तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Saturday, 24 February 2018

द बा घुमरे पब्लिक स्कूल बीड येथ विद्यार्थी , शिक्षक, पालक मेळावा व बक्षीस वितरण समारोह उत्साहात संपन्न


  याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती  सुशीलाताई मोराळे, प्रमुख पाहुणे मा,श्री उत्तमरावजी पवार साहेब मा श्री गोविंदराव वाघसाहेब  मा श्री पंडिरावजी तुपे साहेब यांच्या हस्ते तात्यांच्या अर्धकृती पुतळ्याचे पुजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला ,
  यावेळी  कार्यक्रमाचे उदघाटक संस्थेचे सचिव आदरणीय श्री दिपकदादा घुमरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उदघाटन झाले 
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहूने मा श्री उत्तमरावजी पवारसाहेब, मा,श्री गोविंदरावजी वाघ साहेब, मा श्री पंडिरावजी तुपे सर मा श्री सद्दीकी सर  मा श्री जे एम  पैठणे सर हे होते स्वागत गीतानंतर मान्यवरांचे सत्कार करण्यात आले
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्तविक शाळेचे मुख्याध्यापक श्री शेंडगे एम आर यांनी केले व शाळेचा वार्षिक अहवाल वाचन केले
  तसेच अनेक विध्यर्थ्यांनी शाळेबद्दल मनोगते मांडले
  तसेच पालकांनी सांगितले
की ही शाळा विद्यार्थ्यांना सर्वगुणसंपन्न बनवते असे मत आदर्शपालक  श्री अनिल घोरड यांनी मांडले
यावेळी मान्यवरांनी विद्यार्थी शिक्षक पालक याना मार्गदर्शन केले
तसेच सवस्थेचे सचिव आदरणीय श्री दिपकदादा घूमरे यांनी मार्गदर्शन केले की या शाळेत विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात विविध प्रकारचे उपक्रम राबविले जातात आणि विद्यार्थ्यांना सर्वगुणसंपन्न बनवण्यासाठी शाळा अहोरात्र मेहनत घेत आहे याबद्दल मी शाळेतील सर्व कर्मचारी यांचे अभिनंदन करतो
शेवटी कार्यक्रम अध्यक्ष श्रीमती मोराळे ताई यांनी मोबाईल पासून दूर होऊन बालकांच्या विकासाकडे लक्ष द्यावे असे सर्वाना बहुमोल मार्गदर्शन केले याप्रसंगी राज्य, विभाग, जिल्हा तालुका , शालेय,आशा विविध प्रकारच्या स्पर्धेच्या बक्षिसांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले
तसेच या शाळेतील विविध क्षेत्रातीलआदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक यांचाही मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला
यावेळी विद्यार्थी ,पालक, मातापालक मोठया संख्येने उपस्थित होते
कार्यक्रमाचे आभार जेस्ट शिक्षक श्री पवार एस बी यांनी मानले
तसेच शाळेतील सांस्कृतिक विभागाचे प्रमुख  श्री शिंगटे ए बी यांनी कार्यक्रममाचे सूत्रसंचालन केले
याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले

सेनगांव सेवाश्री फाउंडेशन धावली गरजु रुग्णाच्या मदतीला


विश्वनाथ देशमुख सेनगांवकर

सेनगांव:- तालुक्यातील कोंडवाडा येथील गरीब परीस्थितीत असलेल्या युवकास यकृत रोगाने ग्रासल्याने व आर्थिक परीस्थिती असल्याने उपचारासाठी सेनगांव येथील सेवाश्री फाउंडेशन तर्फे आज दि.25 फेब्रुवारी रविवार रोजी आर्थिक मदत देण्यात आली आहे.
कोडंवाडा येथील चंद्रशेखर कुलाळ हया युवकाचे यकृत प्रत्यारपनाचे ऑपरेशन झालेले आहे.घरची आर्थिक परिस्थीती अत्यंत हालाकीची कुटुंबात आई आणि चंद्रशेखर असे दोन व्यक्ति आहेत ऑपरेशन साठी आईने शेती विकुन पैसा उभा केला ..परंतु इतर तपासन्या करिता त्याची आर्थिक परिस्थिति नसल्यामुळे सेवाश्री फाउंडेशन ने पूर्ण माहीती घेवून त्याला आर्थिक मद्त करण्याचे ठरविले होते.त्या अनुषंगाने आज कोंडवाड़ा येथे जाऊन चंद्रशेखर ह्यांस आर्थिक मद्त सेवाश्री फाउंडेशन तर्फे करण्यात आली ह्यावेळी उपस्थित फाउंडेशन चे अध्यक्ष शैलेशजी तोष्णीवाल,उपाध्यक्ष जगुभाऊ देशमुख,हिंगोली शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदेशराव देशमुख,प्रताप लोखंडे,प्रविण महाजन,सचिन दराडे,गोपाल सोमानी,अनिल अगस्ति,हेमंतभाऊ संघई,राम लोहिया,योगेश पवार, रमेश हनवते,जगन पाटिल,संतोषदादा देशमुख, कोडंवाडा येथील प्रतिष्टित व्यक्ति राजुभाऊ मुळे,बाबाराव मुळे ,उपसरपंच व इतर उपस्थित होते. एका गरजु रुग्णास आर्थिक मदत देण्यासाठी सेवाश्री फाउंडेशन धावुन आल्याने सेनगांव तालुक्यातुन या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

विश्वनाथ देशमुख सेनगांवकर
तेजन्युज हेडलाईन्स वेब वाहीनी सेनगांव प्रतिनीधी
मो/व्हाँट्सएप 9604948599

औरंगाबाद ईस्तेमासाठी रेल्वेने सोडल्या दोन विशेष गाड्या


                                                                        पूर्णा प्रतिनिधी -{राजेश वालकर}मुस्लिम बांधवांचा औरंगाबाद  येथे तिन दिवस संपन्न होत असलेल्या इजतेमासाठी उपस्थित राहणाऱ्या भाविकांसाठी रेल्वेने काही विषेश गाड्या सोडण्यात येणार असुन
दि. २४,२६ २६ आणि फेब्रुवारी २०१८ रोजी होणाऱ्या कार्यक्रमा करीता दोन विशेष गाड्या सोडण्यात येणार आहे.(१) गुलबर्गा – औरंगाबाद- गुलबर्गा विशेष गाडी –
गाडी संख्या ०१३२१ गुलबर्गा येथून दि. २३  फेब्रुवारी २०१८ रोजी दुपारी १२.५५ वाजता सुटेल व सोलापूर, लातूर, परभणी मार्गे दिनांक २४ फेब्रुवारी २०१८ ला सकाळी ४.०० वाजता पोहोचेल. 
परतीच्या प्रवासात गाडी संख्या ०१३२२ हि गाडी औरंगाबाद येथून दि. २६ फेब्रुवारी २०१८ रोजी सायंकाळी ६ .३० वाजता सुटेल आणि दि. २७ फेब्रुवारी २०१८ रोजी सकाळी ११.३० वाजता गुलबर्गा येथे पोहोचेल.
(२) सी.एस. टी. मुंबई-औरंगाबाद- सी. एस. टी. मुंबई विशेष गाडी –गाडी संख्या ०११८१ सी.एस. टी. मुंबई येथून दि. २४ फेब्रुवारी २०१८ रोजी रात्री १२.२० वाजता सुटेल. पुढे ही गाडी नाशिक, मनमाड, रोटेगाव  मार्गे दि.२५ फेब्रुवारी २०१८ ला सकाळी ८.३०  वाजता पोहोचेल.
परतीच्या प्रवासात गाडी संख्या ०११८२ हि गाडी औरंगाबाद येथून दि.२६ फेब्रुवारी २०१८ रोजी सायंकाळी ७.२० वाजता सुटेल आणि दि.२७ फेब्रुवारी २०१८ रोजी पहाटे सकाळी ४.२० वाजता सी.एस. टी. मुंबई येथे पोहोचेल  औरंगाबाद येथे ईस्तेमासाठी जाणाऱ्या भाविकानी या विशेष रेल्वे गाडीचा लाभा घ्यावा असे रेल्वे प्रशासना तर्फे कळविण्यात आले आहे.

महीला आर्थीक विकास महामंडळाचा ४३ वा वधापण दिन व संत गाडगेबाबा जंयती साजरी


लोणार :- प्रमोद वराडे
ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील महीलानी सक्षम होण्यासाठी महीला आर्थीक विकास महामंडळाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या बचत गटाचा सहारा घ्यावा असे आवाहन महीला आर्थीक विकास महामंडळाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या संजिवनी लोकसंचालीत साधन केंद्राच्या व्यवस्थापक सौ. राखी चतुर्वेदी यांनी संत गाडगेबाबा यांच्या जयंती तसेच महीला आर्थीक विकास महामंडळाच्या 43 व्या वर्धापन दिनानिमीत्त घेतलेल्या कार्यक्रमात केले आहे.
श्री संत गाडगे बाबा यांच्या जंयती तसेच महीला आर्थीक विकास महामंडळाच्या 43 व्या वर्धापनानिमीत्त संजिवंनी लोंकसंचालीत साधन केंद्राच्या वतीने भागवत चित्र मंदीरासमोर असलेल्या कॉम्पलेक्स मध्ये या कार्यक्रामाचे आयोजन केले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामीण भागातुन आलेल्या अन्नपुर्णा गायकवाड हया होत्या तर शहरातील सुलतानाबी हया प्रमुख पाहुणे उपस्थीत होते यावेळी लोणार तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश कुटे हे सुध्दा मान्यवर म्हणुन उपस्थीत होते यावेळी या मान्यवराच्या हस्ते सावित्रीबाई फुले व संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून कार्यक्रमास सुरूवात केली कार्यक्रमाची प्रस्तावना लक्ष्मीताई तुरूकमाने यांनी केले यावेळी यावेळी महीलानी सक्षम होण्यासाठी स्वताच्या पायावर उभे राहण्यासाठी बचत गटामध्ये सहभाग नोंदविण गरजेचे आहे लोणार तालुक्यातील महीला आर्थीक विकास महामंडळाच्या अंतर्गत सजिवनी लोकसंचालीत साधन केंद्राच्या वतीने तालुक्यात आजपर्यत 280 बचत गटाची स्थापना करण्यात आली असुन या बचत गटाना सक्षम बणविले आहे आजपर्यत या बचत गटाना कुकटपालन व्यवसाय , दुध डेअरी व्यवसाय, मसाला गृह उदयोग, पिठ गिरणी उदयोग शेळी पालन व्यवसाय आदी अनेक व्यवसायाच्या माध्यमातुन अनुदान वाटप करण्यात आलेले आहे या माध्यमातुन अनेक महीला आज आपल्या पायावर उभ्या राहील्या आहे. महीला आर्थीक विकास महामंडळाने महाराष्ट्रभर 33 हजार बचत गटाची स्थापना करण्यात आली असुन 34 जिल्हामध्ये या मंहामंडळाच्या वतीने अनेक बेघर निराधार बेरोजगार महीलाना काम मिळाले आहे अशा महामंडळाचा 43 वा वाढदिवसानिमीत्त लोणार शहरात सुध्दा याची स्थापना करण्यात आली असुन 15 महीला बचत गट सुध्दा स्थापन करण्यात आलेले आहे ग्रामीण भागासोबतच शहरी भागात सुध्दा काम वाढत आहे यामाध्यमातुन महीला सक्षम झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रतिक्रीया व्यवस्थापक सौ. राखी चतुर्वेदी यांनी दिल्या या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन हे लक्ष्मी तुरूकमाने यांनी केले तर आभार प्रदर्शन दिपाली पवार यांनी केले या कार्यक्रमासाठी सजिवनी लोंसंचालीत साधन केंद्राच्या सहयोगीनी सौ शिल्पा जाधव, साधना डोंगरदिवे, डॉ विनायक दळवी यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमासाठी ग्रामीण भागातुन तसेच लोणार शहरातुन मोठया संख्येने महीला उपस्थीत होत्या

जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून प्रतिभा सुरवसे यांची निवड

परळी वैजनाथ दि. 24...
       बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे व बीडच्या खासदार डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या आदेशाने बीड  जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीवर ( दिशा ) अशासकीय सदस्य म्हणून  सौ. प्रतिभा ज्ञानोबा सुरवसे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल सौ. सुरवसे यांनी दोन्ही ताईंचे आभार व्यक्त केले आहेत.
       या समितीच्या खा. डॉ. प्रितमताई मुंडे या अध्यक्षा असुन जिल्हाधिकारी सचिव आहेत तर सर्व विधानसभा सदस्य, जिल्हा परिषद अध्यक्षा, मुख्य कार्यकारी अधिकारी हे सदस्य आहेत तर अशासकीय सदस्य म्हणून सौ. प्रतिभा ज्ञानोबा सुरवसे, रंजना नागरे, माजी जि. प. सदस्य रमेश मुंडे, सलीम जहांगीर ( सेवाभावी संस्था ) यांची निवड करण्यात आली आहे.
    केंद्र व राज्य सरकारच्या वतीने जिल्ह्य़ात राबविण्यात येणार्‍या विविध योजना आणि शासकीय कार्यालये यामध्ये समन्वय साधण्यासाठी ही समिती असते. मारेगा, पं. दीनदयाळ योजना, पंतप्रधान पीक विमा योजना, सामाजिक विकास योजना, पंतप्रधान आवास योजना, स्वच्छ भारत मिशन, पंतप्रधान कृषी सिंचन योजना, राष्ट्रीय पेय जल योजना, रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि बँकींग, डिजिटल इंडिया, बीएसएनएल, महावितरण,  उज्ज्वला गॅस योजना, राष्ट्रीय आरोग्य मिशन, सर्व शिक्षा अभियान, एकात्मिक बालविकास, मध्यान्ह भोजन आदी योजनांवर नियंत्रण व समन्वय ठेवण्यासाठी ही समिती काम करते.
       दरम्यान ना. पंकजाताई व खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी केलेली निवड सार्थ ठरविण्यासाठी त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करू असे सांगून सौ. सुरवसे यांनी दोन्ही ताईंचे आभार व्यक्त केले आहेत. दरम्यान या निवडीबद्दल सौ. प्रतिभा सुरवसे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

सिरसगांव मंडप येथिल शिवशंकर विध्यालयात दहावीच्या विध्यार्थांना निरोप.

   प्रतिनिधी : भोकरदन

दि. 24  फेब्रुवारी शिवशंकर विध्यालय  सिरसगांव मंडप येथिल शाळेत वर्ग 10  वी च्या विध्यार्थाना  निरोप देन्यात आला त्यावेळी दहाविच्या आतील, व तसेच दहाविच्या विध्यार्थांनी आपले मनोगत व्यक्त केले.. निरोपसमारंभाप्रसंगी कार्यक्रमाचे  प्रमुख पाहुणे म्हणुन  सुरज सहाने, उपसरपंच राजेंद्र सहाने व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष कचरू सहाने  अपस्थीत होतेे.शाळेचे मुख्याध्यापक एस.डी. कड यांनी प्रस्तावित केले, तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन बी.ए .पुंगळे यांनी केले तर आभार प्रदर्शन के.ए.बोरसे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आर.व्ही. इंगळे,स.जी. बोर्डे,व्ही.बी तायडे,डी.स. पाथ्रीकर,एम.आर. सहाने यासह आदी. ऊपस्थीत होते.
अशाप्रकारे सर्व शिक्षकांनी विध्यार्थानबद्दलचे आपले  मनोगतव्यक्त करून विध्यार्थांचे कौतुक  केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या...

   
        ╭════════════╮    ▌ प्रतिनिधी : मधुकर सहाने - भोकरदन -------------------------------- 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी मो.नं./व्हाॅट्स अॅप :  9637599472 ...                           ╰════════════╯

शिक्षक भारतीचा दणका पगार ऑफलाईन काढण्याचे आदेश जारी


प्रतिनिधी :बाळासाहेब राऊत
मुंबई, दि. २४
शालार्थ प्रणाली बंद पडल्यामुळे मागील दोन महिन्यांपासून राज्यभर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगाराचा घोळ सुरु होता. २२ तारीख उलटून गेली तरी पगार बिलं स्विकारली गेलेली नव्हती. याबाबत शिक्षक भारती या शासन मान्यताप्राप्त शिक्षक संघटनेने शालार्थ प्रणाली पूर्ववत होईपर्यंत पगार बिलं ऑफलाईन घेण्याची मागणी केली होती. तसेच बिलं स्वीकारण्याबाबत त्वरीत आदेश न दिल्यास शिक्षणमंत्र्यांना घेराव घालण्याचा इशारा शिक्षक भारतीने दिला होता, त्यामुळे आज एप्रिल २०१८ पर्यंत पगार बिलं ऑफलाईन घेण्याचे आदेश निघाले आहेत, अशी माहिती शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली.
राज्यातील जिल्हा परिषदा व नगर परिषदांमधील ३.५० लाख तर अनुदानित शिक्षण संस्थांमधील २ लाख शिक्षकांचे पगार गेले दोन महिने वेतन वितरणाचे सॉफ्टवेअर करप्ट झाल्याने होऊ शकलेले नाहीत. त्यामुळे शिक्षक हवालदिल झाले आहेत. पगार वितरणाचे सॉफ्टवेअर पूर्ववत होईपर्यंत पगार बिले ऑफलाईन घेण्याबाबत आदेश द्यावेत यासाठी आमदार कपिल पाटील यांनी पाठपुरावा केला होता.
शालार्थ प्रणाली बंद पडल्याने राज्यभरातील शिक्षक, शिक्षकेतरांचे पगार होऊ शकणार नाहीत याची जाणीव असूनही केवळ शिक्षक, शिक्षकेतरांना त्रास देण्यासाठी जाणीवपूर्वक उशीरा निर्णय घेतले जातात. त्याचा फटका दरवेळी शिक्षकांना सहन करावा लागतो. गृहकर्जाचे हफ्ते चुकल्याने शिक्षकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. तसेच फेब्रुवारी महिन्यात इन्कम टॅक्सचा भरणा वेळेत होऊ न शकल्यामुळे प्राप्तीकर विभागाच्या कारवाईला समोरे जावे लागते. यापूर्वीच सर्व शिक्षक, शिक्षकेतरांना वेळेत टॅक्स भरुनही केवळ शिक्षण विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे प्राप्तीकर विभागाच्या दंडाच्या नोटीसा मिळालेल्या आहेत.
शिक्षण विभागाच्या नियोजन शून्य कारभारावर सातत्याने टिका होऊनही शिक्षण विभागात बदल होत नाही. वारंवार शिक्षक, शिक्षकेतरांना न्याय्य हक्कासाठी आंदोलने करावी लागतात, ही अतिशय शरमेची बाब आहे. या सर्व प्रकारामुळे शिक्षण विभागाचा कारभार पाहणाऱ्या शिक्षण सचिव नंदकुमार यांनी त्वरीत राजीनामा द्यावा, अशी मागणी शिक्षक भारतीचे प्रमुख कार्यवाह जालिंदर सरोदे यांनी केली आहे.

शेतकरी मेळाव्याची जय्यत तयारी शिवजयंती निमित्त शेती सेवा ग्रुप चा अभिनव उपक्रम


ताडकळ :- प्रतिनिधी( गोविद मठपती
24 फेब्रुवारी, पुर्णा तालुक्यातील शेती सेवा ग्रुपच्या युवकांनी एकत्र येत कळगाववाडी (ता.पुर्णा) येथे शिवजयंती निमित्त मंगळवार दि. 27 फेब्रुवारी 2018 रोजी शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले असुन एक दिवशीय मेळाव्यात वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ञांचे शेतीविषक मार्गदर्शन मिळणार आहे. मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली असुन शेती सेवा ग्रुपच्या वतीने शेतकरी नोंदणीचे काम तसेच मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
तालुक्यातील शेती सेवा ग्रुपच्या युवकांनी काळची गरज लक्षात घेत शिवजयंती निमित्त भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन ताडकळस पासुन एक कि.मी. अतंरावर असलेल्या कळगाववाडी (ता.पुर्णा, जि. परभणी) येथे मंगळवार दि. 27 फेब्रुवारी 2018 रोजी केले असुन मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. शेतकरी नोंदणीचे काम व मेळाव्याची पुर्वतयारी अंतीम टप्प्यात आल्याची माहिती आज ताडकळस येथे संयोजकांच्या वतीने देण्यात आली.
एक दिवशी मेळाव्यात एकुण चार सत्र होणार आहेत. सकाळी 10 वाजता मेळाव्याचे उद्घाटन होणार असुन उद्घाटक म्हणुन व.ना.म.कृषी विद्यापिठ परभणीचे संचालक, विस्तार शिक्षण डॉ. पी.जी. इंगोले तर अध्यक्षस्थानी जेष्ठ शेतकरी संभाजीराव भोसले हे राहणार असुन परभणीचे उपशिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, आत्मा परभणीचे प्रकल्प संचालक आर.के.सराफ,  विकास जाधव, तेजस पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत. या नंतर पहिले सत्र सकाळी 10.30 ते 11.20 ला होणार असुन या सत्राच्याअध्यक्षस्थानी शेतीनिष्ठ शेतकरी अँड गंगाधरदादा पवार तर प्रमुख वक्ते म्हणुन अभिनव फॉर्मस क्लब, पुणेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर बोडके उपस्थित राहणार असुन एक एकर सेंद्रीय शेती, एक देशी गाय, यापासून रोज दोन हजार कमावण्याची कला या विषयावर त्यांचे व्याख्यान होणार आहे.
दुसरे सत्र सकाळी 11.20 ते 12.10 या कालावधीत होईल सत्राच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र सिंचन सहयोग च्या उपाध्यक्षा सौ. विद्याताई वाघमारे-पवार तर प्रमुख वक्ते म्हणुन दैनिक सकाळ नाशिक आवृतीचे कार्यकारी संपादक  श्रीमंत माने उपस्थित राहणार असुन शेतकरी आत्महत्या रोखण्यात एक शेतकरी म्हणुन माझी भुमिका या विषयावर त्यांचे व्याख्यान होईल. यानंतर एक तास भोजन व विश्रांतीसाठी राखीव असुन तिसरे सत्र दुपारी 01.10 ते 2.00 या कालावधीत होईल. सत्राच्या अध्यक्षस्थानी व.ना.म.कृषी विद्यापिठ परभणीचे वरिष्ट शास्त्रज्ञ डॉ. आनंद गोरे हे तर प्रमुख वक्ते सह्याद्री फार्मास नाशिकचे विलास शिंदे उपस्थित राहुण जागतिक बाजारपेठेत मराठवाड्याच्या शेतीचे अस्तित्व ? या विषयावर व्याख्यान देणार आहेत. या नंतर चौथ्या संत्रात समारोपीय संवाद होणार असुन सत्राच्या अध्यक्षस्थानी कृषीभूषण कांतरावकाका झरीकर तर प्रमुख वक्ते म्हणुन भारतीय किसान संघाचे संघटन मंत्री दादा लाड राहणार आहेत.  या शेतकरी मेळाव्यात सहभागासाठी 20 रुपये नोंदणी  शुल्क ठेवण्यात आले असुन सहभासाठी  9403061823, 9921564775
9767971636, 9422659062, 9921496963, 9665092209 या नंबर वर संपर्क करुन तालुक्यासह जिल्हातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. शेतकरी मेळावा यशस्वीतेसाठी
ऋषिकेश सकणुर, प्रताप काळे, बालासाहेब हिंगे, गोविंद दुधाटे, संभाजी शिराळे, पांडुरंग शिंदे, अमृतराज कदम, गजानन आंबोरे, कृष्णा काळे, पंडितराव भोसले, मधुकर जोगदंड, राहुल जोगदंड, श्यामभाऊ  आंबोरे, अरविंद कदम, हेमंत जळकोटे, अक्षय आंबोरे, जनार्धन अवरगड, सुरेश शृंगारपुतळे, सुदामराव दुधाटे, सुभाषराव सुर्यवंशी, नंदू कारले आदीसह शेती सेवा ग्रुप चे कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.

सातव्या वेतन आयोगासंदर्भात सोमवारी माहितीवर्ग


फुलचंद भगत-वाशिम

जेष्ठ अभ्यासक सतिश नाडगौडा यांचे मार्गदर्शन : उपस्थित राहण्याचे आवाहन

वाशीम - राज्य शासनाने नुकतीच सातवा वेतन आयोगाच्या मागणी संदर्भात बक्षी समिती समिती गठीत केली आहे. केंद्रातील कर्मचार्‍यांना स्वतंत्र आयेाग लागु करण्यात आला. या पार्श्वभूमिवर राज्य कर्मचार्‍यांना काय मिळणार. कोणत्या वर्गावर अन्याय झाला. कोणाला फायदा होईल हे अद्याप गुलदस्त्यात आहे. या सातव्या वेतन आयोगावर हरकती नोंदविण्यासाठी शासनाने एक पोर्टल सुरु केले असून त्यावर संघटनांनी, कर्मचार्‍यांनी 28 फेब्रुवारी 2018  पर्यत हरकती नोंदवायच्या आहेत. याबाबत महाराष्ट्रातील जेष्ठ अभ्यासक, विचारवंत सतिश नाडगौडा यांचे 26 फेब्रुवारी सोमवारला दुपारी 1 वाजता शिवाजी विद्यालयात वाशीम येथे जिल्हा शिक्षकेत्तर संघटनेच्या पुढाकारातून व मुख्याध्यापक, शिक्षक संघटनांच्या सहकार्याने माहिती वर्गाचे आयोजन केले आहे.
    सातवा वेतन आयोग हा कर्मचार्‍यांच्या जिव्हाळ्याचा विषय असून याबाबत कर्मचार्‍यांना कमालीची उत्सुकता आहे. शासनाने नुकतीच बक्षी समिती यासंदर्भाने गठीत केली असून एक पोर्टल सुध्दा सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवर संघटना, कर्मचारी यांना हरकती नोंदविण्यासंदर्भात 28 फेब्रुवारी ही शेवटची तारीख आहे. पण कर्मचारी संघटनांकडे सध्या कोणतीच माहिती उपलब्ध नसल्यामुळे हरकती नोंदविण्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
    म्हणून वाशीम जिल्हा शिक्षकेत्तर संघटनेच्या पुढाकारातून व मुख्याध्यापक, शिक्षक संघटनांच्या सहकार्याने सदर माहितीवर्गाचे आयोजन केले असून जेष्ठ अभ्यासक सतिश नाडगौडा हे सातव्या वेतन आयोगासंदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. तरी जिल्हयातील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर व इतर राज्य कर्मचार्‍यांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन अविनाश पसारकर, विनोद नरवाडे, विनायक उज्जैनकर, बाळासाहेब गोटे, अनिल काळे, मंगेश धानोरकर, राजकुमार बोनकिले, दिलीप जोशी, अजाबराव महल्ले, विश्वनाथ सांगळे, शैलेश वाढेकर, रमेश आरु, श्रीकांत जोशी, अनंत सुनपर, अनिल कराळे, सैय्यद अयुब, राजेश नंदकुले, गोविंद चतरकर, जनार्दन शिंदे, प्रा. सतिश चेतवार, डॉ. दादाराव देशमुख, मनोहर कोसे, सुभाष फुलउंबरकर, रामराव कायंदे, नरेंद्र ठाकरे, साहेबराव कढणे, प्रल्हाद पौळकर, संजय लहाने, प्रफुल्ल काळे, राजेश बोराळकर, प्रमोद डेरे, रामराव पाटील, शाम जाधव, वसंता वानखेडे, सुहास भोंगाडे, सुदीप मिश्रीकोटकर,शाहिद खान,विष्णु बाजड, आदींनी केले आहे.

फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.9763007835