तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Saturday, 24 March 2018

मलकापूर येथे भव्य खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांचे आयोजन


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) मौजे मलकापुर येथे  अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळा निमित्ताने भव्य खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. टेनिस बॉलवर खेळल्या जाणार्‍या या स्पर्धेसाठी बक्षीसांची मोठी रक्कम ठेवण्यात आली आहे. स्पर्धेत जास्तीत जास्त संघानी भाग घ्यावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. 

मौजे मलकापूर येथे अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळा निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन दि.28 मार्च रोजी होणार आहे. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 11 हजार १.११/- दुसरे बक्षिस 7 हजार १.११ /- देण्यात येणार आहे. या शिवाय बेस्ट बॉलर सिरीज, बेस्ट बॅटस्‌मॅन, सलग तीन षटकार, सलग तीन विकेट, प्रति मॅच, मॅन ऑफ दि मॅच असे बक्षीस ठेवण्यात आले आहे.  प्रवेश फिस 27 मार्च पर्यंत प्रदिप गित्ते 7218071718, आकाश गित्ते 9921151155, उमेश गित्ते 8108550870, बालाजी ईलेक्टीक, मोंढा मार्केट,परळी वैजनाथ 9850206808, श्रीराम इंजिनिअर वर्कशॉप, मराठा खानावळ, परळी वैजनाथ 9075677077 या क्रमांकवर संपर्क साधुन फिस भरुन नाव नोंदणी करावी. मलकापूर येथील भव्य मैदानावर या स्पर्धा होणार आहेत. तरी या स्पर्धेचा स्पर्धेकांनी लाभ घ्यावा असे आवाहन समस्त गावकरी मंडळी मलकापूर यांनी केले आहे.

बिबट्यासदृश्य प्राण्याच्या दर्शनाने सोनहिवऱ्यात दहशत


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- तालुक्यातील सोनहिवरा गावातील भवानी आई शिवारात आज सकाळी शेतकऱ्यांना बिबट्यासदृश्य प्राणी आढळून आला. यामुळे या भागात दहशतीचे वातावरण आहे. याबाबत माहिती मिळताच वन परिक्षेञ अधिकारी कार्यालयाचे कर्मचारी व परळी ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बिबट्याचा शोध घेतला. मात्र त्यांना बिबट्या आढळून आला नाही.

सोनहिवरा येथील वेणुबाई मुंडे, कोंडीबा मुंडे, जनार्धन मुंडे, नामदेव मुंडे हे शेतात काम करत असतांना त्यांना अचानक काही अंतरावर बिबट्यासदृश्य दिसला. सुरुवातीस हा प्राणी म्हणजे वाघच असल्याची अफवा पसरली होती. या प्राण्याच्या दर्शनाने घाबरलेली शेतकरी हातातील काम सोडुन गावाकडे निघून आले. यानंतर ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीवरून परळी ग्रामीण पोलिस व वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावात धाव घेतली. दोन्ही पथकाने गावकऱ्यांकडून माहिती घेऊन घटनास्थळी या प्राण्याचा शोध घेतला, परंतु त्यांना कसल्याची खुणा अथवा सदर प्रणयाची विष्ठा आढळून आली नाही. माञ, बिबट्या आला असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
    ग्रामस्थ दहशतीत  बिबट्याच्या खुणा आढळून आल्या नसल्या तरी शेतकरी माञ बिबट्याच्या दहशतीमुळे हादरून गेले आहेत. वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार अधिकारी येथे बिबट्या येवून गेल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष ठिकाणी जावून बिबट्याचा शोध घेतला. परंतु तो आढळून आला नाही किंवा त्याच्या पायाचे ठसे आढळून आले नाही. माञ बिबट्या असल्याची शक्यता नाकारता येत नाही. दौनापूर, मांडवा येथे ही चार महिन्यांपूर्वी बिबट्या दिसला असल्याची माहिती आहे. हाच बिबट्या सोनहिवऱ्यात आला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ग्रामस्थांनी घाबरून न जाता पुन्हा हा प्राणी दिसल्यास तातडीने वनविभाकडे संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे

शक्तीकुंज (नवीन) वसाहतीत सिंधुताई सपकाळ यांच्या व्याख्यानाचे आयोजन


          परळी वैजनाथ(प्रतिनिधी) दि.२४- संपूर्ण  महाराष्ट्रात अनाथांची आई व जेष्ठ सामजिक कार्यकर्त्या म्हणून परिचित असलेल्या सिंधुताई सपकाळ (माई) यांच्या व्याख्यानाचे आयोजन नवीन शक्तीकुंज वसाहतीत करण्यात आले आहे.
          शक्तीकुंज बहुद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या मार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नवीन शक्तीकुंज वसाहतीत आज दि.२५ मार्च रविवार रोजी सायंकाळी ५.३० वा. शक्तीकुंज प्रि. इंग्लिश स्कूल या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे.या व्याख्यानाचा जास्तीत जास्त समाजबांधवांनी लाभ घाव्या असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.

रामनवमी निमित्त परळीत आज भव्य मिरवणुकीचे आयोजन

           परळी वैजनाथ(प्रतिनिधी)दि.२४- सकल हिंदूंचे आराध्य दैवत असलेल्या प्रभू रामचंद्र यांचा रामनवमी उत्सव
प्रति वर्षाप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.रामनवमी निमीत्त संपूर्ण परळी शहरामधे भगव्या पताका लावून सजावट करण्यात आली आहे.आज श्रीराम जन्मउत्सव समितीच्या वतीने भव्य मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले आहे.
           सवाद्य पारंपारीक वाद्ये,ढोल,ताशे असे या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण असणार आहे.या मिरवणुकीची सुरुवात सायंकाळी ६ वाजता वैद्यनाथ मंदीर येथुन होणार असून पुढे,महात्मा बसवेश्वर चौक,मातोश्री चौक,पोलिस कॉलनी,अब्दुल कलाम आझाद चौक, हनुमान चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक,अण्णा भाऊ साठे चौक,एक मिनार चौक, मोंढा मार्केट,नांदेड टी हाऊस,सुभाष चौक,बाळकृष्ण रोडे चौक,राणी लक्ष्मीबाई टॉवर चौक येथे या मिरवणूकीचा प्रभू श्रीरामाच्या मूर्तिपूजन आरतीने समारोप होणार आहे.
रामनवमीच्या या भव्य मिरवणूकीस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्रीरामजन्म उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

रामनवमी निमित्त आज आनंद माडगुळकर यांचे गीतरामायण

वैद्यनाथ मंदीराच्या उत्तर पायऱ्यांवर रंगणार सोहळा

           परळी वैजनाथ(प्रतिनिधी)दि.०५ -  देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट च्या वतीने मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र यांच्या प्राकट्य दिनाच्या निमित्ताने जगद्विख्यात गायक आनंद माडगूळकर यांच्या गीतरामायणाचे आयोजन करण्यात आले आहे.
            आपल्या सुमधुर गायनातून श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे आनंद माडगूळकर यांचा गीतरामायनाचा कार्यक्रम आज दि.२५ मार्च रविवार रोजी रामनवमीच्या पावन मुहूर्तावर वैद्यनाथ मंदिराच्या उत्तर पायऱ्यांवर होणार असून या कार्यक्रमाला भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष शरद झाडके,सचिव राजेश देशमुख,प्रा. बाबासाहेब देशमुख,सूर्यकांत मोहरीर,नंदकिशोर जाजू,प्रा.प्रदीप देशमुख,अनिल तांदळे,बाबुराव मेनकुदळे, डॉ.गुरुप्रसाद देशपांडे,नागनाथ देशमुख,रघुवीर देशमुख,अरवींद पुजारी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

सामाजिक कार्यकर्ते रवीकिरण देशमुख यांची जलनायक म्हणून निवड


रविकिरण देशमुख यांच्या निवडीचे सर्वस्तरातून स्वागत
-----------------------------
अंबाजोगाई (प्रतिनिधी) कै.हेमंत राजेमाने बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते रविकिरण आबासाहेब देशमुख यांची विभागीय आयुक्त औरंगाबाद यांनी जलसाक्षरता कार्यक्रमातर्गंत  जलनायक (जिल्हास्तर) म्हणून निवड केली आहे. या निवडीबद्दल रविकिरण देशमुख यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

विभागीय आयुक्त औरंगाबाद यांनी नुकतीच जालना,बीड, उस्मानाबाद,परभणी, नांदेड,लातूर,हिंगोली जिल्ह्यातील जलसाक्षरता कार्यक्रमाअंतर्गत 16 फेब्रुवारी 2018 रोजी बैठक घेतली.या बैठकीत औरंगाबाद विभागातून जलनायक (जिल्हास्तर) जलप्रेमींची अंतिम निवड यादी राज्य शासनाकडे सुपूर्द केली. या यादीत रविकिरण आबासाहेब देशमुख यांचा बीड जिल्ह्यातून समावेश करण्यात आला आहे. रविकिरण देशमुख यांचे शिक्षण एम.ए.समाजशास्त्र असे असून ते गेल्या 15 वर्षाहुन अधिक काळ    सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेेत.त्यांनी कै.हेमंत राजेमाने बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेची 2013 साली स्थापना केली. 2013 पासुन ही संस्था शैक्षणिक,सामाजिक, सांस्कृतिक, क्रिडा, शेती, जलसिंचन, जलसाक्षरता आदी क्षेत्रात कार्य करित आहे. या संस्थेने योगेश्वरी शिक्षण संस्था अंबाजोगाई येथील परिसरात असणार्‍या तळ्याचे खोलीकरण करणे, मोरफळी साठवण तलाव (ता.धारूर) येथील गाळ काढणे तसेच अंबाजोगाई शहरात विविध शंभर ठिकाणी बोअर पुन:र्रभरण या करिता जलसहयोगच्या माध्यमातून काम करणे, वॉटरकप स्पर्धेत सहभागी गावांना प्रोत्साहन,मार्गदर्शन व प्रसंगी सहकार्य करणे या करिता मौजे राडी तांडा (ता.अंबाजोगाई), कोळपिंपरी,अवरगाव, खोडस (ता.धारूर) या गावांना वॉटरकप स्पर्धेतील सहभासाठी मार्गदर्शन ही केले आहे.
रविकिरण देशमुख हे 2007 साली आसरडोह (ता.धारूर) या गावचे सरपंचही राहिले आहेत.रवीकिरण देशमुख यांना सामाजिक क्षेञातील उल्लेखनिय कार्याबद्दल यापुर्वी विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी सामाजिक क्षेत्रात सातत्याने केलेल्या उल्लेखनिय कार्याची दखल विभागीय आयुक्तांनी घेवून त्यांची जलनायक (जलप्रेमी) म्हणून निवड केली. देशमुख यांच्या निवडीबद्दल त्यांचे माजी आ.पृथ्वीराज साठे , बीड जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती राजेसाहेब देशमुख,अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोविंदराव देशमुख, मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया, जनविकास संस्था केजचे सचिव रमेश भिसे,ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड.अण्णासाहेब लोमटे,अंबाजोगाई नगरपालिकेचे पाणी पुरवठा सभापती बबनराव लोमटे, वेणुताई चव्हाण माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रतिभाताई देशमुख, लालासाहेब आगळे, बाबा पोटभरे,योगेश्वरी रोटरी क्लबचे अध्यक्ष श्रीरंग चौधरी, अ‍ॅड.कल्याण लोमटे, प्रविण देशमुख,दुष्यंत लोमटे,राहुल देशमुख, अनंत मसने आदींसहीत इतरांनी अभिनंदन केले आहे.
--------------------------
  ╭════════════╮
   ▌प्रतिनिधी : महादेव गित्ते -
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 9403921114
              संपर्क ः- 9623921114
                     ╰════════════

आई वडिलांची सेवा हीच खरी माणुसकी -डॉ.शालिनीताई कराड


आज समाजात विशिष्ट वयानंतर वाढत असलेली  आई वडीलाबददलची नकारात्मक दृष्टी चिंतेची बाब असल्याचे मत महाराष्ट्र राज्य बालहक्क आयोगाच्या  सदस्या व  समाजसेविका डॉ.शलिनीताई कराड यांनी नंदागौळ ता.परळी येथे अविष्कार व्यक्तिमत्व  आणि भाषण कौशल्य विकास फाऊंडेशन आणि पाणी फाउंडेशन मार्फत आयोजित समाजप्रबोधनात्मक कार्यक्रमात प्रमुख अतिथि म्हणून बोलताना व्यक्त केले.
समाजात कुपुत्र निर्माण होउ शकतो परंतु कुमाता,कुपीता असू शकत नाही,आई वडिल  आयुष्यभर आपल्या मुलांसाठी कष्ट करत राहतात जेव्हा त्यांना आधाराची गरज असते तेव्हा आपली जबाबदारी टाळणे अयोग्य असल्याचे त्यांनी सांगितले या प्रसंगी परळी उपविभागीय अधिकारी महाडिक साहेब व  परळीतील नामांकीत डॉक्टर बालासाहेब कराड डॉ.अजित केंद्रे, डॉ.माऊली घुगे,डॉ.संदीप घुगे डॉ.संजय गित्ते  डॉ.रंजना घुगे, डॉ.पुनम मुंडे ,डॉ.सविता घुगे, डॉ.नेहा शेख ,अविष्कार फाऊंडेशनचे प्रशिक्षक श्री.अभिमान मुंडे व नंदागौळ च्या सरपंच मा.सौ पल्लवी गित्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी त्यांनी अविष्कार व्यक्तिमत्व आणि भाषण कौशल्य विकास फाउंडेशन राबवत असलेल्या उपक्रमांचे कौतूक केले.

राष्ट्रभाषा प्रचारक पुरस्काराने सुग्रीव नेहरकर सन्मानित


अंबाजोगाई (प्रतिनिधी) तालुक्यातील मौजे वरवटी येथील वसंतराव नाईक विद्यालयात कार्यरत असणारे शिक्षक सुग्रीव नेहरकर यांना वर्ष 2016-17 साठी महाराष्ट्र राज्यभाषा सभा,पुणे यांच्या वतीने राष्ट्रभाषा प्रचारक पुरस्कार देवून 23 मार्च शुक्रवार रोजी पुणे येथे आयोजित विशेष कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले.

सुग्रीव नेहरकर हे मौजे वरवटी येथे वसंतराव नाईक विद्यालयात हिंदी आणि इतिहास या विषयाचे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.सुग्रीव नेहरकर हे शिक्षण व ग्रंथालय चळवळीशी निगडीत आहेत.त्यांनी शैक्षणिक वर्ष 2016-17 मध्ये महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा पुणे यांच्या वतीने घेण्यात येणार्‍या हिंदी भाषा परिक्षेत आधिकाधिक विद्यार्थी यांना सहभागी करून घेत.हिंदी भाषेच्या प्रचारासाठी महत्वपुर्ण योगदान दिले. त्यामुळे त्यांच्या या उल्लेखनिय कार्याची दखल घेवून औरंगाबाद विभागातून त्यांना राष्ट्रभाषा प्रचारक पुरस्कार देवून पुणे येथे सन्मानित करण्यात आले.सदरील पुरस्कार अ‍ॅन्थनी फर्नांडीस यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिला जातो. पुरस्काराचे स्वरूप स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र व रोख रक्कम असे आहे.
हा पुरस्कार सुग्रीव नेहरकर यांना 23 मार्च शुक्रवार रोजी पुणे येथे महाराष्ट्र राज्यभाषा सभा,पुणे चे अध्यक्ष उल्हास पवार, कार्याध्यक्ष डॉ.विणा मनचंदा, कोल्हापुर येथील शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कळमकर, राष्ट्रभाषा सभा महाराष्ट्र पुणे विभागाचे अध्यक्ष पगारे सर यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला.सुग्रीव नेहरकर यांना राष्ट्रभाषा प्रचारक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे रघुनाथराव मुंडे विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डी.आर.मुंडे,सचिव अनंतराव चाटे, जनार्धनराव मुंडे, एल.आर.मुंडे, मुख्याध्यापक शिवाजीराव चाटे, हरिनारायण गर्जे,श्रीहरी कांदे,संभाजी गर्जे आदींसहीत इतरांनी अभिनंदन केले आहे.

सिरसाळा तालुका निर्माण कृती समितीचे गठण,अध्यक्षपदी डॉ सदाशिव देशपांडे यांची निवड


सिरसाळा:

        निजामकालीन तालुका असलेल्या सिरसाळ्याला पुन्हा तालुक्याचा दर्जा मिळवून देण्यासाठी सिरसाळकरांनी हालचाली सुरू केल्या असून सिरसाळा तालुका निर्माण कृती समितीचे गठण करण्यात आले.यावेळी झालेल्या बैठकीत अध्यक्षपदी निमंत्रक

 डॉ सदाशिव देशपांडे यांची तर उपाध्यक्ष म्हणून जनिमियाँ कुरेशी व प्रमोद किरवले यांची   सर्वानुमते निवड करण्यात आली.

          सिरसाळा तालुका निर्माण कृती समितीच्या माध्यमातून सुरुवातीला स्वाक्षरी मोहीम,आंदोलने,निवेदन,मुख्यमंत्री यांना भेटणे  आदी शक्य तेवढ्या पद्धतीने सिरसाळा तालुका निर्मितीची मागणी शासनापर्यंत पोहचविणार असल्याचे यावेळी समितीतर्फे सांगण्यात आले.परळी जिल्हा होण्याची दाट शक्यता असल्याने निजाम कालीन तालुका असलेल्या सिरसाळ्यालाहि पुन्हा तालुक्याचा दर्जा मिळू शकतो त्यामुळे व्यापक आंदोलन उभारणार असल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले.

त्या अनुषंगाने गुरुवारी बैठक घेऊन सर्वानुमते

अध्यक्षपदी निमंत्रक डॉ सदाशिव देशपांडे,

उपाध्यक्षपदी प्रमोद किरवले व जनिमियाँ कुरेशी यांची तर सचिव म्हणून बाळासाहेब पांडे व विनोद ललवाणी यांची ,सहसचिवपदी शेख नासर यांची निवड करण्यात आली.तर सदस्य म्हणून शेख नसिब,शेख इसमोद्दीन,संतोष पांडे,हेमंत लोंढे,बाबासाहेब काळे,राम किरवले,वैजनाथ देशमुख,मुन्ना काळे,बाळू किरवले,अक्रम पठाण,इम्रान पठाण,रघुनाथ देशमुख,अनिल देशमुख,पांडुरंग काळे,शेख अजमत ,देवराव काळे,डॉ प्रफुल्ल ललवाणी,डॉ आनंद नावंदर,गोरख काळे,अच्युत गायसमुद्रे,अच्युत किरवले,दिगंबर देशमुख,कुंडलिक लहाने,राहुल देशमुख,मिलिंद चोपडे,जावेद पठाण,सय्यद शाकेर,बालासाहेब टेकाळे,मनिष देशपांडे,रामेश्वर मंदे,राम आघाव दत्ता कराड,प्रथमेश देशपांडे आदींचा कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे.

तळमळीने स्वतः उभे राहून नगरसेवक करून घेतोय प्रभागातील नागरी विकासकामे

भाजपचे युवा नगरसेवक प्रा. पवन मुंडे यांची जनतेच्या कामांसाठी कौतुकास्पद तत्परता

महादेव गित्ते
---------------------------------
परळी वैजनाथ, दि.24.
         आजकाल वॉर्डातील कामे स्वतः लक्ष घालून प्रत्यक्ष उभे राहून कोणी करताना दिसत नाही. मात्र याला भाजपचे युवा नगरसेवक प्रा. पवन मुंडे आपवाद ठरताना दिसतात. सध्या प्रभाग क्रमांक 13 मधील अनेक वर्षापासुन रखडलेल्या नाल्यांची कामे सुरू आहेत. ही कामे तळमळीने स्वतः उभे राहून करून घेतांना नगरसेवक दिसतो.  प्रभागातील नागरी विकासकामे करण्यासाठी नगरसेवक प्रा. पवन मुंडे यांची जनतेच्या कामांसाठी कौतुकास्पद तत्परता दिसून येत आहे.
      परळी भाजपमधील एक क्रियाशील व सतत कार्यरत कार्यकर्ता अशी ओळख असलेल्या प्रा. पवन मुंडे या युवकाला ना. पंकजाताई मुंडे यांनी नगरपालिकेत उमेदवार म्हणून संधी दिली.नगरसेवक म्हणून मिळालेल्या या संधीचा नागरिकांच्या  विविध नागरी समस्या सोडवून ते जनतेची कामे करत आहेत. आपल्या प्रभागातील नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी ते सदैव तत्पर असतात. त्याप्रमाणेच  प्रभागातील मुलभूत समस्या सोडविण्यात ते अग्रेसर आहेत. पाणी, रस्ते आदींसह विविध प्रश्न त्यांनी मार्गी लावले आहेत. ना. पंकजाताई मुंडे यांचा विश्वासु शिलेदार म्हणून त्यांची असलेली ओळख ते सार्थ ठरवत आहेत.
       प्रभागातील विविध कामे स्वतः हजर राहून ते चांगल्या रीतीने करून घेण्यासाठी त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो. सध्या सुरू असलेल्या नाली बांधकाम ही ते स्वतः उभे राहून करून घेत आहेत. नागरिकांतून याबाबत समाधान व्यक्त होत आहेत.या तत्परतेचे नागरिकांतून कौतुक होत आहे.

  ╭════════════╮
   ▌प्रतिनिधी : महादेव गित्ते -
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 9403921114
              संपर्क ः- 9623921114
                     ╰════════════

सेनगांव तालुक्यातील ठिक ठिकानी भुमिपुजन करतानी जिल्हाचे पालकमंत्री दिलीपजी कांबळे

साखरा.प्रतीनीधी शिवशंकर
निरगुडे
सेनगाव ठीक ठिकाणी भूमिपूजन करतांना जिल्ह्याचे पालक मंत्री दिलीपजी कांबळे
अनुशेष भरून काढण्यासाठी या
संदर्भातील सर्व कामे लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी केले लिंबाळा तांडा येथील श्री. संत सेवालाल महाराज मंदिर परिसरात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार तान्हाजीराव मुटकूळे माजी खासदार शिवाजी माने, माजी आमदार गजानन घुगे सेनगांवचे नगराध्यक्ष अभिजीत देशमुख, जिल्हा परिषद सदस्य रामरतन शिंदे ,सभापती हरिशंचद्र शिंदे, नारायण राठोड आदी उपस्थित होते.
पुढे बोलतांना श्री. कांबळे म्हणाले की, ग्रामीण भागाचा विकास, शेती साठी पाणी, वीज आणि मजबुत रस्ते ग्रामीण भागातील लोकांना देण्यासाठी शासन कटिबध्द असुन लवकरच कामे सुरु केली जाणार आहेत. ग्रामस्थांनी शासनाच्या वृक्ष लागवड मोहिमेत सहकार्य करावे तसेच आपआपल्या परिसरात झाडे लावून ती काळजीने वाढवावीत असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत जिल्हयातील शेतकऱ्यांना टप्याटप्याने कर्जमाफीचा लाभ देण्यात येत आहे.
सुरुवातीला इतर जिल्हा मार्ग 22 ते लिंबाळा आमदरी रस्त्याचे श्रीफळ फोडून व टिकाव मारुन भूमिपुजन केले. लिंबाळा आमदरी रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजना सन 2017-2018 अंतर्गत 2 कि.मी. 200 मीटरचा रस्ता करण्यात येणार असून यामध्ये 2 हजार 50 मीटर डांबरी रस्ता व 150 मीटर सिमेंटचा रस्ता करण्यात येणार आहे. या कामाची अंदाजीत किंमत 109 लक्ष असून रस्ताच्या मजबूती करणावर भर देण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास परिसरातील ग्रामस्थ़, पदाधिकारी, संबधीत यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.
कापडसिंगी ते बन रस्त्याचे भूमिपुजनसामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य राज्यमंत्री तथा हिंगोली जिल्हयाचे पालकमंत्री श्री. दिलीप कांबळे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून व टिकाव मारुन रस्ता कामाचे भूमिपुजन करण्यात आले.
यावेळी आमदार तान्हाजीराव मुटकूळे  माजी खासदार शिवाजी माने, माजी आमदार गजानन घुगे, जिल्हा परिषद सदस्य रामरतन शिंदे, यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ़, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तोष्णीवाल महाविद्यालयात मत्स्यबीजनिर्मिती या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण संपन्न

विश्वनाथ देशमुख सेनगांवकर

सेनगांव:- येथील ताेष्णीवाल महाविद्यालय, मत्सशात्र विभाग व राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने "कॉमन कार्प (सिप्रीनस) माशाचे संप्रेरीत प्रजनन व बीजनिर्मिती” या विषयावर एक दिवशीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. वडगुले व प्रमुख पाहुणे म्हणून श्री गजानन शिक्षण प्रसारक मंडळ, येलदरी(कॅम्प) चे सचिव श्री. शेळके यु. एम., प्रा. तळणीकर एस. जी. हे उपस्थित होते. या प्रशिक्षणासाठी डॉ. पोपतावर एन. जी., सहयोगी प्राध्यापक, डी.एस. एम. कॉलेज, जिंतूर व डॉ. शेळके पी. पी., वरिष्ठ शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, तोंडापूर हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभले होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रा.पाटील धनाजी(प्रकल्प संचालक) व प्रा. मरकड संदीप(प्रकल्प संचालक) यांनी सदरील प्रशिक्षणाच्या  आयोजनामागील हेतू स्पष्ट केला.

याप्रसंगी श्री. शेळके यु. एम. यांनी शेतीला पूरक जोडधंदे ही काळाची कशी गरज आहे हे पटवून दिले.तर प्राचार्स डॉ. वडगुले एस. एम. यांनी अध्यक्षीय समारोपात लोकाभिमुख कार्यक्रमंबाबत  महाविद्यालयाची भूमिका व कामगिरी या विषयावर प्रकाश टाकला. डॉ. शेळके पी.पी. यांनी मत्स्य संवर्धनाची हि काळाची गरज असून उत्पन्न वाढविण्यासंबंधीचे तंत्रज्ञान यशस्वी मत्स्य शेतकऱ्यांचे उदाहरण देवून पटवून दिले. शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्यासंबंधीची सरकारची भूमिका समजावून सांगितली. डॉ. पोपतवार एन. जी. यांनी कार्प माशाची उपयोगिता, जीवशास्त्र, प्रजनन, वाढ आदी विषयाचे सविस्तर माहिती देवून संप्रेरीत प्रजननाद्वारे मत्स्य बीज निर्मितीचे तंत्रज्ञान समजावून दिले. सदरील तंत्रज्ञानाने कमीत कमी गुंतवणुकीमध्ये स्थानिक स्थरावर बीजनिर्मिती करून मत्स्य बीजाच्या तुटवड्यावर मात करता येत असल्याचे मत्स्य शास्त्र विभागाने केलेल्या प्रकल्पावरून शिद्ध झाल्याचे सांगितले. मत्स्यशास्त्र विभागाच्या मत्स्य बीजनिर्मिती केंद्रामध्ये संप्रेरीत बिजानिर्मितीचे प्रात्यक्षिक करण्यात आली.
या प्रशिक्षणासाठी  हिंगोली जिल्ह्यातील मत्स उत्पादक, मासेमार, शेतकरी, विद्यार्थी व संशोधक यासारखे प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. केंद्रे टी. यु. यांनी केले. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी प्रा. गायकवाड बी. जे., प्रा.नाईक ए. पी., डॉ. वाघ व्ही. जि., प्रा.गायकवाड एन. एस., डॉ.घुटे बी. बी., प्रा  पवार के. एस., प्रा.थोरात डी. डी., डॉ. चव्हाण आर. टी., डॉ. बजाज एन. एस., डॉ. तोतला प्रवीण, डॉ, जोशी आर ए, श्री वालेकर व्ही. बी. व सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांनी मोलाचे सहकार्य केले.