अवकाळी पाऊसासह बोराच्या आकारा येवढ्या  गारपीटला सुरूवात झाली.नंतर मंठा शहर,आकणी,श्रीष्टी वाहेगाव परिसरात सकाळी साधारण 8:00 वाजता जालना शहरात हलक्या पाऊसासह गारपीट झाली. या अवकाळी पाऊसांनी व गारपीटन काढणीत आलेल्या शेतातील  ज्वारी,गहु,हरबरा,फळबाग भाजीपाला पिकाचे प्रंचड नुकसान झाल्याचे वृत्त आहे.

ह.भ.प.शनिभक्त सुखदेव महाराज यांचे जानेफळ गायकवाड गावात किर्तनाचे आयोजन...


  प्रतिनिधी : भोकरदन

  भोकरदन तालुक्यातील जानेफळ गायकवाड येथिल जागृत देवस्थान नागेश्वर संस्थान येथे ११ जानेवारी रोजी राञी ९ वाजता ह.भ.प.शनिभक्त सुखदेव महाराज नेवपुरकर यांचा संस्थानच्या वतीने किर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.या किर्तनातुन लोकांचा समाज प्रबोधन होणार असुन,जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे,तसेच पंचक्रृशितील भावीकांनी या किर्तनाचा लाभ घ्यावा असे,काकासाहेब कायकवाड,रामेश्वर गायकवाड,लक्ष्मण गायकवाड,वैभव गायकवाड,सौमिनाथ गायकवाड,विशाल गायकवाड,प्रमोद गायकवाड,पंढरीनाथ गायकवाड सह संस्थांच्या वतीने सांगण्यात आले आहे

        ╭════════════╮    ▌ प्रतिनिधी : मधुकर सहाने - भोकरदन -------------------------------- 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी मो.नं./व्हाॅट्स अॅप :  9637599472 ...                           ╰════════════╯

मुख्याध्यापकास मारहान प्रकरणी कारवाई करन्याची शिक्षक संघटनेची मागणी


फुलचंद भगत

मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथील मुख्याध्यापक एच डि बारड यांना कीरकोळ वादातुन मारहान झाली असुन सबंधीत आरोपीविरुध्द कठोर कारवाई करन्याच्या मागणीसाठी तालुका व जिल्हा शिक्षक संघटनांनी निषेध नोंदवुन कारवाईसाठी लेखी निवेदन सादर केले आहे.
न्यानदानाचे पविञ कार्य करणार्‍या शिक्षकाला मारहान व जिवे मारन्याची घटना शेलुबाजार जिल्हा परिषद शाळेत दिनांक ९ फेब्रुवारी घडली असुन याप्रकरणी मंगरूळपीर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविन्यात आला आहे.मारहान झालेले मुख्याध्यापक एच डी बारड यांच्यावरच प्रतिपक्षाकडुन  विनयभंगाचा  खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप मुख्याध्यापकांनी केला आहे.मुख्याध्यापक यांचे समर्थनार्थ जिल्हा व तालुका शिक्षक संघटना न्यायासाठी एकवटल्याअसुन विनयभंगाचा खोटा गुन्हा तात्काळ मागे घेवून मुख्याध्यापकास मारहान करणार्‍यांना तात्काळ अटक करावी अन्यथा जिल्हाभर तिव्र आंदोलन छेडन्याचा इशारा विविध शिक्षक संघटनांनी लेखी निवेदनाव्दारे प्रशासनाला दिला आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835

परळीत महाशिवरात्र यात्रा महोत्सवाची तयारी जोरात श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट तर्फे विविध कार्यक्रम शहरातील विविध मंदिरातही कार्यक्रमाचे आयोजन

महादेव गित्ते
---------------------------------
परळी वैजनाथ, दि.10
       देशातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या येथील श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग स्थळी श्री महाशिवरात्र यात्रा महोत्सवास 13 फेब्रुवारी पासून प्रारंभ होत आहे. श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट परळीच्या वतीने मंगळवार दि.13 ते गुरूवार दि.15 फेब्रुवारी दरम्यान श्री महाशिवरात्र यात्रा महोत्सवानिमित्त आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमाची जय्यत तयारी केली आहे. नगर परिषद परळीच्या वतीनेही यात्रा नगरी व कुस्ती स्पर्धेच्या तयारीला प्रारंभ केला आहे. महाशिवरात्री निमित्त गुरूवार पासून शिवकथाही सुरू झाली आहे. तसेच शहरातील जगमित्र नागा मंदिर, सोपानकाका मंदिर, सुर्वेश्वर मंदिर यासह ग्रामीण भागातही महाशिवरात्री निमित्त विविध कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत. 

श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने महाशिवरात्र यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होणार असल्याने वैद्यनाथ मंदिरात लाखो भक्तांचे श्रीचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी पुरूष व महिलांच्या दोन वेगवेगळ्या रांगा लावण्यात येणार आहेत. वैद्यनाथ मंदिराच्या पायऱ्यावर लोखंडी नागमोडी बॅरीकेटस उभारण्यात आले असून मंडप उभारणीचे काम सुरू आहे. मंदिरात रंगरंगोटी करण्यात आली असून विद्युत रोशनाईही करण्यात आली आहे. महाशिवरात्री निमित्त 100 रूपयांचा पास ठेवण्यात आला आहे. पासधारकांच्या रांगेत उभे राहून श्रींचे दर्शन घेता येईल. दर्शनपास विक्रीची सुविधा वैद्यनाथ मंदिर परिसरात वैद्यनाथ बॅंक शाखा परळीने उभारलेल्या स्टॉलमध्ये करण्यात आली आहे. तसेच शहरातील स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या राणी लक्ष्मीबाई टॉवर व मोंढा येथील शाखेत, आय.डी.बी.आय.बॅंक, एच.डी.एफ.सी.बॅंक, महाराष्ट्र बॅंक, महाराष्ट्र ग्रामीण बॅंक, दिनदयाळ बॅंक व वैद्यनाथ बॅंक येथे भाविकांच्या सोयीसाठी दर्शन पास विक्रीची व्यवस्था करण्यात आली आहे.

मंगळवार दि. 13 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 ते 8 दरम्यान वैद्यनाथ देवस्थान विश्वस्त कमेटी तर्फे जिल्हाधिकारी बीड यांच्याकडून "श्री'स रूद्रअभिषेक करण्यात येईल. अभिषेका नंतर भाविकांना अभिषेकास परवानगी देण्यात येईल. अभिषेकासाठी एका आवर्तनास एकास 100 रूपये आणि सपत्नीक 150 रूपये पडतील. असे वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने कळविण्यात आले आहे. 

गुरूवार दि. 15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता प्रभु वैद्यनाथाची पालखी सवाद्य मिरवणुकीने निघेल सायं.6 वाजता देशमुख पाराजवळ (वैद्यनाथ मंदिर परिसर)  सुप्रसिध्द शास्त्रीय गायक भारतरत्न पंडीत भिमसेनजी जोशी यांचे पुत्र पं.आनंद भीमसेनजी जोशी यांच्या भक्तीगीत व अभंगवाणीचा कार्यक्रम होणार आहे. अंबेवेस येथे रात्री 9 वा. शोभेची दारू उडविण्यात येणार आहे. त्यानंतर गणेशपार, नांदूरवेस व गोपनपाळे गल्ली येथे कलावंतांची हजेरी होईल. नंतर अंबेवेस मार्गे रात्री मिरवणूकीने पालखी मंदिरात येईल. याचा भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व परळीचे तहसीलदार शरद झाडके, सेक्रेटरी राजेश देशमुख, विश्वस्त विजयकुमार मेनकुदळे, सुर्यकांत मोहरीर, प्रदिप देशमुख, प्रा. बाबासाहेब देशमुख, अनिल तांदळे, नंदकिशोर जाजू, डॉ. गुरूप्रसाद देशपांडे,  नागनाथराव देशमुख,  रघुनाथ देशमुख,  यांच्यासह इतर विश्वस्तांनी केले आहे.

  ╭════════════╮
   ▌प्रतिनिधी : महादेव गित्ते -
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 9403921114
              संपर्क ः- 9623921114
                          ╰════════════╯

बिरबलनाथ महाराज संस्थानतर्फे वृध्दांना कपडे वाटप


फुलचंद भगत-मंगरुळपीर
सामाजिकतेचा दरर्षीचा वारसा जोपासत मंगरुळपीर येथील बिरबलनाथ महाराज संस्थानच्या अध्यक्षा सुशिलाताई रघुवंशी आणी सचिव रामकुमार रघुवंशी यांच्या प्रमुख ऊपस्थीतीत वृध्दांना कपडे आणी ब्लॅकेंटचे वाटप करन्यात आले.
पंचक्रोशीत नावलौकीक असलेली मंगरुळपीर येथील बिरबलनाथ महाराजांची याञा आहे.विदर्भातुन दुरदुरुन भाविक नाथनगरीत नाथबाबाचे दर्शन घेन्यासाठी याञाऊत्सवादरम्यान सहपरिवार दाखल होतात.दहा दिवस धुमधडाक्यात चालणार्‍या नाथांच्या याञाऊत्सवाची सुरुवात पाच फेर्बुवारीच्या महाप्रसादापासुन झाली.पुढे दहा दिवस परिवारीक मनोरंजणासाठी आकाशपाळणे,टाॅकीज, मुलासांठी विविध खेळ ,कटलरी यांचेसह अनेक मनोरंजनाच्या साहित्याची रेलचेल असते.
याञाऊत्सवादरम्यान विविध धार्मीक कार्यक्रमासोबतच सामाजीक ऊपक्रमही राबविन्यात येत असतात त्याच अनुषंगाने दिनांक १० फेब्रुवारी रोजी येथील चिञॠषी आश्रमातील चाळीस महीला पुरुष वृध्दांना कपडे आणी ब्लॅकेटचे वाटप विश्वस्त मंडळाकडून करन्यात आला.करन्यात आले.वृध्द कलावंतांचा सत्कारही केला.
यावेळी बिरबलनाथ महाराज संस्थानच्या अध्यक्षा सुशिलाताई रघुवंशी,सचिव रामकुमार रघुवंशी,सिताराम महाराज,वाघ महाराज,श्रिकांत महाराज,लक्ष्मण इंगोले,नगर परिषद ऊपाध्यक्ष प्राध्यापक विरेंद्रसिंह ठाकुर,डाॅक्टर सुधाकर क्षिरसागर आदिंसह महिलांची मोठ्या प्रमाणात ऊपस्थीती होती.

——————————————
फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835

आफ्रिकेला विजया साठी 290 धावांचे आव्हान

भारत विरुद्ध द.अफ्रिका यांच्यात खेळल्या जात असलेल्या 6 एकदिवसीय सामन्याच्या मालिकेतील चौथ्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकुन प्रथम फलंदाजी स्विकारत 50 षटकात 289/7 धावा केल्या असुन द. अफ्रीकेला विजयासाठी 290 धावांचे आव्हान आहे. भारताकडुन कर्णधार विराट कोहली 75 सलामी फलंदाज शिखर धवनचे दमदार शतक (109) तर धोनीचे नाबाद 43 धावांचे योगदान आहे

रविकांत तुपकरांनी ठोकला खेडयात मुक्काम तुपकरांच्या दौऱ्याला तरुणांचा प्रचंड प्रतिसाद आज स्वाभिमानीचा संग्रामपुरात रणसंग्राम

मेळावा
संग्रामपूर :- (ता.10 फेब्रु) मागील दोन दिवसापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे
राज्याचे नेते रविकांत तुपकर यांनी संग्रामपूर तालुक्यात ठाण मांडले असून दोन दिवसात जवळपास 34 गावामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शाखांचे उदघाटन त्यांनी केले. यादरम्यान रविकांत तुपकर यांनी दोन दिवसापासून खेडयातच कार्यकर्त्यांच्या घरी मुक्काम करून खरपाण पटयातील शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चाकरून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या, तर उदया 11 फेब्रुवारी रोजी संग्रामपूर येथील आठवडी बाजारात स्वाभिमानीचा भव्या रणसंग्राम मेळावा आयोजीत केला आहे.
गुरुवार 8 व 9 फेब्रुवारी असे दोन दिवस स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी संग्रामपूर तालुक्यात झंझावाती दौरा करुन या भागातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यामध्ये प्रामुख्याने खारपाण्पटयातील क्षारयुक्ता पाण्याचा प्रश्न, शेतकऱ्यांच्या सिंचनाखाली गेलेल्या जमिनीच्या मोबदल्याचा प्रश्न, कपाशीवरील बोंड अळीच्या नुकसानीचा प्रश्न, शेतकऱ्यांच्या अनुदानाचा प्रश्न या व अशा अनेक प्रश्नावर तुपकर यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. गुरूवारी  संग्रामपुर तालुक्यातील मोमीनाबाद, काकनवाडा बु., काकनवाडा खु., खिरोडा, पिंप्रीमाळेगांव, एकलारा, उमरा, लाडणापूर, सोनाळा, सगोडा, वडगांव, कोनद, काटेल, पलसोडा, रिंगणवाडी, पंचाळा, काकोडा, बावनबीर यासह 20 गावांमध्ये तर शुक्रवारी वानखेड, दुर्गदैत, वरवट खंडेराव, हिंगणा, चिचखेड, कवठळ, काकोडा, चौंढी, रुधाणा, चांगेफळ, व ईतर जवळपाच 14 अशा 34 गांवाना भेटी देवून तेथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शाखांचे उदघाटन करून त्या- त्या गावात तरूण कार्यकर्त्यांची फळी तयार केली. तर रविकांत तुपकर यांनी वानखेड येथे विलास तराळे यांच्या घरीच मुक्काम करून या भागातील शेतकऱ्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. तुपकर यांनी कार्यकर्त्यांच्या घरी मुक्काम करून ठेचा भाकरीचा आस्वाद घेतला. तर सकाळी पारावर शेतकऱ्यांसोबत गप्पा करीत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांच्या या दोन दिवसाच्या झंझावती दौऱ्याला शेतकरी विशेषत: तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळाला. गावागावात तुपकर यांचे तरुणांनी जल्लोषात स्वागत केले. त्यामुळे  संग्रापूर तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मोठी ताकद उभी राहीली आहे. विशेष म्हणजे तालुक्यात ठिकठिकाणी झालेल्या सभामध्ये रविकांत तुपकर यांनी केंद्र व राज्या सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणावर कडाडून हल्ला करीत या सरकारच्या विरोधात संघर्ष करण्यासाठी तरूणांनी तयार राहण्याचे आवाहन केले. जगाचा पोषींदा असलेल्या शेतकऱ्याला आर्थीक बळ देण्याऐवजी शेतकऱ्याच्या जमिनी कार्पोरेट कंपन्यांच्या घशात घालून शेतकऱ्यांना दशोधडीला लावण्याचा  या सरकारचा डाव आता शेतकऱ्यांनी उधळून लावावा असे आवाहन त्यांनी केले.दरम्यान लवकरच खारपानपटयातील शेतकऱ्यांच्या प्रशावर  स्वाभिमानी शेतकरी संघटना मोठे आंदोलन उभे करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगीतले.
   तर, उदया 11 फेब्रुवारी रोजी संग्रामपूर येथील आठवडी बाजारात दुपारी 11 वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रणसंग्राम मेळावा आयोजीत केला आहे. या मेळाव्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर, महिला नेत्या तथा गेवराई पंचायत समिती सदस्या पुजाताई मोरे, प्रदेश अध्यक्ष अमोल हिपर, जिल्हाध्यक्ष कैलास फाटे, बबनराव चेके, प्रशांत डीक्कर, गीरीधर देशमुख, प्रकाश पाटील, आर. बी. देशमुख, राणा चंदन हे मार्गदर्शन करणार आहेत.        संग्रामपूर येथील दौऱ्यांत त्यांच्या सोबत स्वाभिमानीच्या महिला नेत्या तथा गेवराई पंचायत समिती सदस्या पुजाताई मोरे, कैलास फाटे, प्रशांत डिक्कर, ज्ञानेश्वर हागे, रोशन देशमुख, अभिजित नायसे, गणेश माळोकार,  संतोष दाने, उज्वल पाटील, मोहन पाटील, विलास तऱ्हाळे, श्रीकृष्ण तऱ्हाळे, श्रीकृष्ण भालतडक, महादेव चवरे, प्रविण येलकर, शिवा पवार, गजानन माळोकार, योगेश मुरुक, आशिष नांदोकार, एकनाथ दुतोंडे, शे.असलम यांच्यासह कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विवेकानंद इंग्लिश स्कुलचे वार्षिक स्नेह संमेलन संपन्न पालक व प्रेक्षक गेले भारावुन


आशिष धुमाळ

परतूर
प्रतिनिधी

  शहरातील विवेकानंद इंग्लिश स्कुल मध्ये वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात पार पडले यावेळी विविध प्रकारचे कार्यक्रम सादर करण्यात आले होते. या वेळी विद्यार्थींनी विविध प्रकारच्या हिंदी ,मराठी गाण्यावर बहारदार नृत्यअविष्कार सादर केले. तसेच स्वच्छता अभियान यावर नाटिका व देखावे सादर करून  पालकांची व प्रेक्षकांची मने जिंकले या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ एस. जी. बाहेकर शाळेचे सचिव संदीप बाहेकर मुख्यध्यापक संगीता शिंदे भालचंद्र महाजन तसेच शहरातील मंदाताई लोणीकर, सुधाकरराव सातोनकर  ,अॅड अनवर देशमुख, तारेख शिद्दीखी, इंद्रजित घनवट ,उपनिरीक्षक विजय जाधव ,डॉ प्रमोद आकात ,डॉ ज्ञानदेव नवल , कल्याण बागल  बाळू काळे   न्यायाधीश पांडे ,नगरसेवक प्रकाश चव्हाण ,पं स सभापती शीतल तनपुरे ,सुनील खरात ,बबन बोनगे  तसेच विवेकानंद प्राथमिक शाळा व विवेकानंद इंग्लिश स्कुल चे शिक्षक व शिक्षकत्तर कर्मचारी तसेच मान्यवरांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती.

बौद्ध विहाराच्या नुतनीकरनासाठी एक कोटींचा निधी मंजूर

भदंत उपगुप्त महाथेरो यांच्या प्रयत्नांना यश

पूर्णा -प्रतिनिधी- {राजेश वालकर}पूर्णा येथील बुद्धविहारास सण 2016 मध्ये पर्यटन क क्षेत्राचा दर्जा मिळाला असून या स्थळाच्या नुतनीकरनासाठी निधी उपलब्ध करून देण्या संदर्भात विहार समितीचे अध्यक्ष भदंत उपगुप्त महाथेरो यांनी सामाजिक न्याय मंत्री ना राजकुमार बडोले यांच्या कडे मागणी केल्यामुळे नूतनिकरणासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, या संदर्भात प्रशासकीय मान्यता सुरू झाली आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वरश्यानिमित्या मागील वरश्यापासून ऐतिहासिक व सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्व असलेल्या स्थळांचा विकास करणे या अंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी ऐतिहासिक सांस्कृतिक महत्त्व असलेल्या तिर्थक्षेत्रांमध्ये पूर्णा येथील विहाराचा समावेश करण्यात आला आहे, पर्यटन स्थळांचा दर्जा मिळाल्या मुळे भव्य इमारत बांधकाम होत असून या पर्यटन स्थळाला सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले जिल्हाधिकारी पी शिवा शंकर उपायुक्त तेजस माळवतकर यांनी वेळोवेळी भेट दिली येथे अनेक सामाजिक उपक्रम धम्मदेशना दिली जाते दरवर्षी बौद्धधम्म परिषद आयोजित केली जाते त्यामुळे या तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळांचा विकास व्हावा अशी मागणी भदंत उपगुप्त महाथेरो यांनी केली त्यामुळे सामाजिक न्याय विभागाच्या वतीने एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे

मुस्लिम समाजाचे आरक्षण पूर्ववत सुरू करण्याची मागणी

पूर्णा-प्रतिनिधी-(राजेश वालकर)मुस्लिम समाजाचे शिक्षणातील बंद केलेले आरक्षण पूर्ववत सुरू करण्यात यावे अशी मागणी, जिल्हा काँग्रेस कमिटीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे
याबाबत अधिक माहिती अशी की,मागील सरकारने मुस्लिम समाजास पाच टक्के आरक्षण दिले होते, परंतु सत्ता परिवर्तनानंतर ते बंद करण्यात आले. देश स्वातंत्र्या पासून मुस्लीम समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, शैक्षणिक व आर्थिक विकास झाला नाही केंद्र शासनाने आयोग स्थापन केल्या नंतरही त्या आयोगाचा अहवाल सादर केला, वंचितासाठी आरक्षणाची तरतूद करणारे महाराष्ट्र राज्य हे अग्रेसर राज्य म्हणून ओळखले जाते परंतु अद्यापही मुस्लिमांना आरक्षण दिले नाही त्यामुळे समित्यांच्या शिफारसी व समाजाच्या शिक्षणातील मागास पणा यांचा विचार करून, सरकारने शिक्षणातील पाच टक्के आरक्षण पूर्ववत सुरू करावे अशी मागणी परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाअध्यक्ष सुरेश वरपूडकर ,प्रदेश उपाध्यक्ष तुकाराम रेंगे पाटील,ऍड हरिभाऊ शेळके,जिल्हाउपाध्यक्ष वहिद कुरेशी, जी प सदस्य श्रीनिवास जोगदंड, डॉ संजय लोलगे, शहराध्यक्ष ऍड अब्बास हुसेन ,माजी उपनराध्यक्ष सलीम महंमद साब, सह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत

'राजा शिवछत्रपती' महानाट्यासाठी गेवराई शहरात निवड चाचणी


सुभाष मुळे....
----------------------
गेवराई, दि. 10 __ स्वाभिमानी युवा ब्रिगेड यांच्या नियोजनातून राष्ट्रवादी शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या 'राजा शिवछत्रपती' या महानाट्यात सहभागी करून घेण्यासाठी स्थानिक कलावंतांची निवड चाचणी घेण्यात आली. यावेळी गेवराई शहर व परिसरातील विविध शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी कलावंत मोठ्या संख्येने उपस्थित होते.
        गेवराई येथे स्वाभिमानी युवा ब्रिगेडचे संस्थापक आणि माजी जि.प.अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली दिनांक १७, १८ आणि १९ फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या राजा शिवछत्रपती या महानाट्यात सहभागी करून घेण्यासाठी स्थानिक कलावंतांची दि. ८ रोजी निवड चाचणी घेण्यात आली. या निवड चाचणीत गेवराई शहरातील शारदा विद्या मंदिर, चिंतेश्वर विद्यालय, द.बा. घुमरे पब्लिक स्कूल, अनमोल प्राथमिक विद्यालय, राजमाता जिजाऊ अध्यापक विद्यालय, र.भ.अट्टल महाविद्यालय, जयभवानी कनिष्ठ महाविद्यालय, जयभवानी अध्यापक विद्यालय आदीसह विविध शाळा आणि महाविद्यालयातील कलावंत विद्यार्थी सहभागी झाले होते.
     या निवड चाचणी चाचणीला प्राचार्या डॉ रंजना शिखरे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभ झाला. यावेळी शिवजन्मोत्सव सोहळ्याचे कोषाध्यक्ष शेख मन्सूर भाई, र.भ.अट्टल महाविद्यालयाच्या स्थानिक नियामक मंडळाचे सदस्य अॅड. आनंद सुतार दत्ताभाऊ पिसाळ, बब्बू बारुदवाले, निवड समितीचे प्रा. डॉ. बापू घोक्षे, प्रा.डॉ. संदिप बनसोडे, प्रा. डॉ. शिवाजी दिवान यांच्यासह प्रा. नामदेव शिनगारे, किशोर सोनवणे आदी उपस्थित होते.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯