तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Saturday, 14 April 2018

सुलोचना बजाज सेवा प्रतिष्ठानच्या वतीने बर्दापुर येथे पाणपोईचे शुभारंभ ....!

 

अंबाजोगाई (प्रतिनिधी) ग्रामीण भागातील जनतेला यावर्षीच्या कडक उन्हाचा त्रास होऊ नये, यासाठी सुलोचना बजाज सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून व  याच्या आर्थिक सहकार्यातून हा उपक्रम करून दोन ठिकाणी हि सोय केली त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे, असे उदगार तेथील नागरिकांनी काढले.

बर्दापुर येथे प्रथमच ग्रामीण भागातील वाटसरूना पिण्याच्या पाण्याची सोय केली, सुलोचना  बजाज सेवा प्रतिष्ठानच्या वतीने उभारलेल्या पाणपोई च्या उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.

पाणपोई साठी लागणारे स्टँड, जार, आणि पाणी पिण्यासाठी लागणारे ग्लास हे सुलचा बजाज सेवा प्रतिष्ठान च्या वतीने देण्यात आले. सुलोचना बजाज सेवा प्रतिष्ठानच्या वतीने यापुर्वी घेतलेल्या कार्यक्रम पुढील प्रमाणे गरजु विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर तसेच वरवटी येथील इंग्लिश स्कुल येथे गरजु विद्यार्थ्यांच्या फिससाठी आर्थिक मदत करण्यात आली. तसेच  गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. असे विविध कार्यक्रमात सतत सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारी सुलोचना बजाज सेवा प्रतिष्ठान म्हणुन जिल्हयात ओळख आहे.

सर्वपथम यांनी जाराचे कुंकूम तिलक लावून व पुष्पहार घालून पूजन केले. श्रीफळ वाढवून पाणपोईचे उदघाटन केले. सुलोचना बजाज सेवा प्रतिष्ठान हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रसर राहणार असल्याची ग्वाही सुलोचना बजाज सेवा प्रतिष्ठानचे सेक्रेटरी व बजाज बाल रुग्णालयाचे संचालक डॉ.नितीन श्रीरंगजी बजाज यांनी दिली आहे.

महामानवाची जयंती ग्रंथदान करून साजरी;सोनपेठ ग्रंथ वाचन चळवळीचा उपक्रम


प्रा. डॉ. संतोष रणखांब
तेजन्यूज हेडलाईन्स प्रतिनिधी
सोनपेठ : महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२७वी जयंती येथील श्री महालिंगेश्वर विद्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन विद्यालयाचे मुख्याध्यापक पी.एल.जोशी हे होते तर, तहसीलदार जीवराज डापकर, पोनि सोपान सिरसाट, स्वाराती विद्यापीठ सिनेट सदस्य दत्तत्रय कदम, प्रमोद गावरस्कर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरूवात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पुजन व आदरांजली वाहुन झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे ग्रंथपाल तथा सोनपेठ ग्रंथ वाचन चळवळीचे अध्यक्ष राजेश्वर खेडकर यांनी केले. प्रमुख पाहुने तहसीलदार जीवराज डापकर यांनी यावेळी बोलताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकत जीवनात वाचन महत्वाचे असल्याचे सांगीतले.
याप्रसंगाचे औचित्यसाधुन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व ग्रंथ वाचन चळवळ सोनपेठने केलेल्या डॉ.आंबेडकर अभ्यासन केंद्रासाठी सव्वा लाख ग्रंथ संपादनाच्या आवाहनास प्रतिसाद देत शहरातील जानकी अध्यापक विद्यालय सोनपेठ जि. परभणी च्यावतीने संस्था चालक प्रमोद गावरस्कर यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते ग्रंथ वाचन चळवळीच्या माध्यमातून एकुण ३११७४ रूपयांच्या ५८६ पुस्तकांचे ग्रंथदान करण्यात आले.
  कार्यक्रमास मान्यवरांसह रंगनाथ सोळंके, संतोष शहाणे, पत्रकार कृष्णा पिंगळे, ग्रंथ वाचन चळवळीचे सदस्य सुधीर बिंदु, प्रा.डॉ.संतोष रणखांब, ज्येष्ठ शिक्षक एन.व्ही.स्वामी, व शहरातील ग्रंथप्रेमी नागरीक, विद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विद्यालयाचे लिपीक तथा ग्रंथ चळवळीचे सदस्य मल्लीकार्जुन सौंदळे यांनी केले तर आभार प्रा.भास्कर तिरमले यांनी मानले.

नागापुर धरणाचे पावसाळ्यात वाहुन जाणारे पाणी राखेच्या तळ्यात सोडावे. पै.मुरलीधर मुंडे.

परळी(प्रतिनिधी)टोकवाडी नजीक व तळेगाव,डाबी शिवारात असलेल्या राखेच्या तळ्यात नागापुर धरणातील पावसाळ्यात वाहुन वाया जाणारे पाणी लिप्टींग करून  सोडावे अशी मागणी महाराष्ट्र कुस्तिगीर परिषदेचे तालुकाध्यक्ष पै.मुरलीधर मुंडे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या प्रसिध्दी पत्रकाव्दारे केली आहे.
या विषयी अधिक माहिती अशी की परळी तालुक्यातील टोकवाडी,डाबी व तळेगाव शिवारात राखेचे तळे आहे या तळ्यात परळीचे थर्मल सुरू असतांना पाणी मिश्रित राख पाईप लाईन व्दारा सोडण्याची व्यवस्था केलेली होती सध्या थर्मल बंद असुन येथील तळ्यात पाण्याचे प्रमाण नाहीतच जमा असुन विविध व्यवसायासाठी येथील राख नेली जात असल्याने त्या वाहतुकीमुळे या तिनही गावात मोठ्या प्रमाणात प्रदुषण होत आहे.टोकवाडी,डाबी तळेगाव शिवारात अंदाजे दिड हजार हेक्टर शेत जमिन असुन वाण नदीवरील नागापुर धरण पावसाळ्यात नव्वद टक्के भरल्यावर जे पाणी सांडव्यावरून वाहुन जाते ते वाहुन जाणारे पाणी लिप्टींग करून या राखेच्या तळ्यात सोडल्यास या शेत जमिनीसाठी फायद्याचे ठरणार असुन राख पाणी मिश्रित झाल्यावर प्रदुषण कमी होण्यास मदत होणार आहे.या विषयीचे मागणी साठी दोन दिवसात या तिनही गावातील ग्रामस्थांच्या सह्यांचे निवेदन मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री,बीड जिल्ह्याच्या पालक मंत्री व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते यांना देण्यात येणार असल्याचे पै.मुरलीधर मुंडे यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हंटले आहे.

बाबासाहेबांचे कार्य हे आदर्शवत असुन सर्वांसाठी प्रेरणादायी-राम पाळवदे


हेळंब ग्रामपंचायत कार्यालयात डाँ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी...

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य हे आदर्शवत असुन सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. समाजाच्या तळागाळातील माणसाचा विकास होण्यासाठी,  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर संघर्ष केला बाबासाहेबांचे कार्य हे सर्व समाजासाठी होते. या देशातील करोडो बहुजनांच्या आयुष्याचे सोने मात्र विश्‍वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने झाले असे प्रतिपादन उपसरपंच राम पाळवदे  यांनी केले.हेळंब ग्रामपंचायत कार्यालयात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 127 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी ते  बोलत होते.
    परळी तालुक्यातील मौजे हेळंब येथील ग्रामपंचायत कार्यालयात विश्वरत्न,  विश्वभुषन, भारतरन्त, महाविद्वान, महानायक, अर्थशास्त्री, महान इतिहासकार,ज्ञान के प्रतिक,संविधान निर्मिता,क्रांतीसुर्य,युगपुरुष, बोधीसत्व, महामानव  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 127 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार व पुष्पांजली अर्पण करुन महामानवाला अभिवादन करण्यात आले.
यावेळी पाळवदे  बोलतांना म्हणाले की, बाबासाहेबांनी केवळ बहुजनांसाठीच नाही तर या देशातील प्रत्येक स्त्रि, पुरूषासाठी काम केले आहे.भारतीय संविधानाची निर्मिती करुन जगातील सर्वश्रेष्ठ राज्यघटना आंबेडकरांनी निर्माण केली.भारतीय घटना ही सर्वसमावेशक असुन या घटनेने जगासमोर आदर्श ठेवला आहे.बाबासाहेबांचे कार्य हे आदर्शवत असुन सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. ज्ञानवंत,प्रज्ञावंत बाबासाहेबांनी सामान्य माणसाला माणुस म्हणुन जगता यावे यासाठी प्रस्थापित व्यवस्थेशी आयुष्यभर संघर्ष केला असे विचार त्यांनी मानले. यावेळी मधुसुदन होळंबे, मोहन होळंबे, उपसरपंच राम पाळवदे, श्रीराम होळंबे, बालाजी आंधळे, शिवाजी पाळवदे, भगवान होळंबे, वैजनाथ आंधळे, दत्तु लांडगे, पपन होळंबे, रघुनाथ होळंबे, बालाजी होळंबे, गावकरी मंडळी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन पपन यांनी केले तर उपस्थितांचे आभार वैजनाथ आंधळे यांनी मानले. 

जिंतुर पोलिसा कडून डॉ बाबासाहेब आम्बेडकर यांच्या जीवन चरित्र प्रदर्शनी च आयोजन

प्रदिप कोकडवार
जिंतुर
सदया जिंतुर येथे प्रवीण मोरे हे पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत असून त्यांचे वडील स्व भाऊसाहेब मोरे 1956 साली त्यांनी
जय भीम नारा दिला   ते स्वातंत्र्य सैनिक होते  त्यांनी डॉ बाबासाहेब यांच्या सोबत जीवन कृतार्थ करुंन घेतले होते त्या काळातील दस्त व बाबासाहेब यांच्या हस्त लिखित पत्र  आठवणी वर्तमान पत्र यांची महत्व पूर्ण प्रदर्शनी पोलिस ठाण्यात भवन्यात आली या प्रदर्शनी च उद्घाटन पोलिस उप विभागीय अधिकारी अनिल घेर्डिकर यांच्या हस्ते करण्यात आले

या प्रदर्शनिला पाहण्यासाठी शहरातील व्यापारी अधिकारी नागरिक यांनी भेट दिली

या प्रसंगी न प मुख्याधिकारी सोनावणे उपस्थित होते

जिंतुर रिपोर्टर
*प्रदिप कोकडवार*

आरोग्यासाठी महिलांनी जागरूक राहीले पाहिजे - गीता भाभी पवार

सुभाष मुळे...
-----------------
गेवराई  दि. 14 _ घरच्या जबाबदार्‍या सांभाळत असताना, स्वतःचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी महिलांनी शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ घेतला पाहिजे असे प्रतिपादन नगरसेविका सौ.गिताभाभी पवार यांनी केले.
      गेवराई येथे भारतरत्न डाॅ. आंबेडकर व महात्मा फुले यांच्या जयंती निमित्त ग्रामीण विकास मंडळ लक्षगट हस्तक्षेप प्रकल्प एफ.एस.डब्लू 800 टी.आई. विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. व्यासपीठावर जिल्हा कार्यक्रमाधिकारी साधना गंगवने, जिल्हा पर्यवेक्षक सुहास कुलकर्णी, समुपदेशक हिवरेकर, तिडके, नगरसेवक काकडे , वाव्हळ यांची उपस्थिती होती. सौ. भाभी पुढे बोलताना म्हणाल्या की, धकाधकीच्या जीवनात महिलांना आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शासन स्तरावर महिला आरोग्यासाठी विविध योजना राबविल्या जातात, घर कामात व्यस्त असल्याने, महिला स्वतःच्या काळजी कडे दूर्लक्ष करून, रोगाला आमंत्रण देतात, त्यामुळे आरोग्य सांभाळून काम करुन आरोग्य शिबीरात भाग घेतल्यास त्यांना आरोग्य निटपणे राखता येईल. महिलांना बचत गट व सरकारी कामात गरज पडल्यास वेळोवेळी मदत केली जाईल. कधीही आपण महिलांना मदत करायला तयार आहे असेही शेवटी त्यांनी सांगितले. आरोग्य शिबीरात 60 महिलांनी सहभाग घेतला. महिलांच्या  एच.बी. सी. , बी. सी., एच.आई.व्ही. , कावीळ अशा एकूण 14 प्रकारच्या आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून श्रीमती साधना गंगांवने (जिल्हा कार्यक्रम अधिकारी डापकु बीड ), श्री सुहास कुलकर्णी यांनी ही आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरविंद पवार यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष साधना गंगवने यांनी आरोग्याची काळजी घेण्यासाठी वेळोवेळी रक्ताच्या व एच आई व्ही तपासणी केली पाहिजे असे सांगितले व जिल्हा पर्यवेक्षक सुहास कुलकर्णी व समुपदेशक हिवरेकर व तिडके, सुरेश घोंगडे  यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बालिका पडवळ, कल्पना बांगर, गीता देशमुख यांनी परिश्रम घेतले.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
-----------------------------------
--- जाहिरात व बातमी करिता संपर्क ----
------------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

माखणी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

ताडकळस/प्रतिनिधी
येथुन जवळ माखणी येथील जि. प. शाळेत दि. १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती निमीत्त अभिवादन करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री. भाग्यवंत होते. याप्रसंगी शाळा व्यवस्थापण समितीचे अध्यक्ष माधव आवरगंड यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी सरपंच नेमाजी गाडे, मनसेचे युवानेते बापुराव पल्लमपल्ली, ग्रा.प.सदस्य केशव आवरगंड, राजु गाडे आदीसह शालेय विद्यार्थी उपस्थित होते

शारदा प्रतिष्ठानच्या सामुहिक विवाह सोहळ्यासाठी नोंदणी करा - राजू खळगेसुभाष मुळे.....
-------------------
गेवराई, दि. 14 __ प्रतिप्रमाणे याही वर्षी शारदा प्रतिष्ठानच्या वतीने सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असुन यंदाच्या 20 साव्या सामूहिक विवाह सोहळ्यासाठी शारदा प्रतिष्ठान सज्ज झाले आहे. शुक्रवार, दि.04 मे रोजी होणाऱ्या या सामुहिक विवाह सोहळ्यासाठी नोंद सुरू असून ईच्छुक पालकांनी आपल्या उपवर मुलामुलीच्या विवाहासाठी जास्तीत जास्त  वधुवरांची नोंदणी करुन या सामुहिक विवाह सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते राजू खळगे यांनी केले आहे.
     प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात ते पुढे म्हणतात की, शारदा प्रतिष्ठानच्या वतीने गेवराई तालुक्यातील मायबाप जनतेच्या आशीर्वादाने 20 वर्षापासून काळाची गरज ओळखून आ.अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली सामुहीक विवाहाचा हा यज्ञ अखंडपणे चालु आहे. जनतेने दिलेल्या आशीर्वादाच्या बळावरच आपली सामाजीक बांधीलकी समजून सामूहीक विवाह बरोबरच आजवर गुणवंतांचे सत्कार सोहळे आदर्श शिक्षकांचा गौरव, आदर्श शेतकरी पुरस्कार नैसर्गिक आपत्तीच्या वेळी गोदाकाठच्या पुरग्रस्तांना केलेली सक्रिय मदत, धार्मिक प्रबोधनाचे कार्यक्रम, जल संधारणाची कामे आणि गेवराई तालुक्याची जल सिंचन क्षमता वाढवण्यासाठी प्रकल्प जलशारदा अशा प्रकारचे अनेक सामाजीक उपक्रम आजवर शारदा प्रतिष्ठानने अखंडपणे राबवले आहेत. शारदा प्रतिष्ठानचा हा सामुहीक विवाह सोहळा आयोजनाचे 20 वे वर्ष आहे. सामुहीक विवाह सोहळ्यामध्ये आजवर १२०० च्या वर वधू-वरांचे विवाह संपन्न झालेले आहे.
     गेवराई तालुका आणि परिसरातील गोरगरिबांच्या उपवर मुला-मुलींच्या विवाहाची जबाबदारी घेऊन प्रतिष्ठानने शुक्रवार, दिनांक 04 मे २०१८ रोजी सायं ०६:३० वा जयभवानी देवी मंदिर शिवाजीनगर (गढी) येथे हा सामुहीक विवाह सोहळा संपन्न होत आहे तरी ईच्छुक पालकांनी वधु वरांची नोंदणी करण्यासाठी गेवराई येथील जगदंबा आय.टी.आय.येथे संपर्क साधावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते राजू खळगे यांनी केले आहे

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
-----------------------------------
--- जाहिरात व बातमी करिता संपर्क ----
------------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

हेळंब ग्रामपंचायत कार्यालयात डाँ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी...

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- विश्वरत्न,  विश्वभुषन, भारतरन्त, महाविद्वान, महानायक, अर्थशास्त्री, महान इतिहासकार,ज्ञान के प्रतिक,संविधान निर्मिता,क्रांतीसुर्य,युगपुरुष, बोधीसत्व, महामानव डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत कार्यालय हेळंब येथे त्यांच्या प्रतिमेचे पुजन करून जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मधुसुदन होळंबे, मोहन होळंबे, उपसरपंच राम पाळवदे, श्रीराम होळंबे, बालाजी आंधळे, शिवाजी पाळवदे, भगवान होळंबे, वैजनाथ आंधळेदत्तु लांडगे, पवन होळंबे, रघुनाथ होळंबे, बालाजी होळंबे, गावकरी मंडळी उपस्थित होते.

गेवराईत प्रशासकीय अधिकाऱ्यांसह 51 रक्तदात्यांनी केले रक्तदान


सुभाष मुळे...
-----------------
गेवराई, दि. 14 __ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त गेल्या तीन दिवसांपासून भीमज्योती महोत्सवात दि.13 रोजी भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले. या शिबिरात प्रशासनातील अधिकारी, कार्यकर्ते, युवक व महिलांनी सहभाग नोंदवून या शिबिरात 51 जणांनी रक्तदान केले.
     शुक्रवार, दि. 13 रोजी सकाळी 11:30 वा बौद्ध विहार येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उदघाटन माजी नगराध्यक्ष महेश आण्णा दाभाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार संजय पवार, गटविकास अधिकारी एन.पी.राजगुरू, न.प.मुख्याधिकारी भागवत बिघोत, उत्सव समितीवर अध्यक्ष बब्बूभाई बारुदवाले, सचिव प्रा.पी.टी. चव्हाण, आवेज शरीफ, माजी नगराध्यक्ष विनोद सौंदरमल, राघव वाव्हळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. या शिबिरात गेवराईचे तहसीलदार संजय पवार, गटविकास अधिकारी एन.पी.राजगुरू, न.प.मुख्याधिकारी भागवत बिघोत, नगराध्यक्ष महेश दाभाडे, उत्सव समितीचे अध्यक्ष बब्बूभाई बारुदवाले, प्रा.पी.टी.चव्हाण, माजी नगराध्यक्ष विनोद सौंदरमल, आवेज शरीफ,महेश सौंदरमल, नगरसेवक धम्मपाल कांडेकर, किशोर सोनवणे, बाबा पिसाळ, विठ्ठल सुतार, पप्पू गायकवाड, प्रशांत राख, सरपंच मुकुंद बाबर, बदाम पौळ, सलीम शेख, मुक्ताराम आव्हाड यांच्यासह सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, भीमसैनिक व महिलांनीही या शिबिरात रक्तदान केले.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
-----------------------------------
--- जाहिरात व बातमी करिता संपर्क ----
------------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

राज्य कारभार कसा चालवायचा हे शिकविणार्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे आम्ही वंशज

असून आता आम्ही आमच्या आरक्षणासाठी आपणाकडे भीक मागणार नाही तर आम्ही आता आमचे आरक्षण हिसकावून घेवू असा इशारा जिल्हा परिषद सदस्या सक्षणा सलगर यांनी नळदुर्ग येथे धनगर समाज आरक्षण समीतीच्या वतीने आयोजित भव्य मोर्चा व रास्ता रोको आंदोलनात बोलताना दिला
प्रतिनिधी : दि. 13 रोजी धनगर आरक्षण समीतीच्या वतीने धनगर समाजाला अनुसुचित जमाती प्रवर्गात समाविष्ठ करावे, व सोलापूर विदयापीठाला राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची आमलबजावणी करावे या मागणीसाठी भव्य मोर्चा व राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी सक्षणा सलगर बोलत होत्या. यावेळी या आंदोलनात माजी जिल्हा परिष्द सदस्य गणेशराव सोनटक्के, सोमनाथ गुडडे, सुनिल बनसोडे, लोहारा नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. पौर्णिमा लांडगे, प्रा. जयश्री घोडके, आदी उपस्थीत होते. विजया सोनकाटे, सौ. महानंदा पैलवान, सौ. माधुरी घोडके, शहाजी हाके, श्रीकांत कोकरे, सुरेश बिराजदार, आण्णा सोनटक्के, अरविंद घोडके, सौ. शारदा घोडके आदी उपस्थीत होते.

प्रारंभी येथील किल्ला गेट येथून मुख्य बाजारपेठेतून भव्य मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा क्रांती चौक, चावडी चौक, भवानी चौक, शास्त्री चौक मार्गे बसस्थानक परिसरात आल्यानंतर मोर्च्याचे रुपांतर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको मध्ये करण्यात आले. यावेळी बहूसंख्य धनगर बांधव आपल्या डोक्यावर पिवळया टोप्या परिधान केल्या होत्या तर गळयात मोठया प्रमाणात पिवळे पंचे ही घालून सर्वत्र मोर्चामध्ये भंडारा ही लावण्यात आला. यावेळी पुढे बोलताना सक्षणा सलगर म्हणाल्या की, या सरकारने आम्हाला केवळ आश्वासन देवून धनगर समाजाला आरक्षण देतो म्हणून झुलत ठेवले आहे, त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री हे केवळ फसव्या घोषणा करुन धनगर समाजाची फसवणूक करीत आहे त्यामुळे आता आपल्या समाजाने एकजूट दाखवून ज्या प्रमाणे यांना सत्तेत आणले त्याप्रमाणे सत्तेवरुन खाली खेचण्याची तयारी ठेवावी असे ही त्या म्हणाल्या. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य गणेशराव सोनटक्के म्हणाले की, आम्हाला या भाजप सरकारने धनगर समाजाला अनुसुचित जमाती मध्ये समाविष्ठ करतो म्हणून सत्तेत आले पण त्याचा कांही उपयोग झाला नाही तर सोलापूर विदयापीठाला राजा माता अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाची घोषणा करुन ही आजून ही नाव का दिले जात नाही यामध्ये कांही तरी गौडबंगाल आहे म्हणून आता धनगर समाजाने जागे होवून आता आरक्षणासाठी तीव्र आंदोलन करण्यासाठी तयारीला लागायाचे आहे असे ही ते म्हणाले. यावेळी या आंदोलनात सात वर्षाच्या समरवीर चौरे या बालकांने भाषणास सुरुवात करुन सरकारवर तोफ डागली. तर या वेळी वैष्णवी कागे जळकोट, माधुरी घोडके, जयश्री घोडके, ज्ञानेश्वर घोडके, सोमनाथ गुडडे आदीचे भाषणे झाली. या वेळी मोर्चात आणि रास्ता रोको आंदोलनात शेकडो धनगर बांधव सहभागी झाले होते. मान्यवरांच्या हस्ते मंडळ अधिकारी श्री गांधले यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले आणि त्या नंतर आंदोलन समाप्त करण्यात आले. तर मोर्चा यशस्वी करण्यासाठी नळदुर्ग शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे, पत्रकार विलास येडगे, अमर भाळे, दयानंद चौरे, दिपक घोडके, ज्ञानेश्वर घोडके, पदमाकर घोडके, मनोहर माने, सुनिल कटके, प्रभाकर घोडके, चित्तरंजन पाटील आदींनी परिश्रम घेतले.